-
Haat Vidhatyache (हात विधात्याचे)
"टेनफिंगर्स फॉर गॉड' हे पुस्तक म्हणजे डॉ. पॉल ब्रँन्ड या कर्म तपस्याची विलक्षण जीवनगाथा. त्यांना वैद्यकीय व्यवसायातील संतच म्हणावे लागेल. कारण आपलं संपूर्ण आयुष्य आणि वैद्यकीय ज्ञान त्यांनी जगभरातल्या अगणित कुष्ठरोग्यांच्या हालअपेष्टा दूर करण्यासाठी वेचलं. शस्त्रक्रियांद्वारे, संशोधनाद्वारे, इतरांना दिलेल्या प्रेरणेद्वारे - आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजानं दूर लोटलेल्या गरीब कुष्ठरोग्यांना दाखविलेल्या सहानुभूतीमुळे त्यांना वौद्यकीय जगतातच नहे तर जनमानसातही अलौकिक किर्ती लाभली आहे. डॉ. ब्रँन्ड यांच्या यावसायिक आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे एक अनोखा विषय - विधात्यानेच निर्माण केलेला एक अविष्कार - वेदना. ते एका वेगळ्याच नजरेने या विषयाकडे बघतात. वेदनेचं मानवी आयुष्यातील स्थान त्यांना फार महत्त्वाचं वाटतं. ते म्हणतात, शारीरिक वेदना हे मनुष्यमात्राला परमेश्वरानं दिलेलं एक वरदान आहे. वेदना आहे म्हणूनच माणूस टिकून आहे. डॉ. ब्रँन्ड हे एक शल्यविद्या विशारद तर आहेतच, पण ते एक उत्कृष्ट शिक्षक आणि पर्यावरणवादी ही आहेत. स्वार्थ, त्याग आणि विनम्रता यांचं विलक्षण मिश्रण म्हणजेच डॉ. पॉल ब्रँन्ड!
-
Prakashachi Jhade
मनुष्य नावाच्या हिंस्र श्वापदांनी भरलेल्या अरण्याचा वसु भगत यांच्या लेखणीने समर्थपणे घेतलेला वेध म्हणजेच मानवी जीवनाचे अनेकविध कंगोरे दाखविणा-या कथांचा हा संग्रह ! कच्चे गोश्त खाण्याची भाषा करणा-या सामान्य माणसांसोबतच सामान्य राहून आपले वेगळेपण जपणारी माणसे या कथांमधून आपल्याला वळणावळणावर भेटत राहतात, जशी घनगर्द अरण्यात प्रकाशाची झाडे !
-
The Associate (द असोसिएट)
पेनिसिल्वानिया मधील यार्क गावातल्या वकीलांचा मुलगा काईल मॅकअवॉय ये कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतो. "येल लॉ जर्नल'' चा मुख्यसंपादक म्हणून शेवटच्या वर्षी मान पटकावतो. कॉलेजच्या चार वर्षांमधले त्याचे आणि त्याच्या मित्रांचे एक काळे गुपित काही लोकांच्या हाती लागते आणि ते काईलला जाळ्यात अडकवतात. वरवर चांगला वाटणारा, लॉच्या अनेक विद्यार्थ्यांना हवाहवासा वाटणारा पण काईलला नको असणारा जॉब त्याला घ्यावा लागतो. एका मोठ्या फर्मचा असोसिएट बनण्याचे आमिष त्याला - दाखविले जाते. एका मोठ्या लॉ फर्ममध्ये तो जॉब स्वीकारतो. अमेरिकेसाठी एअरक्राफ्" बनविणाऱ्या कंपनीकरता ही फर्म काम करीत असते. आपल्या अस्तित्वासाठी काईलला परिस्थितीशी जबरदस्त झगडावे लागते. मोठ्या निग्रहाने सामना करावा लागतो. त्यात तो यशस्वी होतो का? हे या कादंबरीतच वाचायलाच हवे.
-
Asmita
अस्मिता फुरसुंगीकर, भारतीय लष्करातील कर्नलच्या मुलीचे अपहरण झाले. शोध घेण्याची जबाबदारी संजय पाटील य पोलीस अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली. मालाड नदी, जहागीरदार अहवाल, मुशी कट्यार, मृत्युंजय यज्ञ, घारापुरी बेट, इराडी देवी, अलिबाग किल्यातील तळघर यातील गूढरहस्य, मुंबईपासून अलिबागपर्यंतच्या शोध मोहिमेत संजयची गाठ पडली आहे अघोर पंथातील सिद्धीपुरुष सर्पराजमहाराजांशी, त्याला तोंड देण्यासाठी मदत घ्यावी लागली ती अध्यात्म जगातील श्री गुरुमणी यांची आणि सुरु झाला जीवघेणा संघर्ष.
-
Local Majhi Sakhi
मुंबईच्या एस.एन.डी.टी विद्यापीठात पर्यावरणावर झालेल्या चर्चासत्रात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला. तो होता, मुंबईचा लोकल-प्रवास . लोकल प्रवासावर संशोधन करून वाचलेला पेपर. त्यात म्हटलं होतं की मुंबईचा लोकल-प्रवास हे संथ मरणाचं सावट आहे. या एका वाक्याने लेखिका दचकली. कारण तीही रोज लोकलने प्रवास करत होती. लोकलमध्ये रोज घडणार्या, घाबरवणार्या घटनांची ती साक्षीदार होती. त्यामुळे संथ मरणाचं सावट या संकल्पनेनं ती मुळापासून हादरली. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या महानगरात, सामाजिक, राजकीय अशा बेमुर्वत घटनांनी लोकल-प्रवाशांना बसणारा फटका, उदा. रेलरोको, बॉम्बस्फोट, आगी लागणे, झोपडपट्टीवाल्यांची दादागिरी, सिग्नल-यंत्रणा ठप्प होणे. परिणामी चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचायला होणारा उशीर, लेटमार्क होणे वगैरे. या गोष्टी प्रवाशांच्या आवाक्यातल्या नसतात. यातून वैयक्तिक समस्या निर्माण होतात. आयुष्याचा समतोल बिघडत जातो. सत्य घटनांवर आधारित कादंबरी.