Atmaprakash (आत्मप्रकाश )
डॉ. अंजली भाटवडेकर मुंबईच्या बालरोगतज्ज्ञ असून त्या गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबर अनेक वर्षे त्या आध्यात्मिक साधना करत आहेत. दैनंदिन जीवनातल्या आव्हानांना सामोरे जाताना ध्यान व आध्यात्मिक साधनेतून प्राप्त झालेल्या अनुभूतींचे आणि चिंतनांचे संकलन या पुस्तकातील लेखांमध्ये आहे. आपल्या वैयक्तिक प्रवासाबद्दल त्या मोकळेपणाने लिहितात. हे लिहिताना त्यांना स्वतःमधील बलस्थानांचे व उणिवांचे भान आहे. त्यातूनच आत्मविकासाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या करतात. ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात डोकावून आपले प्रतिबिंब पाहिले असेल अशांना या पुस्तकातले अनुभव भावतील. या पुस्तकात विविध आध्यात्मिक गुरूंची वचने व लेखिकेचा त्यावरील दृष्टिकोन आढळेल आणि त्यातून एक व्यावहारिक व वैचारिक मार्गदर्शन मिळेल.