-
Krondhe Utpatila Bale (क्रोधें उत्पाटिला बळें)
प्रदीप कर्णिक यांची क्रोधें उत्पाटिला बळें ही कादंबरी रूढार्थाने मराठी कादंबरी वाङ्मयातल्या कुठल्याच संप्रदायात बसत नाही.मनोविश्लेषणात्मक, संज्ञाप्रवाही, अस्तित्ववादी असल्या चौकटीत मावणारीही कादंबरी नाही. या कादंबरीला म्हणावे असे कथानक नाही, नायक-खल नायक नाही, या नायकाच्याच नव्हे तर येथील प्रत्येक पात्रांत एक शून्यावस्था, एक पोकळी भरलेली आहे. ह्या शून्यावस्थेला छेदून बाहेर कसे पडायचे, या ध्यासाने मृत्यूच्या विहिरीत गरगरणाऱ्या नायकाने कादंबरी लेखनाचा गळ पकडून, स्वत:ला त्या विहिरीतून बाहेर पडता येईल याची धडपड चालवली आहे. ही कादंबरी वाचताना मानवी असतेपणाचे, मानुषतेच्या मूल्यांचे, प्रश्नांचे मोहोळ पानोपानी उठलेले दिसेल. माणसं इतकी क्रूर कां होतात असा प्रश्न उपस्थित झाला की, त्याचा मूळ स्वभावच रानटी आहे का? असा उपप्रश्न पुढे येतो, पाठोपाठ क्रोध शमवण्याचे मार्ग कोणते ? हिंसा हा क्रोध शमवण्याचा मार्ग असू शकतो का ? हिंसा मनातून जाऊन शांती कशी निर्माण होईल? मग महात्मा गांधींचा अहिंसा विचार येणार, बुद्धाची शांती येणार, तेंडुलकरांचे हिंसा आणि क्रौर्याचे चिंतन येणार. अशा संदर्भसंपृक्ततेतून प्रश्नांचे मोहोळ बाजूला सारून, उत्तराचा शोध घेण्यासाठी तडफडणाऱ्या मनाची कालवाकालव हा या कादंबरीचा विषय आहे. पराभव चालेल, पण पक्षी मरता कामा नये ही भूमिका असल्यामुळे निष्कर्षाप्रत येताना कथानिवेदकाची दमछाक होते. निवेदकाची सर्व बाजूंनी होणारी दमछाक हेच या अनुभवाचे संघटन-तत्त्व आहे आणि कलाद्रव्यही आहे. अशा या प्रायोगिक वळणाने जाण्याचे धाडस केल्याबद्दल प्रदीप कर्णिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
-
Tatvadnyani Dr.Babasaheb Ambedkar (तत्वज्ञानी डॉ .
यशवंत मनोहर यांनी 'तत्त्वज्ञानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या पुस्तकात बाबासाहेबांचे विश्वपुनर्रचनेचे तत्त्वज्ञान अधोरेखित केले आहे.
-
Swapnamohini (स्वप्नमोहिनी)
ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य .….. धाडसी, हरहुन्नरी, हजरजबाबी, प्रसंगावधानी अशा दिक्पालची मंगळावर जाण्यासाठी निवड झाली . पृथ्वीवरील मानवांचा प्रतिनिधी म्हणून मंगळावर जाण्याचा प्रथम मान मिळणं, ही भूषणावह गोष्ट होती . दिक्पाल मंगळावर उतरला …यानातून बाहेर पडून चालत जाताना त्याच्या सहकाऱ्यांना तो दिसलाही … पण तेवीस दिवसांनी परत येणं अपेक्षित असणारा दिक्पाल तब्बल २५ ९ दिवसांनी परतला. एवढे दिवस कुठे होता तो? विश्वातल्या अज्ञात, अकल्पित आणि अनपेक्षित घडामोडींची आणि मानवाच्या राक्षसी महत्वाकांक्षेची थरारक कथा.. स्वप्नमोहिनी! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी
-
Aathavani Mamanchya (आठवणी मामांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे मामासोबतच्या मैत्रीचं… नात्याचं ! मामा-भाचरांच्या नात्यांत एक वडिलकी आणि मैत्र याचं मिश्रण असतं. म्हणूनच हे नातं नेहमी तरूण राहतं. मामांच्या बहुपेडी आठवणी सांगत आहेत… बाळासाहेब थोरात, अमृता सुभाष, प्रदीप चंपानेरकर, किशोर मेढे, राजेंद्र मलोसे, प्राची रेगे, सुचिता घोरपडे आणि अश्विनी देसाई !
-
Aathavani Aajobanchya (आठवणी आजोबांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजोबांच्या आठवणीचं । आजोबा म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं विसंबून राहण्याचं हक्काचं ठिकाण! आजोबांचे अनुभवाचे चार बोल, त्यांची पाठीवर पडलेली थाप आत्मविश्वास देत असते. आजोबांच्या आठवणींचे पदर उलगडत आहेत… विश्वास पाटील, विजयराज बोधनकर, अन्वर हुसेन, सुनील मेहता, उदय निरगुडकर, लक्ष्मण खेडकर ।
-
Aathavani Aajichya (आठवणी आजीच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजीच्या आठवणींचं । आजीच्या तलम प्रेमाची सर कशालाच येत नाही. मऊ दुलईची ऊब देणाऱ्या पण प्रसंगी कणखरही होणाऱ्या आजीच्या बटव्यात बराच काही खजिना असतो. त्याच विषयीचे अनुभव सांगत आहेत…. मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे व राजीव खांडेकर।
-
Bhatkanti Saptarangi Betanchi (भटकंती सप्तरंगी बेट
कोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत… अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची आपल्याला सैर घडवून आणत आहे प्रधान दाम्पत्य ! विशेष गर्दी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेटांवर जाऊन राहणं, तेथील निसर्ग भरभरून अनुभवणं, तेथील स्थानिक खाद्य-पेयांचा आस्वाद घेणं, घेणं तेथील वेगळी संस्कृती, प्रथा समजून हा प्रधान दाम्पत्याचा आवडीचा उद्योग…. गाठीला असलेला हा अनुभव रसिक वाचकांसमोर खुला करून प्रधान ती बेटं, तो प्रदेश डोळ्यासमोर उभा करतात. अशा तऱ्हेच्या फिरण्यातून पर्यटनाचा एक वेगळा आनंद कसा मिळू शकतो याची एक नवी दृष्टी ते पर्यटकांना भटकंती सप्तरंगी बेटांची या पुस्तकातून देतात . कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ? ऐकलं आहे का तुम्ही या बेटांबद्दल ? स्पेनमधले बॅलेॲरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे ११५ लहान – मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई बेटं ग्रीस मधली पांढरी निळी बेटं लहान – मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून झालेला व प्राचीन वारसा लाभलेला इंडोनेशिया नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेटं .. अशा अनेक बेटांची सप्तरंगी सफर…
-
Theranos (थेरॅनॉस)
स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला … या ‘ इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता … पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण , डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी …. थेरॅनॉस !
-
Spy Stories-The Zero Cost Mission (स्पाय स्टोरीज द
द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ? थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !
-
Spy Stories -Terror In Islamabad (स्पाय स्टोरीज -ट
टेरर इन इस्लामाबाद पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो . वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं . तो ते फार सावधपणे पार पाडत असतो… आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं , माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ? थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !