Yugandhar Shreekrushna Ek Chintan (युगंधर श्रीकृष्ण एक चिंतन)

By (author) Shivaji Sawant Publisher Mehta Publishing House

श्रीकृष्ण ही लोकोत्तर व्यक्तिरेखा; पण केवळ चमत्काराच्या चष्म्यातून त्याच्याकडे न बघता, त्याचं लोकोत्तरत्व जाणून घेणं कसं महत्त्वाचं आहे, ते या पुस्तकरूपी चिंतनातून शिवाजी सावंत यांनी अधोरेखित केलं आहे. ‘युगंधर’ ही कादंबरी लिहिण्याआधी त्या कादंबरीतून श्रीकृष्णाचं व्यक्तित्व ते कसं उलगडणार आहेत, याची ही रूपरेषा आहे. खरंच, मराठी साहित्यात आज श्रीकृष्ण आवश्यक आहे काय?, श्रीकृष्णाचं मराठी लोकजीवनाशी असलेलं अतूट, तिपेडी भावनातं, वैज्ञानिक युगाच्या पसार्‍यात धर्माचं स्थान कोणतं? श्रीकृष्ण धर्मसंस्थापक होता काय? खरंच, बालकृष्ण कसा असेल? ‘युगंधर’ शीर्षकाची पार्श्वभूमी, तसं ‘युगंधरा’चं सार्थ चित्र एक तरी चितारलं गेलंय का?, ‘कृष्णा’चा युगंधर कसा झाला?, कंस ही गुंतागुंतीची व्यक्तिरेखा कशी?, श्रीकृष्णाचं वास्तव बालपण कसं असेल?, गीतोपदेशासाठी अर्जुनाचीच निवड का?, राधा-मीरेपासूनचे श्रीकृष्णभक्त इ. मुद्द्यांच्या आधारे त्यांनी श्रीकृष्णाचा आणि त्याच्या युगंधरत्वाचा वेध घेतला आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category