-
Bahaar
आपल्याच दुःखात बुडून जाण्यापेक्षा थोडीशीच, पण दुस-याची जाण ठेवली तर? कटू शब्दांचे बाण सुटायच्या आधी थोडासाच, पण संयम दाखवला तर? एक साधा गुलमोहर – तोही मनासारखा बहरायची वाट बघावी लागते. नाही तसा बहरला, कोसळला, तरी आपण कोसळायचं नसतं. तोल सुटू द्यायचा नसतो. स्वतःच्या ‘मी’पणात एवढं आत्मकेंद्रित व्हायचं नसतं…
-
Priya Mitra
आपल्या छोट्याश्या आयुष्याच्या परिघाताही अनेक घटना, प्रसंग घडत असतात. अनेक व्यक्ति भेटत असतात. आपण खुप काही पहात असतो, ऐकत असतो. मनात त्यामुळे काही तरंग उठतात. विचार चालु होतो. त्या त्या वेळी त्यामुळे आपला काही दृष्टिकोन बनत जातो. त्याच्याच ह्या काही कथा, गेल्या पंचवीस तीस वर्षात हौसेने मी लिहिलेल्या विविध नियात्कालिकातुं प्रसिध्हा झालेल्या कथांचा हां संग्रह- प्रिय मित्रा. कथा हा अगदी लवचिक साहित्यप्रकार आहे. कविता, नाटक, निंबंध, लघुनिंबंध ह्याकदेही तो वळतो पण काहीतरी एकात्म पारीणामाकडे संकेत करत असतो. त्याचा जीव अगदी पावलापुरता प्रकाश एवढाच असेल पण त्यानेही जीवऩानुभवाच्या वाटेवर दिलासा दिलेला असतो. अगदी प्रिय मित्रासारखा.
-
Pragaticha Express Way
प्रगतीचा एक्सप्रेसवे ... एक संवाद... एक विचार आणि अनेक अनुभव. मराठी समाज बदलतोय, नव्हे केंव्हाच बदललेला आहे. दर महिन्याला ठराविक पगार घेणारे दोन हात, आज मोठी स्वप्न घेऊन तयार आहेत. चाकरमानी मराठी तरूण आज उद्दोगाची मोठी चक्र फिरवू लागलेला आहे...... त्याने असं काय पुढे काय नेमकं काय करायला हवं? यश म्हणजे काय? ............. वाचा प्रगतीचा एक्सप्रेस वे !
-
Gotavla (गोतावळा)
लेखकाच्या सहवासात आलेल्या आणि लेखकाला भावलेल्या व्यक्तींचा खास `कणेकरी’ शैलीत घेतलेला परामर्श