-
Rajkaran aani Madhyame ( राजकारण आणि माध्यमे )
राजकारण आणि माध्यमे यांचा परस्परसंबंध उलगडणारे हे पुस्तक आहे. तसेच राजकारणाविषयी माध्यमांची भूमिका स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे. राजकीय वार्तांकनाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचे बारकाव्यांसहित विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. माध्यम, राजकारण आणि लोकशाही या सर्व बाबींचा परामर्श लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे राजकारण, पत्रकार आणि माध्यमे यांचा परस्परानुबंध स्पष्ट करणारे जणू व्यासपीठच आहे.
-
Aatmyache Nav Avinash ( आत्म्याचे नाव अविनाश )
स्वामी विवेकानंद आणि गांधीजींना गुरुस्थानी मानून ‘ भारताचा कार्यकर्ता ‘ होण्याचं ध्येय निश्चित करून आयुष्याला उद्दात अर्थ देणारा सोळा वर्षाचा एक युवक – अविनाश धर्माधिकारी . १९८६ मध्ये महाराष्ट्रातून ला निवडला गेलेला एकमेव मराठी अधिकारी . त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रसाशकीय सेवेत , सामाजिक सांस्कृतिक शेक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं आणि जगाच्या नकाशावर ” चाणक्य मंडळ परिवार ” चं अढळ स्थान निर्माण केलं . अनेक महत्वाच्या विषयांना स्वतःला पणाला लावलं . स्वतःच्या विचारांनी अनेक क्षेत्रात योगदान दिलं . ध्येयावर अचल निष्ठा असणाऱ्या , युवावर्गाचं आकर्षण असणाऱ्या त्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी अशी हि चरित्रगाथा … वाचली पाहिजे अशी . माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्त्वाची ही प्रेरणादायी चरित्रगाथा आहे. त्यांनी प्रशासकीय सेवेत, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रांत त्याचबरोबर चाणक्य मंडल परिवार या ठिकाणी स्वत:च्या कर्तृत्वाने जे अढळ स्थान निर्माण केलं, त्याचा हा लेखाजोखा! अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अविनाशी’ कर्तृत्व या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचले आहे. अविनाश धर्माधिकारी यांची ‘व्यक्तिमत्त्वाकडून विभूतिमत्त्वाकडे’ होत असलेली वाटचाल या पुस्तकात चित्रित झाली आहे.
-
Janmashtami ( जन्माष्टमी )
जन्माष्टमी – आठव्या मुलाच्या अभ्दुत लीला या पुस्तकाद्वारे कृष्णाशी असणारा आपल्या सर्वांचा प्रेमळ बंध अधिक दृढ होण्यासाठी , आपल्या मनात उदात्त भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे. या पुस्तकामध्ये अशा सूक्ष्म तात्विक दृष्टिकोना द्वारे कृष्णाच्या बालपणीच्या लीलांचादेखील वर्णन आकर्षकरीत्या करण्यात आले आहे.
-
Nishkriyatela Bahane Hajaar! ( निष्क्रियतेला बहाणे
आयुष्यात आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यामध्ये उद्भवणार्या निष्क्रियतेच्या अडचणींमध्ये न अडकता प्रयत्न सुरू ठेवण्याचं महत्त्व विशद करणारं हे पुस्तक आहे. अनेक उदाहरणांसहित खुमासदार शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विचारप्रवृत्त करणारं आहे. निष्क्रियतेच्या साखळीतून बाहेर पडून आपणास क्रियाशील राहण्यासाठी उद्युक्त करणारे असे मौलिक विचार पुस्तकात उद्धृत झाले आहेत. उत्कट, मानवी चैतन्याचे प्रशंसक, आपल्या क्षमतांवर विश्वास असणारे आणि त्यादृष्टीने पूर्ण वेळ शिष्यत्व पत्करणारे… या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. कृती आणि प्रेरणा यांवर ठाम विश्वास असणार्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे.
-
Nava Vijaypath ( नवा विजयपथ )
UPSC आणि MPSC नागरी सेवा परीक्षांबरोबर भारतातील अन्य महत्त्वाच्या स्पर्धापरीक्षांविषयीची अद्ययावत माहिती हे पुस्तक देते. करिअर कसे निवडावे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व निबंध यांसाठी लेखन कसे करावे, प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करावा यांसारख्या मूलभूत मुद्द्यांचा सर्वंकष ऊहापोह हे पुस्तक करते. स्पर्धापरीक्षांना नुकतीच सुरुवात करू इच्छिणार्यांना प्रशासनातील आपल्या अनुभवांद्वारे लेखकाने मार्गदर्शन केले आहे. UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या विजयाप्रत घेऊन जाणारे अत्यंत वाचनीय असे पुस्तक.