-
Antarnaad (अंतर्नाद)
कधी बाजीरावसारख्या बिल्डरला ‘अंतर्नादातून मिळते आत्मशक्ती...तर कधी महादेवसारख्या सद्वर्तनी व्यक्तीमुळे कळते एखाद्या गुन्हेगारालाही चांगुलपणाची किंमत...कधी एखादे आजोबा ‘धर्म’ या विषयावर बोलतात अतिरेक्यांशी...तर कधी श्रीयशसारख्या जीवनाबद्दल निराश झालेल्या इंजिनअरला युद्धामुळे हानी झालेल्या गावातून मिळते स्फूर्ती...तर कधी सदानंदसारख्या कॉम्प्युटर तज्ज्ञाला निर्णयाची चतु:सूत्री कॉम्प्युटरला फीड केल्यानंतर मिळतात आश्चर्यकारक रिझल्ट्स...तर कधी श्रीकांतसारखा एखादा प्रामाणिक अधिकारी जगदाळेसारख्या कामचुकार, राजकारणी सुपरवायझरवर उलटवतो त्याचा डाव...तर अनेक माणसं, त्यांच्या अनेक समस्या...माणसाच्या मानसिकतेतून उद्भवलेल्या...माणसाने जर मू्ल्यं अंगी बाणवली, सद्विचारांची कास धरली, संयम राखला तर तो निश्चितच त्या समस्येवर मात करू शकतो, असाच काहीसा संदेश देणार्या कथांचा हा संग्रह आहे...सकारात्मकतेचं महत्त्व अधोरेखित करणारा
-
Asa Lutla Bharat (असा लुटला भारत)
’वास्को द गामा’ने समुद्रमार्गे हिंदुस्थानात येण्याचा मार्ग शोधला व तीन शतके हिंदुस्थानात युरोपियन व्यापार्यांचा हैदोस चालला. हिंदुस्थानातील संपत्ती, मुबलकता व भौगोलिक-नैसर्गिक संपत्ती पाहून हिंदुस्थानला जणू विषारी विळखाच बसला. या लोभी देशांनी राजकीय कटकारस्थाने केली, करारनामे व त्यांचे योग्य पालन न करता विश्वासघात केला. जुलूम केला. फसवणूक केली. चुकीची व्यापारधोरणे, नवाबांनी कंपनीला दिलेल्या प्रचंड रकमा, बंगालचा र्हास, दुष्काळी परिस्थिती, मृत्यूचे वाढते थैमान याने देश ठाासला. मुघल सत्तेला वाईन भेट देऊन, मसाल्याच्या पदार्थांवर आक्रमण करून येथील बाजारपेठा ब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगिजांनी काबीज केल्या. आपल्या पराक्रमी योद्ध्यांनी प्राणांची बाजी लावून शह दिला व युद्धे जिंकली; पण मुस्लीम नवाब कंपनीच्या हातातलं बाहुलं बनले. घनघोर युद्धे लावून युरोपियनांनी व त्यांच्या कंपन्यांनी भारतास लुटले. स्वत:च्या तिजोर्या भरल्या. मन विषण्ण करणार्या, मानवतेला हरताळ फासणार्या वास्तवाचे भीषण दर्शन.