-
Anandashram
जगात घडणार्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे. शरीर मनाच्या बिघाडासही मीच कारणीभूत आहे. हे सगळं दुरुस्त करायचं असेल तर, प्रत्येक गोष्टीची सुरुवातही मलाच करावी लागेल. अशी आहे ही आनंदाश्रमाची गोष्ट.
-
Shabdavrati Shantabai
अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असणा-या 'आपल्या' वाटणार-या प्रा. शांता शेळके, यांच्या वाड्मयीन कार्यकर्तुत्वाचा ललितरम्य शैलित घेतलेला हा आलेख. शांताबाईंच्या वाड्मयीन कर्तुत्वाबरोबरच त्यांच्या घरंदाज, शालीन व्यक्तीमत्वाचा आणि त्यांच्या प्रांजळ, निर्मळ वृत्तीचे, सुभग दर्शन घडवणारा!
-
Rutuvaibhav
वसंतॠतू ते शरदॠतू अशा सहाही ऋतूंमधले, सृष्टीच्या विविध आविष्कारांचे, पशुपक्ष्यांचे, नयनरम्य डोंगरद-याचे, निर्झरांचे... वर्णन. डोळ्यांचे पारणे फेडणा-या अशा सौंदर्याबरोबरच देश-विदेशातील कला, संगीतासह संस्कृती-संमेलनाचे चित्रदर्शी आरेखन म्हणजेच 'ॠतुवैभव!' निसर्गातल्या विविधतेने नटलेल्या, रंग-गंध-लय-ताल-नाद-स्पर्श या संवेदनाचं विश्व अमर्याद आहे. मन:पूत भटकंतीतून या निसर्गसौंदर्याचा रसिकमनाने घेतलेला हा आस्वाद वाचकांना मोहित तर करीलच, शिवाय पर्यटनालाही उद्युक्त करील.
-
Franklin Roozvelt
1928च्या त्या काळया गुरूवारी अमेरिकेतील शेअरबाजार साफ गडबडला, पार कोसळलाच! उद्योगधंदे ठप्प. बँका बंद. महामंदीचे सावट. प्रचंड बेकारीचे अरिष्ट. जनता पुरती हवालदिल.त्या अंधारलेल्या वातावरणात एका पोलियोग्रस्त नेत्याने देशाला दिलासा दिला. चाकोरीबाहेरचे नवे धोरण आखले. सर्व थरांतील बेकारांना हाताशी धरून त्याने असंख्य प्रकल्प उभारले. अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि देशाचा कायापालट घडवला. एक संकट निवारले जाते आहे, तोच दुसरे महायुध्द समोर उभे ठाकले. तो डगमगला नाही. हुकुमशहांच्या विरोधात तो उभा ठाकला. त्यांचा नि:पात करून त्याने जागतिक शांततेचा पाया रचला. चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणारा तो एकमेव नेता ठरला.फ्रँकलिन डिलॅनो रूझवेल्ट हे त्याचे नाव. अमेरिकेचा तारणहार ठरलेल्या त्या जिद्दी नेत्याची ही यशोगाथा!
-
Yahi Hai Rangroop
सलीम खान, शमशाद बेगम, बी. आर.इशारा. नंदा, राजेंद्रनाथ, बसू चटर्जी, मन्सूरखान या मला आवडलेल्या सात प्रतिभावान व्यक्ती. या सरार्वांमध्ये मला एक समानता आढळून आले की सातही जण मनस्वी आणि स्वत:शी खूप प्रमाणिक आहेत. प्रत्येकाचं आयुष्य आगीतून पारखून निघालेलं. असं म्हणतात की हिरा कितीही जुना झाला तरी त्याचं तेज झोकाळत नाही. ही व्यक्तिमत्वंही तशीच आहेत. वाचकांनासुद्धा ती भोवतील अशीच आशा आहे.
-
For Men
पन्नाशीचा गृहस्थ हा अठठावीस वर्षांच्या जवानापेक्षा तंदूरूस्तीच्या व्यायामांची आखणी या पुस्तकात सादर केलेली आहे. पन्नाशीकडे झुकलेले पुरुष नेहमीच्या स्वस्थाविषयी, फारच काळजी करताना आढळतात. याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे हाडं ठिसूळ होणायचा, दुसरया क्रमांकाचा मधुमेह, कर्करोग आणि हृदय विकार यांचा त्रास होण्याची शक्यता डोक्यावर सतत टांगत्या तलवारी सारखी असतेच. या पुस्तकात व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन परुषांना डोळ्यासमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबिक्स, वजन उचलण्याचे व्यायाम बळकटी वाढविण्याचे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. या पुस्तकात दिल्याप्रमाणे व्यायामाला लागा आणि आयुष्य भर निरोगी राहा
-
For Women
पन्नाशीनंतर तंदुरूस्ती या पुस्तकात मध्यमवयाकडे झुकत असेलेल्या स्त्रियांसाठी फार सध्या सोप्या भाषेत तंदुरूस्तीच्या व्यामांची आखणी सादर केलीली आहे. या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबीक्स, वजन उचलण्याचे व्यायाम बळकटी वाढविण्याचे व्ययाम आणि कटिभागाला मजबुती देणारे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. हा व्यायामाचा वास्तव, चपखल आणि संतुलित आराखडा आहे.
-
26-11 Mumbaivaril Halla
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी,साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजीत थैमान घालतात.त्याची ही प्रत्यक्षदक्षी कहाणी.परदेशी पर्यटक,श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे,ते ताज आणि हॉटेल ट्रायडेंट-ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरीमन हाउस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला.हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत,याची कारणमीमांसा ज्येष्ट पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.
-
The Private Papers Of Eastern Jewel
पेकिंग १९१४.प्रिन्स सू यांच्या सगळ्यात लहान उपस्त्रीची आठ वर्षाची मुलगी ईस्टर्न ज्यूवेल तिच्या वडिलांची त्यांच्या एका नोकरानिशी चाललेली रतिक्रीडा एका कोरीव अडोशामागून चोरून बघितली. त्यानंतर भविष्याच्या कृष्णछायेच मळभच जणू दाटून आलं आणि ईस्टर्न ज्यूवेलच्या वादळी आयुष्याचा प्रवास सुरु झाला. ईस्टर्न ज्यूवेलचा शरीरसंबंधांमधला चौकसपणा लक्षात आल्यामुळे तिला टोक्योला त्यांच्याच एका दूरच्या नातेवाईकाकडे पाठवून देण्यात आलं. त्यानंतर वैरण आणि बर्फाळ अशा मंगोलीयातल्या राजकुमाराशी तिचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करून देण्यात आला. वारंवार एकटेपणामुळे तिला अस्वस्थ करणारे चमत्कारिक आभास आणि तशीच दु: स्वप्न पडू लागली; पण ती स्वभावात:च धीट, बंडखोर आणि कोणाच्याही, कमीत कमी पुरुषांच्या तरी वर्चस्वाखाली राहण्याची तयारी नसलेली अशी होती. द प्रायव्हेट पेपर्स ऑफ ईस्टर्न ज्यूवेल ही अतिशय वादळी ,बहुरंगी,दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पार्श्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे.
-