-
Franklin Roozvelt
1928च्या त्या काळया गुरूवारी अमेरिकेतील शेअरबाजार साफ गडबडला, पार कोसळलाच! उद्योगधंदे ठप्प. बँका बंद. महामंदीचे सावट. प्रचंड बेकारीचे अरिष्ट. जनता पुरती हवालदिल.त्या अंधारलेल्या वातावरणात एका पोलियोग्रस्त नेत्याने देशाला दिलासा दिला. चाकोरीबाहेरचे नवे धोरण आखले. सर्व थरांतील बेकारांना हाताशी धरून त्याने असंख्य प्रकल्प उभारले. अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि देशाचा कायापालट घडवला. एक संकट निवारले जाते आहे, तोच दुसरे महायुध्द समोर उभे ठाकले. तो डगमगला नाही. हुकुमशहांच्या विरोधात तो उभा ठाकला. त्यांचा नि:पात करून त्याने जागतिक शांततेचा पाया रचला. चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवणारा तो एकमेव नेता ठरला.फ्रँकलिन डिलॅनो रूझवेल्ट हे त्याचे नाव. अमेरिकेचा तारणहार ठरलेल्या त्या जिद्दी नेत्याची ही यशोगाथा!
-
Yahi Hai Rangroop
सलीम खान, शमशाद बेगम, बी. आर.इशारा. नंदा, राजेंद्रनाथ, बसू चटर्जी, मन्सूरखान या मला आवडलेल्या सात प्रतिभावान व्यक्ती. या सरार्वांमध्ये मला एक समानता आढळून आले की सातही जण मनस्वी आणि स्वत:शी खूप प्रमाणिक आहेत. प्रत्येकाचं आयुष्य आगीतून पारखून निघालेलं. असं म्हणतात की हिरा कितीही जुना झाला तरी त्याचं तेज झोकाळत नाही. ही व्यक्तिमत्वंही तशीच आहेत. वाचकांनासुद्धा ती भोवतील अशीच आशा आहे.
-
For Men
पन्नाशीचा गृहस्थ हा अठठावीस वर्षांच्या जवानापेक्षा तंदूरूस्तीच्या व्यायामांची आखणी या पुस्तकात सादर केलेली आहे. पन्नाशीकडे झुकलेले पुरुष नेहमीच्या स्वस्थाविषयी, फारच काळजी करताना आढळतात. याशिवाय व्यायामाच्या अभावामुळे हाडं ठिसूळ होणायचा, दुसरया क्रमांकाचा मधुमेह, कर्करोग आणि हृदय विकार यांचा त्रास होण्याची शक्यता डोक्यावर सतत टांगत्या तलवारी सारखी असतेच. या पुस्तकात व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन परुषांना डोळ्यासमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबिक्स, वजन उचलण्याचे व्यायाम बळकटी वाढविण्याचे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. या पुस्तकात दिल्याप्रमाणे व्यायामाला लागा आणि आयुष्य भर निरोगी राहा
-
For Women
पन्नाशीनंतर तंदुरूस्ती या पुस्तकात मध्यमवयाकडे झुकत असेलेल्या स्त्रियांसाठी फार सध्या सोप्या भाषेत तंदुरूस्तीच्या व्यामांची आखणी सादर केलीली आहे. या पुस्तकात दिलेले व्यायामाचे प्रकार हे मध्यमवयीन स्त्रियांना डोळ्यांसमोर ठेवूनच आखलेले आहेत. यामध्ये एरोबीक्स, वजन उचलण्याचे व्यायाम बळकटी वाढविण्याचे व्ययाम आणि कटिभागाला मजबुती देणारे व्यायामाचे प्रकार दिलेले आहेत. हा व्यायामाचा वास्तव, चपखल आणि संतुलित आराखडा आहे.
-
26-11 Mumbaivaril Halla
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी,साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजीत थैमान घालतात.त्याची ही प्रत्यक्षदक्षी कहाणी.परदेशी पर्यटक,श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे,ते ताज आणि हॉटेल ट्रायडेंट-ओबेरॉय पर्यंतच्या मुक्त संचारात नरीमन हाउस आणि सीएसटी येथेही त्यांनी बेबंद नरसंहार केला.हे सर्व वाचताना दु:ख आणि वैफल्याने मन विषण्ण होते....असे हल्ले भारताला आणखी काही काळ तरी सोसावे लागणार आहेत,याची कारणमीमांसा ज्येष्ट पत्रकार हरिंदर बावेजा यांनी केली आहे.
