-
Annapuraan
चरकाचार्यांनी हजारो वर्षांपूर्वी आहारातून रोग उत्पन्न होतात असें म्हटले आहे. त्याकाळी पाणी व आहारद्रव्ये प्रदुषित व भेसळयुक्त नव्हती. आज २१ व्या शतकात प्रदूषण, रासायनिक खते व भेसळ यामुळे आहारद्र[...]
-
Seawitch
समुद्र म्हटला की संघर्ष! जीवन-मरणाचा संघर्ष! असा संघर्ष करून त्यातून संपत्ती मिळवणार्यांचा एक वर्ग तयार होतो. मग त्या वर्गात अंतर्गत संघर्षाचे अंगार फुलतात. समुद्र म्हटला की साहस! ...एका तेलसम्राटाची समुद्रातील तेलविहीर म्हणजे त्याच्या साम्राज्याचे केंद्र. हा तेलसम्राट. संपत्तीच्या जोरावर काहीही करण्याची हिंमत असणारा. त्याची दोन मर्मस्थळे होती. ती तेलविहीर आणि त्याच्या दोन लाडक्या कन्या. शेवटी त्यांच्यावरच घाला पडला. केवळ सूडापोटी! संघर्ष, साहस, संपत्ती व सूड यांनी रंगलेले एलिस्टर मॅक्लीनने लिहिलेले हे समुद्रावरचे नाट्य.
-
The Diving Bell And The Butterfly
अर्धांगाच्या तीव्र झटक्याने पूर्ण गारद झालेल्या; पण हलणा-या एका पापणीने जीवनाचे रहस्य उलगडले जाते, त्याची ही भावस्पर्शी कथा. यातून जीवननिष्ठा म्हणजे काय? ते समजते. माणुसकीची शिकवण मिळते. मनाची उदारता प्रत्यक्ष अनुभवाद्वारे वाचायला मिळते. मन हेलावून सोडणारे एक भावस्पर्शी आत्मकथन.