-
The Vault of Vishnu (दि व्हॉल्ट ऑफ विष्णू)
अश्विन संघी यांचे हे नेहमीप्रमाणे गूढ आणि उत्कंठावर्धक कथानक आहे, जिथे इतिहास आणि मिथक यांचा मिलाप होतो. `द व्हॉल्ट ऑफ विष्णू` या कादंबरीमध्ये पल्लवाचा राजकुमार कंबोडियाचा राजा होण्यासाठी जातो. सोबत त्याने जपून नेलेली गुपितेच अनेक शतकांनंतर युद्धाची कारणे बनतात. प्राचीन चीन मधील एक बुद्ध साधू एका कोड्याचे धागे शोधत भारतात येतो. ते कोडे सोडवल्याने त्याचा राजा सर्वशक्तिशाली होणार असतो. भारत - चीन सीमेवरील युद्धामुळे ज्ञानसंवर्धनासाठी आदिवासी जमातींनी चालवलेला लढा दुर्लक्षित राहतो. दरम्यानएक शास्त्रज्ञ कांचीपुरम मधील मंदिरातील प्राचीन लिपीचा अर्थ उलगडण्यात यशस्वी होतो. या प्रवासात सिक्रेट एजंट त्याच्या मागावर असतात. या सगळ्या वादळात एक अन्वेषक सापडते. तिचा स्वतःचाही गुंतागुंतीचा भूतकाळ आहे. जगाचा तोल सांभाळला जाण्यासाठी तिला काळ वेळेविरुद्ध शर्यत करावी लागते.
-
Mohanswami (मोहनस्वामी)
`गे` जीवनाच्या अंधकारमय कोशातून बाहेर पडण्याचा हा अखेरचा मार्ग असल्याचे सूचित करण्याचा प्रयत्न लेखकांंनी या पुस्तकामधून केला आहे. दोन पुरुषांमधील कामजीवनाचे वर्णन करणाऱ्या या कथा, परंपरागत रूढीमध्ये बंदिस्त असलेल्या समाजातील वाचकांच्या पचनी पडण्यासारख्या नाहीत. त्यामुळे ते चक्रावून जाण्याची शक्यता आहे. या पुस्तकातील मोहनस्वामीच्या कथांमध्ये लैंगिक जीवन, नागरीकरण आणि जातीपातींमधील संघर्ष यांचे रोखठोक आणि काहीशा स्पष्ट शब्दांत केलेले वर्णन वाचकांना अचंबित करण्याची शक्यता आहे.इंग्लिश , तेलुगू, मल्याळम् आणि स्पॅनिश भाषांमधून अनुवादित झालेल्या या पुस्तकाची मराठी आवृत्ती वाचकांसमोर ठेवून कन्नड साहित्याच्या एका महत्त्वाच्या पैलूचा परिचय करून देण्याचा आमचा मनोदय आहे. कार्तिक नावाच्या आपल्या दीर्घकालीन मित्राला मोहनस्वामी पारखा झाला आहे. एका सुंदर मुलीने कार्तिकला त्याच्यापासून हिरावून घेतले आहे. सर्व जुन्या आठवणी चितेप्रमाणे त्याला जाळत आहेत. तसे पाहिले, तर त्याची अपेक्षा काही फार मोठी नाही. एक साधे, सरळ मानाचे जीवन जगण्यासाठी तो धडपडत आहे. पुरुष गणिका, वाघीण अशी घाणेरडी नावे देऊन समाजाने त्याच्या मनावर जखमा केल्या आहेत. गतजीवनातील मनाला झालेल्या जखमा, अपमान, भीती, आतंक आणि वैफल्य हे सर्व विसरून नवीन जीवनाची वाटचाल सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठीच आटापिटा सुरू आहे.
-
The Eleventh Commandment (द एलेव्हन्थ कंमांडमेंट)
मेडल ऑफ ऑनर विजेता कॉनर फिट्सगेराल्डची ही अफलातून कथा. कुटुंबवत्सल, सच्चा, फिट्सगेराल्ड अठ्ठावीस वर्षे दुहेरी आयुष्य जगतोय. एका निशान्यात लक्ष साधणारा हा सीआयएचा अतिशय तरबेज गुप्त मारेकरी. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना या दुहेरी आयुष्याला निरोप देण्याची स्वप्नं पाहत आहे. पण तेव्हाच त्याची प्रमुख हेलन डेक्स्टर त्याची शत्रू ठरतेय. डेक्स्टरचं सीआयएतलं भविष्य धोक्यात आलं आहे. आणि त्यातून निसटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फिट्सगेराल्डचा काटा काढणं. फिट्सगेराल्डला रशियाच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येसाठी नेमलं जातं, पण त्याच मोहिमेत फिट्सगेराल्डचा स्वतःचाच काटा काढण्याची योजना आखली जाते. आणि एक उत्कंठावर्धक नाट्य रंगतं. पानागनिक उत्कंठा वाढवणारं कथानक, दमदार पात्ररचना असलेलं जेफ्री आर्चरचं राजकीय नाट्य.