-
Bhidu ( भिडू )
आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील भयाण वास्तवामुळे अस्वस्थ झालो. काही वेळा प्रभावित झालो. अशा भिडूंची ही जीवनकहाणी ! असेच काही भिडू प्रतिकूल परिस्थितीशी निकरानं झुंजून मार्ग काढत असले, तरी त्यांच्या अंतर्मनातदेखील खोल व्यथा-वेदना आहेत. ही इरसाल मंडळी पूर्वी कशी होती ? आज कुठे आहेत ? त्यांच्या भल्या-बुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा शोध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.
-
Kanosa ( कानोसा )
भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ. राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन खेड्यां-मधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने बोलल्या आहेत. त्यांचे हे समज-गैरसमज प्रातिनिधीक वाटतील...
-
Gangal 70 Granthali 35 ( गांगल ७० ग्रंथाली ३५ )
वाचकदिनी प्रसिद्ध झालेला महत्त्वपूर्ण दस्तावेज... दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केलेले लेखन आणि दिनकर गांगल यांची प्रदीर्घ मुलाखत. सोबत, कुमार केतकर यांची प्रस्तावना व अरुण साधू यांची सांगता...
-
Niyatishi Karaar ( नियतीशी करार )
आजपर्यंत जे केलेत, त्यापेक्षा वेगळे काही करू लागलात, तर, आजपर्यंत जे मिळाले, त्यापेक्षा वेगळे काही मिळणार. मानवी धारणांत अंतर्बाह्य परिवर्तन घडून यावे आणि त्यातून समाजाचे सांस्कृतिक उत्थान व्हावे यासाठी ओघवत्या शैलीत केलेले हे परखड प्रतिपादन.
-
Morpis ( मोरपिसं )
‘अमेरिकन’ ही प्रवृत्ती आहे. जगातल्या ज्या ज्या व्यक्तीला आपल्यातला सुप्त शक्तीचा, सद्गुणांचा सर्वंकष उत्कर्ष साधायचा ध्यास आहे ती ‘अमेरिकन’ आहे. जगाच्या पाठीवर कुठेही राहत असा ध्यास घेतलेली व्यक्तीच संपन्न होत जाईल असा प्रभावी संदेश देणारा लेखसंग्रह.
-
Vivekijani Hya Maj Jaagvile
प्र.ब. कुळकर्णी ह्यांनी गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत वाचलेल्यांपैकी निवडक मराठी पुस्तकांच्या निमित्ताने केलेले हे लेखन. त्यांनी आजची समाजस्थिती, समाजसुधारणा या संबंधातले वाचन आणि त्यानिमित्तानेही लेखन येथे केले आहे. त्यामधून उभा राहतो याकाळातला विचारपट आणि त्यातले योग्यायोग्य. प्रत्येक सुबुद्ध वाचकास वाचायला आवडेल आणि वाचता वाचा अंतर्मुख करील असे हे वेगळे आगळेवेगळे पुस्तक.
-
Hatya ( हत्या )
एकेकाळचा नक्षलवाद आणि आताचा माओवाद... तर्हा एकच. नक्षलवादी जन्माला का येतात याची अनेक स्पष्टीकरणे वाचली गेली असतील परंतु त्यामागचा भावनातिरेक आणि तत्त्वज्ञानाचा आधार क्वचित कोणी असा उलगडून दाखवला असेल! तरुण पत्रकार मानव जगापुढे सत्य मांडावे म्हणून बंगाली वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश करतो. १९७०च्या दशकात नक्षलवादाचा छडा लावू पाहतो त्याला ज्या प्रकारच्या सत्यास सामोरे जावे लागते त्यामुळे त्याच्या मनात एका बाजूला वास्तव परिस्थितीविषयी आणि दुसर्या बाजूला प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याविषयी अनेक प्रश्न तयार होतात व तोच त्याची उत्तरे शोधत जातो.
-
One For Sorrow (वन फॉर सॉरो)
हे पुस्तक म्हणजे लेखिकेच्या आंतरिक ऊर्मीचा प्राजंळ आविष्कार आहे. या लेखनाला एका लष्करी उच्चपदस्थ अधिकार्याच्या पत्नीच्या अनुभवांची पोर्शभूी आहे. यातून लेखिका समाज-शासन यांना काही विचारू पाहते, काही सांगू पाहते, काही मोकळे करू पाहते.
-
Vikasachi Rupresha ( विकासाची रूपरेषा )
अज्ञान व अंधश्रध्दानिर्मूलनातून (एनलाइटमेंट) समाजाला विकासाभिमुख करत, समतेचं शिक्षण देत देश विकसित करण्याकरता समाजशास्त्रज्ञांनी, सामाजिक नेतृत्वानं पुढे यायला पाहिजे, अन् तेही बाह्या सरसावून! मूल्यशिक्षणाची आवश्यकता प्रतिपादन करणारे हे विचार.
-
Aika Santanno ( ऐका संतांनो )
साधू' या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे याचं समग्र विवेचन कबीरांच्या कवनांमध्ये सापडतं. ओशोंनी त्यामध्ये अतिशय सुंदर शब्दांत भर घालून या कवनांचा विस्तारित अर्थ विशद केलेला आहे. माणसामधलं 'साधुत्व', त्यागा-भोगाच्या कल्पना, शरीररूपी सूक्ष्म धाग्यांनी विणलेली चादर आणि त्यावर कबीरांचं साध्या-सोप्या प्रतीकांद्वारे दिलेलं भाष्य या सर्वातून ओशोंनी मांडलेली मानवी जीवनाची कल्पना... ही कबीरांची कवनं आणि त्यावरचं ओशोंचं भाष्य ! यातून स्वच्छपणे जाणवतो तो दोघांनी मानवी जीवनाचा चहूअंगांनी केलेला सार्थ विचार !
-
Mugdha Kahani Premachi ( मुग्ध कहाणी प्रेमाची )
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्त्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेत अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे 'स्व'चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जो कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारुण्य! जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वत:तल्या शांतीमध्ये डुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही! अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारे काही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे - अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे - तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.
-
Sagara pran talmalala ( सागरा प्राण तळमळला )
ही कादंबरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतीपर्वावर आधारीत आहे. यात त्यांचे कार्यच अधिक प्रभावीतपणे वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. सावरकर अंदमानहून परत आले, इथेच हे लेखन थांबवण्यात आले आहे.