-
Kramashaha
खानावळीत राहाणारा, सायकल वापरणारा आणि मनातल्या मनात सतत काही लिहीत राहणारा कुणी एक बाबू असतो आणि त्याचे खानावळीचे बील थकते म्हणून त्या खानावळवाल्यानेच चालवलेल्या एका पाक्षिकात क्रमश: एक कादंबरी लिहीत लिहीत तो ते बील भागवतो. तर ही क्रमश: कादंबरी लिहिणे आणि त्याची प्रक्रिया उलगडणारे त्या नायकाचे प्रथमपुरुषी निवेदन, त्या कादंबरीला येणारी नमुनेदार प्रतिक्रियात्मक पत्रे, त्या क्रमश: कादंबरीतील काही पात्रांच्या चर्चा असे या कादंबरीचे काहीसे गुंतागुंतीचे स्वरूप आहे. वास्तवातले वास्तव आणि साहित्यकृतीमधले वास्तव यातली सरमिसळ करण्याचे प्रयोगही आहेत. सुरुवातीला चक्रावून टाकणारी, नंतर गुंतवून टाकणारी आणि शेवटी अस्वस्थ करणारी अशी ही कादंबरी आहे. प्रभावी आणि प्रयोगशील असणारे केळुसकरांचे कादंबरीलेखन दाट आशयाने आणि चिंतनशीलतेने उत्तरोत्तर अधिक समर्थ होत जावे.
-
Aarogyasampanna Adhunik Jeevanakarta Ayurveda
रस्त्यावर उघडयावर तयार होणारे नानाविध खाद्यपदार्थ (फास्ट फूड), आधुनिकतेच्या नावाखाली मैदा, मार्जरीन- बटर, दुधयुक्त भाज्या / फळे इत्यादी घटक असलेल्या पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव, वेळेच्या अभावामुळे कौटुंबिक सुसवांद साधण्यात अडचणी, कम्प्युटर- दूरदर्शनचा जीवनात नको तेवढा शिरकाव- या सर्वांतून मानसिक ताणतणाव, समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न जीवन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सखोल, सर्वसमावेशक तसेच आधुनिक, सुलभ, रंजक, शास्त्रीय परिभाषेत सर्व स्तरावरच्या वाचक/ अभ्यासकांच्या शंकांचे निराकरण करणारे व एकूणच नवी आगळी वेगळी तथा पूर्ण व्यवहार्य दिशा दाखवणारे मार्गदर्शक पुस्तक.
-
Swasthya Trikon
शरीर आणि श्रम ; बुद्धी आणि ज्ञान; मन आणि मनन या तीनही गोष्टी ताळमोल राखून कार्य करतील. शरीरातील सारया प्रणाली, त्याचप्रमाणे सर्व अंग सहज आणि स्वतंत्र कार्य करत असतील. शरीरात आळस नसतील व ते सतत कार्यरत राहावं यासाठी कुठल्याही बाह्य व्यसनाची आवश्यकता पडत नसेल… मन, विचार आणि वाणी सम्यक असेल, मानत बे चे नी किंवा दुसरयांसाठी तिरस्कार नसेल, शरीराची सारी अंगे आणि क्रिया संतुलित असतील… वात पित्त आणि कफ या तिनेही गोष्टी नियंत्रित असतील, पचनशक्ती नियमित आणि संतुलित असेल, भूक वेळेच्या वेळी लागत असेल, जेवणानंतर तृप्तीचा अनुभव येत असेल… निद्रा स्वभाविक असेल, घशाला शोष पडून किंवा भयानक स्वप्नांमुळे झोपमोड होत नसेल आणि रोग्य प्रमाणे सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत नसेल… कंबर सरळ, प्रमाणबद्ध आणि बळकट असेल, चेहरा प्रसन्न, डोळे चमकदार, नाडीची गती मध्यम शरीराचं तापमान संतुलित असेल आपलं काम पूर्णक्षमतेनं करण्यासाठी आपण सक्षम असाल इंद्रियांवर आपलं पूर्ण नियंत्रण असेल… तणाव आणि चिंतेपासून आपण सदैव मुक्त असाल आणि उत्साहानं जीवन जगत असाल… तन मन आणि उर्जेच्या एकरूपतेचं नाव म्हणजे स्वास्थ्य… स्वास्थ्याच्या खरा अर्थ आहे 'स्व' मध्ये स्थित होणं स्वस्थ माणूसच 'स्व' मध्ये स्थित होतो. तो रोग मुक्त असतोच त्याचप्रमाणे 'स्व' अर्क युक्तदेखील असतो. या स्व अर्कामुळे माणसाला स्वर्गात राहिल्याची, आनंदात असल्याची जाणीव होते.