-
Egyptaayan
इजिप्तला लाभलेला इतिहास व सांस्कृतिक वारसा, आहार पद्धती इ. या पुस्तकात मीना प्रभू यांनी सोप्या पण सुंदर भाषेत मांडली आहे.
-
Chashak Aani gulab
भेण्डे यांनी युरोपच्या प्रवासात नुसतीच चैन केली नाही किंवा नुसत्या बघ्यासारखे देश पाहिले नाहीत. त्यांच्यातला अर्थशास्त्रज्ञ, ललित लेखक आणि चौकस सुशिक्षित महाराष्ट्रीय माणूस सतत आणि सर्वत्र जागरूक होता. शक्यतोवर त्यांनी तिथले लोक पाहिले. त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्यांच्या देशांची स्थिती, त्यांची सुखदुःखे जाणून घेतली. पुष्कळ ठिकाणी ते प्रवासी बस सोडून एकटेच स्वतंत्रपणे हिंडले. त्यामुळे `कंडक्टेड’ प्रवासी सामान्यतः जे पाहत नाहीत ते भेण्डे पाहू शकले.
-
Turknama
तुर्कस्तानातील प्रेक्षणीय स्थळांचे भरभरून वर्णन या पुस्तकातून केले आहे. तसेच त्यांचा राजकीय, सामाजिक व भौगोलिक आढावा पण घेतलेला आहे.
-
Bhogale Je Dukh Tyala
माझ्या जन्मापासून नाही तर माझ्या जन्माअगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. पांढ-या पायाची, अपशकुनी, काळी, कुरूप, काळ्या जिभेची अशी कितीतरी अभद्र लेबल मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मलाच जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसवांनी तिचं हृदय कधीही हेलावलं नाही. माझी प्रत्येक आशा, आकांक्षा, भावना, हक्क, अधिकार आपल्या टाचेखाली ती तुडवत आली. माझं अख्खं आयुष्य जणू तिनं आपल्यासाठी एक वस्तू मानली. केवळ एक वस्तू, जी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं. स्वत:साठी, स्वत:च्या गरजपूर्तीसाठी. मा नं माझं आयुष्य आपल्याकडं गहाण ठेवलं. मला माझ्या गुलामीची प्रखरतेनं जाणीव झाली. यातून आपण सुटायला हवं, नव्हे सुटका करून घ्यायला हवी. "घाबरूनकोस. कितीही वादळ होऊ दे, विझू देऊ नकोस त्या आशेच्या पणतीला. आत्ता हरलीस तर मग पुढं कधीच नाही. कधीही नाही." मी स्वत:ला पुन:पुन्हा बजावत होते. स्वत:च स्वत:ला धीर देत होते.
-
Samradni
''ऐश्वर्या, लोक ज्याला महत्त्वाकांक्षा म्हणतात, त्या अर्थानं मी महत्त्वाकांक्षी नाही आणि मला स्वत:ला असं महत्त्वाकांक्षी व्हायला आवडतही नाही. दुस-या कुणाचं मी काय सांगू? पण जे दिसेल ते मिळवायला बघायचं, हाताला लागलं म्हणून खिशात घालायला बघायचं, हे मला बरोबर वाटत नाही. माझं कोणतं काम आहे, हे मला नक्की कळलेलं आहे. नुसतं मोठं होणं अशासारखी तर मला मुळीच महत्त्वाकांक्षा नाही. उलट सतत असं मोठं होण्यासाठी धडपड करणा-या लोकांच्या वागण्याचा मला अर्थच कळत नाही. हे लोक कशासाठी सारखे धावत सुटतात, ते समजत नाही, त्यामुळे हाती असलेल्या कामाला पूर्ण न्याय द्यायच्या अगोदरच ते दुसरं काहीतरी मिळवायला बघतात. कुठंच शांती नाही. ऐश्वर्या, अगं कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. फक्त ते नीट समजून घेऊन केलं पाहिजे. मग ते छोटं कामही सगळ्यांत प्रभावी वाटतं आणि ते करणा-यालाही काहीतरी केल्याचं समाधान वाटतं आणि शेवटी, आयुष्याला मर्यादा असतेच ना? नुसतंच पळत सुटण्यात सार्थक कशाचं वाटणार? मला तर कधी कधी एखादा प्राथमिक शाळेचा शिक्षकही, शिक्षणमंत्र्यांपेक्षा थोर वाटतो. एखादा सरपंच मुख्यमंत्र्यांपेक्षा कर्तबगार वाटतो, कारण त्याला आपल्या कामाचा अर्थ कळलेला असतो.''
