-
Satyache Prayog Athva Aatmakatha (सत्याचे प्रयोग अ
या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत. - महात्मा गांधी या पुस्तकात दर्शविलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून, सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावेत, एवढीच माझी इच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेचा उपयोग होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. कारण, की सांगण्यालायक एकही गोष्ट मी छपविणार नाही. माझ्या दोषांची जाणीव वाचकांस परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मला फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णायचे आहेत. मी कसा देखणा आहे ते सांगत बसण्याची तिळमात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वत:ला मोजण्याची इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वत:ला लावले पाहिजे, त्याप्रमाणे तर मी नि:शंकपणे म्हणेन की: मौ सम कौन कुटिल खल कामी? जिन तनू दियो ताहि बिसरायो ऐसो निमकहरामी ।। - महात्मा गांधी.
-
Kahani Manavpranyachi
विश्वाचा जन्म कधी झाला हे गूढ असले तरी जगभरातील शास्त्रज्ञ त्यांची उकल करीत आहे. त्याचे उत्तर हळूहळू उलगडत आहे. मानवाच्या अस्तित्वानंतर अनेक शोध लागले. त्यातून आजचे आधुनिक जग साकार झाले आहे. ज्ञान - विज्ञान, तत्वज्ञान - तंत्रज्ञान यांच्या विकासातून अनेक असाध्य गोष्टी सध्या झाल्या आहेत. यातून मानव 'सिव्हिलायझेशन' कडे वळला. म्हणजेच सभ्यता, नैतिकता मानू लागला. पण ह्या गोष्टी अहिंसेला पूरक असल्या तरी त्या स्थळ, काळ, व्यक्तीसापेक्ष असल्याने हिंसेचे मूळ यातून फुटले. विश्वाची निर्मिती, माकडापासून मानवाची अत्तापर्यत जी उत्क्रांती झाली त्याचा शोध अनेक शास्त्रज्ञ आजही घेत आहेत. हा प्रवास गूढ, रहस्यमय असून, 'नंदा खरे' यांनी 'कहाणी मानवप्राण्याची' मधून त्यांची झलक दाखवली आहे. सहा विभागात त्य आणि संपूर्ण विश्वाचा, मानवाचा इतिहास, भूगोल रंजक शब्दांत, आवश्यक तेथे छायाचित्र, नकाशे यांच्या मदतीने कथन केला आहे.