-
The Private Papers Of Eastern Jewel
पेकिंग १९१४.प्रिन्स सू यांच्या सगळ्यात लहान उपस्त्रीची आठ वर्षाची मुलगी ईस्टर्न ज्यूवेल तिच्या वडिलांची त्यांच्या एका नोकरानिशी चाललेली रतिक्रीडा एका कोरीव अडोशामागून चोरून बघितली. त्यानंतर भविष्याच्या कृष्णछायेच मळभच जणू दाटून आलं आणि ईस्टर्न ज्यूवेलच्या वादळी आयुष्याचा प्रवास सुरु झाला. ईस्टर्न ज्यूवेलचा शरीरसंबंधांमधला चौकसपणा लक्षात आल्यामुळे तिला टोक्योला त्यांच्याच एका दूरच्या नातेवाईकाकडे पाठवून देण्यात आलं. त्यानंतर वैरण आणि बर्फाळ अशा मंगोलीयातल्या राजकुमाराशी तिचा तिच्या इच्छेविरुद्ध विवाह करून देण्यात आला. वारंवार एकटेपणामुळे तिला अस्वस्थ करणारे चमत्कारिक आभास आणि तशीच दु: स्वप्न पडू लागली; पण ती स्वभावात:च धीट, बंडखोर आणि कोणाच्याही, कमीत कमी पुरुषांच्या तरी वर्चस्वाखाली राहण्याची तयारी नसलेली अशी होती. द प्रायव्हेट पेपर्स ऑफ ईस्टर्न ज्यूवेल ही अतिशय वादळी ,बहुरंगी,दुसरे महायुद्ध आणि तीन देशांच्या पार्श्वभूमीवर घडलेली सत्यकथा आहे.
-
-
Belonging
सामीम सात वर्षाची होईपर्यंत इंग्लंडमधील एका अनाथालयात पूर्णपणे ब्रिटीश संस्कारात वाढली.आईवडिलांनी तिला घरी नेण्याचे ठरविल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.परंतु समीम ज्या वातावरणात मोठी झाली,त्यापेक्षा तिचे कुटुंब,त्यांची भाषा,रितीरिवाज पूर्ण वेगळे होते.नऊ वर्षाची होईपर्यंत तिची खात्री झाली होती की,त्या कुटुंबात तिला एका गुलामाइतकीसुद्धा किंमत नव्हती.समीम तेरा वर्षाची झाली तेव्हा तिच्या आईने तिला अचानक पाकिस्तानात घेऊन जाण्याचे ठरवले आणि समीम सुट्टीची स्वप्ने रंगवू लागली.
-
Anandacha Passbook
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो.श्याम बुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये यशाची अनेक शिखरे गाठली.साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली .वि.स. खांडेकर,आचर्य अत्रे,पु.ल. देशपांडे,रणजित देसाई अशा अनेक नामवंतसंबधीच्या आठवणी आनंददायी आहेत.ज्याला आयुष्यात मोठ व्हावंसं वाटत,यशस्वी व्हावंसं,आनंदी राव वाटत त्याला हे पुस्तक प्रेरणा देईल.
-
Sinar
मृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणाऱ्या मुलीपासून ते वृध्दाश्रमात राहणाऱ्या वृध्देपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे.जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणाऱ्या कथा आहेत.
-
Ek Dhaga Sutacha
ते दिवस... संघर्षाचे होते अन् मंतरलेलेही ! स्वातंत्र्यानंतर देश, राजकारण सगळेच बदलेले. आम्हांला घडवणारी पिढी काळाच्या पोटात गडप झाली. उरता उरल्या माझ्यासारख्या काही.... या भरलेल्या दिवसांना उजाळा देणा-या... पराकोटीचा संघर्ष, ध्येयवादाची पदोपदी घेतली गेलेली परीक्षा आणि देशसेवेची आंतरिक उर्मी यांनी भरलेली ही जीविका. स्वातंत्र्याचा सुर्य आणि सहस्त्रचंद्र पाहणा-या या वाटचालीतील एक 'आई' देखील भेटते आणि मन स्तिमित होते... ही आई आहे, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर या सुपुत्राची!
-
Ashru
या विसाव्या शतकानं जगाला बर्यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.