-
Pahili Pheri
यशवंतरावजी उत्तम व्यूहरचनाकार आणि जाणते रणनिती विचारवंत होते... डॉ. मनमोहन सिंग 1965 War Inside Story या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पाकिस्तानविरुद्ध 1965 च्या सप्टेंबरमध्ये जे युद्ध झाले त्यावेळच्या कार्यवाहीचे वर्णन यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या रोजनिशीत केले आहे. चीनविरुद्धच्या 1962 मधील युद्धातील पराभवानंतर संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी घेतलेल्या यशवंतरावांनी सौन्याचे बल व मनोधौर्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच पाकिस्तान युद्धातील घटना व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी यांचा उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे. लष्करी, मुलकी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर या सर्व दृष्टिकोनातून केलेले हे विश्लेषण, संरक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, यांचे अभ्यासक तसेच सामान्य वाचक यांना उपयुक्त ठरेल.
-
For Here Or To Go?
"फॉर हिअर, ऑर टू गो ?" इथेच थांबून आस्वाद घेणार, की इथले खाद्यपदार्थ सोबत घेऊन 'तिकडे' जाणार ? - जगभरातल्या 'मॅकडोनल्डस्'मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न. चाळीस-पंचेचाळीस वषा|पूर्वी मध्यमवर्गीय मानसिकतेची कुंपणं तोडून महासागर ओलांडण्याचं धाडस करणा-या मराठी माणसांनी उत्तर अमेरिकेत नवं आयुष्य उभारायची धडपड सुरूकेली, त्या क्षणापासून या प्रश्नाने त्यांचा पिच्छा पुरवला. 'इथेच' राहून इथले होणार? की 'इकडली' पुंजी बांधून घेऊन 'तिकडे' परत जाणार ? खिशात आठ डॉलर्स, बॅगेत वीस किलो सामान आणि अज्ञाताला तोंड देण्याइतपात मनाचा हिय्या एवढ्या भरवश्यावर या माणसांनी दहा हजार मौलांची उडी मारली, तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची थेट रात्रच. उत्तर अमेरिकेच्या भूमीवर पाय रोवणारी मराठी माणसांची पाहिली पिढी. त्या पिढीच्या संघर्षाची ही कहाणी. परक्या देशात रुजण्यासाठी दिलेल्या झुंजीची... सोसलेल्या असह्य ओढाताणीची... अपार कष्टांची.. हिंमतीची... अपरंपार वैभवाची.. झळाळत्या यशाची आणि एकट्या, एकाकी अपयशाचीही !
-
Dollar Bahu
फार विचित्र आहे हा देश ! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं येतात, पण माघारी जायला जमत नाही. तिथून जावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं ! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय ? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वार्याला तोंड देत तिथं राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर ! पण हे भारतात कुणालाही समजत नाही. पैशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही ! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा, यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करु शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.
-
2
मनुष्याच्या लौकिक, तसंच शारीरिक आणि मानसिक आयुष्यात सतत स्थित्यंतरं घडत असतात. त्या स्थित्यंतरांत माणसाची मानसिक मोडतोड होत असते आणि त्याच मोडतोडीतून माणूस पुन्हा पुन्हा उठत असतो... आसपासच्या लोकांना प्रेरणा देत असतो... 'चिकन सूप'च्या या कथा म्हणजे माणसांतल्या विलक्षण ताकदीच्या कथा आहेत. मानवी स्वभावातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म कंगो-यांवर ऊहापोह करणार-या या कथा, म्हणजे अनेकांच्या अंधा-या मार्गावरच्या, रस्ता दाखवणा-या ज्योती आहेत! ही प्रकाशाकडे नेणारी एक वाट.
-
Rajai
मी बर्याच कथा लिहिल्या आणि कुठलीही कथा परत आली नाही. एकीकडून मला विरोध होऊ लागला, पण दुसरीकडून मासिकांतर्फे होत असलेली कथांची मागणीही वाढू लागली. मग मी विरोधाची काहीच पर्वा केली नाही. मी `रजई’ लिहिली, तेव्हा मात्र बॉम्बस्फोट झाला. साहित्यिक आखाड्यात माझ्या चिंधड्या उडाल्या. काही लोकांनी मात्र माझ्या समर्थनार्थही लेखणी चालवली. तेव्हापासून माझ्यावर अश्र्लील लेखिका असल्याचा ठसा मारला गेला. `रजई’च्या आधी आणि `रजई’च्या नंतर मी जे काही लिहिलं, त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. मी लैंगिक विषयांवर लिहिणारी अश्र्लील लेखिकाच ठरले. अगदी आता आता गेल्या काही वर्षांपूर्वी नव्या पिढीने मला सांगितलं की, मी `अश्र्लील लेखिका’ नसून `वास्तववादी लेखिका’ आहे. मी भाग्यवान आहे की, माझ्या जिवंतपणी मला समजून घेणारे जन्माला आले. मंटोला तर वेडं ठरवलं गेलं. प्रगतिशील लेखकांनीही त्याला साथ दिली नाही. प्रगतिशील लेखकांनी मला ना ठोकरलं, ना डोक्यावर घेतलं. मंटो धुळीत मिसळला, कारण पाकिस्तानात तो कंगाल होता. मी पुष्कळच चांगल्या आर्थिक स्थितीत होतो. चित्रपटांमधून आम्हांला बर्यापैकी कमाई होत होती आणि `साहित्यिक मृत्यू वा जीवन’ यांची पर्वा नव्हती.
