-
Phoenixchya Rakhetun Uthla Mor
'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह. या संग्रहात एकूण सात कथा आहेत. त्यातल्या बहुतेक कथांना पार्श्वभूमी आहे ती या मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची.
-
Saudichya Antarangat
सौदी अरेबियामध्ये पाच-सात वर्षे रहिवास केल्यानंतर झालेल्या त्या देशाचे आकलन, त्यामधून वाचकाला एका वेगळ्या जीवनपद्धतीची ओळख जशी होते, तसेच लेखिकेच्या मनोवृत्तीत झालेले परिवर्तनही कळून येते. तिने ही शैली किती सहज आत्मसात केली आहे! ती त्या शैलीचे वर्णन करते, वानप्रस्थातील एकांतवास!
-
Hiroshima
हिरोशिमाच्या अणुसंहारावर आधारित, प्रत्येक भेट देऊन लिहिलेली जागतिक दर्जाची कादंबरी. मा. राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते इंग्रजीत प्रकाशित.
-
Tuesday's With Morry
ALS नावाचा दुर्धर आजार जडल्यानंतर प्रा. मॉरी अतिशय शांतपणे आणि धैर्याने वास्तवाला सामोरे जातात. मृत्यूची चाहूल लागल्यानंतर त्यांच्यातला शिक्षक जास्त सजग होतो आणि स्वानुभवाच्या आधारे आयुष्याचं तत्त्वज्ञान ते आपल्या विद्यार्थ्याला सांगतात. प्रा. मॉरी श्वार्टझ् आणि त्यांचा विद्यार्थी मिच अल्बम यांच्यातील सुंदर, निर्लेप नात्याचा प्रत्यय देणारी कादंबरी.