-
Bhetigathi
तो असा बसताच चाबूक कडाडे... वादी पिंजून जाई, तुटून जाई. निबार कातडीवर वळ उठत. दवबिंदूगत रक्ताचे थेंब अंगावर थरथरत उभे राहत. कोयंड्याची काठी चिंबून, एकेक कुंडं मनगटाएवढा उठे; पण सर्जा जागचा हलत नसे. हे बघून लोक त्याला 'बशा' म्हणायचे. बशा बौल म्हणून सर्जाचं नाव बद्दू झालं. म्हातारपणी त्याच्या नशिबी बोल आला. त्याच्या गुणाला बट्टा लागला.... मृगाचा पाऊस सुरूझाला आणि सर्जाचं हाल कुत्र खाईनासं झालं. म्हशीपुढची काढलेली चिपाडं, शेणामुतात भिजलेला गदाळा त्याच्या वाट्याला येऊ लागला. पोट जाळायला तो तेसुद्धा खायचा - हपापून अपरूबाईनं खायचा. पण त्याच्या पोटाची खळगी भरली नाहीत. आतडी रिकामी राहिली. त्यात कामानं त्याची झडती घेतली आणि आता बसलं तर उठता येईना आणि उठलं तर बसता येईना अशी त्याची दशा झाली.
-
K Five
कोकणातून प्रथमच मुंबईत आलेल्या कोवळ्या, भाबड्या, लाजर्या सुंदर फुलराणीची – जुईलीची. हिंदुस्तान बेचिराख करण्यासाठी पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या ‘राकट, दणकट, विकृत, प्रशिक्षित अतिरेकी रहिमतखानाची.भारतीय कमांडो युनिट कोब्रा थर्टीनच्या निर्दयी, भावनाहीन, मानवी कत्तलखाना असलेल्या कमांडो के फाईव्ह याची.... दंगलीच्या पार्श्वभूमीवरील मन गोठवून टाकणार्या थरारनाट्याचा पुन:प्रत्यय तितक्याच दाहकतेने देणारी, संवेदना गोठविणारी विलक्षण कादंबरी....
-
Maharashtra Desha (महाराष्ट्र देशा)
माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे म्हणून हे महाराष्ट्र! इतिहास अनेकांनी शब्दबद्ध केला. अनेकदा तो शब्दबंबाळही केला. महाराष्ट्र जसा आहे तसा दाखवायचा तर फक्त कॅमेरा-लाईटच्या शब्दांतच तो दिसावा. महाराष्ट्र भूमी समृद्ध करणार्या अनेक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक 'स्थळां'चे हवाईछायाचित्रण करून महाराष्ट्र कॅमेर्यात शब्दबध्द केला.
-