-
Tridhara
शिशिरबाबूंना वाटलं, आपलं सारं भविष्यच या नातवंडांच्या रूपानं आपल्याला कवळतंय ! आपण जाणार नाही आहोत ! आपण मरणार नाही आहोत ! ही मुलं... नातवंडं... यांत आपला अंश आहेच ! यांच्या रूपानं आपलं अस्तित्व शाश्वत आहे ! मग कशाची खंत ? कशाचं दु:ख ? आपण शेवटच्या घटका नाही मोजत आहोत. आपण पूर्ण शक्तीनिशी छाती भरून श्वास घेत आहोत ! एक आगळं चौतन्य शिशिरबाबूंच्या शरीरात सळसळू लागलं. शिशिरबाबूंनी खिडकीकडे दृष्टी वळवली. मावळतीचा सूर्य शेंदरी लाल होऊन चमकत होता. "अच्छा !" मी विस्मयानं टक लावून तिच्याकडे पाहू लागले. आज दुपारच्या स्वप्नात मणकी आणखी एक पद्मिनी होऊन माझ्या डोळ्यातून वाहत होती; पण आता ती एका द्रौपदीच्या रूपात माझ्यासमोर उभी आहे. द्रौपदी. अशी द्रौपदी, जी केवळ अर्जुनाचीच आहे... केवळ आपल्या अर्जुनाची. आणि नेहमी त्याचीच राहणार आहे. बादलीच्याजवळ पोहोचताच, त्यानं डोळे बंद केले. हात जोडले आणि मनातल्या मनातच म्हणाला, "हे शनिदेवा, मी तुझ्या बादलीतले पैसे घेतोय. मला पैशांची केवढी गरज आहे, हे तुला माहीत आहे. तुला इतके पैसे मिळताहेत. तू इतक्या पैशांचं काय करणार ? शिवाय, तुला गरज असेल, तर तू तुझ्या जादूमंत्रानं पैशांचा पर्वत उभा करू शकतोस, होय की नाही ? ठीक आहे. मी तुझ्या बादलीतले काही पैसे घेतोय. मी ते घेऊ नयेत, अशी तुझी इच्छा असेल, तर तू तुझी मान 'नको' अशी हलव. तू काहीच बोलला नाहीस, हलला नाहीस, तर त्याचा अर्थ होईल, मी पैसे घ्यायला तुझी काही हरकत नाही. ठीक आहे नं ?'"
-
Sukeshini
सुधा मूर्तीचं हे बालकथांचं दुसरं पुस्तक. यात काही भारतीय आणि काही विदेशी कथा आहेत, तर काही सुधा मूर्ती यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. नेहमी लबाडपणा करणा-या कोल्ह्याचं इथे परोपकारी रूप पहायला मिळेल. आजोबांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गाय, माकड आणि बुजगावणं इथे भेटतील. आलेल्या संकटांनी घाबरून न जाता चतुराईने त्यांवर मात करणा-या अनेक स्त्रिया पहायला मिळतील. जादूच्या मदतीनं संपत्ती मिळू लागल्यावर लोकांना मदत करणारे आणि तरीही श्रमांवरच भिस्त ठेवणारे तरुणही भेटतील. एका वेगळ्याच विश्वाची सफर या गोष्टी घडवून आणतील.
-
Geetkrushnayan
योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे यश, आरोग्य, सुख आणि समाधान यांचं जणू प्रतीकच. किंबहुना गोविंद हे आनंदाचंच सगुण स्वरूप ! अशा त्या परमेशाचं विश्वमोहक व्यक्तिमत्त्व, देदिप्यमान चरित्र आणि मार्गदर्शक शिकवण जनमानसापर्यंत मनोरंजक पद्धतीने पोहोचविण्याच्या आर्तातून जे निर्माण झालं तेच हे 'गीतकृष्णायन' ! 'गीतकृष्णायन' हा एक पुष्पहार आहे गोष्टीरूप धाग्यात गीतसुमने गुंफलेला ! ह्यातील गीतं कृष्णाच्या संपूर्ण आयुष्यातील निवडक प्रसंगांवर आधारित असून मराठी भाषेच्या पद्यदालनातील अनेकविध सुंदर जाति, छंद आणि वृत्तांचा वापर करून रचण्यात आली आहेत. सुसूत्र निवेदनाने ती एकत्र ओवली गेली आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या आनंददायी आणि उद्बोधक लीलांचा हा गोपाळकाला सर्वच रसिकांना रिझवून जावो हीच त्रिभुवनमोहन भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !