-
Swapnashil (स्वप्नशिल)
कामिनी मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्धीस पावले. जगभरातील शिल्पकारांनी आणि रसिकांनी आचार्य अश्विनीकुमारांच्या कलेची प्रशंसा केली. मात्र कामिनीशिल्प वस्त्राच्छादित होते, त्यामुळे अनेकांची निराशा झाली. कामिनी कुरूप होती, असाही एक समज पसरला. अनेक शिल्पकारांनी कामिनी शिल्पाचे काम पूर्ण करण्याची तयारी दर्शवली, पण कुणालाही ते पूर्ण करणे जमले नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला असता त्यांची त्वचा भाजून निघाली. त्या शिल्पाची प्रसिद्धी झाली, ती याच कारणास्तव ! जवळपास दोन तपे निघून गेली. महाराज विक्रमादित्य द्वितीय आता वृद्धत्वाकडे झुकू लागले. त्यांना अजूनही त्या शिल्पकाराची प्रतीक्षा होती, जो कामिनीला पूर्णरूप देणार होता. कोण होती ही कामिनी ? काय होती कामिनी मंदिरामागची कथा ? काय आहे कामिनीशिल्पाचे रहस्य ?