-
Aai,Tujyach Thayee (आई,तुझ्याच ठाई)
आई... भाषेतला सर्वांत जास्त वापरला जाणारा शब्द. जीवनातलं सर्वांत जास्त गौरवलं जाणारं नातं. आई... कोणाला दिसतो तिच्यात ईश्वराचा अंश. काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं. तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं..
-
Prakashachi Jhade
मनुष्य नावाच्या हिंस्र श्वापदांनी भरलेल्या अरण्याचा वसु भगत यांच्या लेखणीने समर्थपणे घेतलेला वेध म्हणजेच मानवी जीवनाचे अनेकविध कंगोरे दाखविणा-या कथांचा हा संग्रह ! कच्चे गोश्त खाण्याची भाषा करणा-या सामान्य माणसांसोबतच सामान्य राहून आपले वेगळेपण जपणारी माणसे या कथांमधून आपल्याला वळणावळणावर भेटत राहतात, जशी घनगर्द अरण्यात प्रकाशाची झाडे !
-
Suraksha Kidneychi
या पुस्तकाची वै शिष्टये १ किडण्या निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काय केले पाहिजे या संबंधी महत्व पूर्ण सूचना. २ किडणीच्य रोगांचे प्राथमिक निदान आणि योग्य उपचारांबाबत अत्यंत सोप्या भाषेत परिपूर्ण माहिती. ३ किडणीच्या रोगांबाबत असलेले गैरसमज सहज दूर करणारी उपयुक्त माहिती. ४ डायलिसिस आणि किडणी प्रत्यारोपाणा संबंधी सचित्र माहिती आणि सुयोग्य मार्गदर्शन. ५ किडणी रूग्णांसाठी आहार - विहारातील पथ्याबाबत सविस्तर माहिती.
-
Gaat Aahe Lagnashi (गाठ आहे लग्नाशी)
लग्न… का? कधी? कसं? कशासाठी? कोणासाठी? कुठवर? काय किंमत मोजून? लग्नाविषयी चौफेर विचार मांडणारं… विचारांना चालना देणारं… तरुणतरुणींनी व त्यांच्या पालकांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक!