-
Chehare (चेहरे)
'चेहरे' या पुस्तकात फोटोग्राफ्स तर आहेतच त्याचबरोबर किस्से, निरीक्षणे, कॉमेंट्स आणि लेखही आहेत. या पुस्तकात 70 व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. त्यात चित्रपट सृष्टीतील कलावंत तर आहेतच पण जेआरडी टाटा, रतन टाटा असे उद्योगपती, भीमसेन जोशींसारखे दिग्गज गायक, सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर असे जागतिक स्तरावरील खेळाडू आणि सॅम माणेकशॉ यांच्यासारखा सेनानाही आहे. चित्रपट क्षेत्राबरोबरच, उद्योग, कला, क्रीडा, संगीत अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचे मिश्रण "चेहरे'मध्ये बघायला मिळते.