-
Umbarkhind (उंबरखिंड)
इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड वाचकांसाठी सज्ज शाहिस्तेखानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली. सोबत दीड लाख तलवारी, एक लाख ढाली, बारा हजार बंदुका, चाळीस हजार भाले आणि दहा लाख रूपयांचा खजिना सोबत पाठवला. हजार मुडदे पडले तरी चालतील पण कोकण जिंकायचंच या इराद्याने शाहिस्तेखानाने कारतलबखान नावाच्या सरदाराकडं ही मोहीम सोपवली. कारतलबखान म्हणजे हाती तलवार नसेल तर दातांनी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि तेवढाच क्रूर सरदार. मोठ्या रुबाबात आणि विजयीभावानं मुघलांचा ताफा पुण्याहून निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात पोहचला. पण, लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहतच थांबले होते आणि या वाघांचं नेतृत्व करत होते स्वत: छत्रपती शिवाजी महाराज. तीस हजार सैनिक, दहा सरदार आणि शाहिस्तेखानाचीही मती गुंग करणारा इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा म्हणजेच उंबरखिंड. आजपासून ही कादंबरी वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. उन्हाळ्याच्या सुट्टीत ही कादंबरी अवश्य वाचा आणि घरातील लहान मुलांनाही वाचायला द्या. साधी, सोपी आणि सुटसुटीत लेखनशैली...
-
Sadhuputra Shambhu (साधूपुत्र शंभू)
आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वत: अग्नी दिला.' शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात... प्रत्यक्षात शंभूराजे जिंवत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढेच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन- दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्याने शंभूराजांच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धुळदाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले. कसे ? उत्तर हेचि #शंभू
-
Kshatriyakulawant Sadhu (क्षत्रियकुळावंत साधू)
शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.
-
Petlele Morpees ( पेटलेलं मोरपीस )
समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतल्या त्या दोघी लहानपणापासून एकत्र वाढल्या आणि आयुष्याच्या एका वळणावर त्यांना एकमेकींबद्दल आकर्षण वाटू लागलं आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला,मात्र त्यांच्या लेस्बियन असण्याचा फायदा त्यांच्याच घरच्यांनी राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी कसा करून घेतला, हे सांगणारी नितीन थोरात यांची उत्कंठावर्धक कादंबरी 'पेटलेलं मोरपीस'...
-
Soang ( सोंग )
संज्यानं दोन वेळा साडी नेसली होती ती फक्त परिस्थिती तशी होती म्हणून. एकदा सोंगात आणि एकदा नाटकात. पण आता त्यानं कायमस्वरूपी साडी नेसायचं ठरवलं होतं. त्याला हे जमेल? नितीन थोरात यांची आगळीवेगळी कादंबरी.. सोंग...