Gandhi Ani Railway (गांधी आणि रेल्वे)
भारतीय जनमानसाला रेल्वेबद्दल एक खास आकर्षण आहे. तिचा वेग, तिचा रुबाब आणि तिचे नादबद्ध भरधावपण साहित्यातील अनेकांना भुरळ घालत आले आहे. रेल्वेच्या भारतातील आगमनानंतरचा इतिहास जसा सांगता येतो; तसाच इतिहासातील रेल्वेचे स्थानदेखील सांगता येते. हा शोध म्हणजेच गणेश मनोहर कुलकर्णी यांचे गांधी आणि रेल्वे हे पुस्तक. हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गांधींचे योगदान आणि त्यात रेल्वेचे असणे कसे अधोरेखित होते हे या शोधातून कुलकर्णी यांनी वाचकांसमोर ठेवले आहे. या शोधाच्या अनुषंगाने इतरही बरेच काही वाचायला देणारे हे पुस्तक माहिती आणि रंजनाच्या सीमारेषेवर उभे आहे. म्हणूनच त्याचे मोल प्रस्तुतच्या काळात वेगळे ठरते.