-
Maharashtratil Leni (महाराष्ट्रातील लेणी)
महाराष्ट्राची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यात दुर्ग आणि लेणी ही महान वैशिष्ट्ये होत. जगातील सर्वाधिक दुर्ग (किल्ले) नि लेणी महाराष्ट्रात आहेत. दुर्गांकडे त्यामानाने पर्यटकांचे, अभ्यासकांचे, जिज्ञासूंचे बर्यापैकी लक्ष वेधले गेलेले आहे, पण लेण्यांकडे त्यामानाने अजून तितकेसे लक्ष गेलेले नाही. अजंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, घारापुरी, बेडसे (भेडसे), कान्हेरी आदी लेणी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी पावलेली आहेत पण त्याव्यतिरिक्तही खूप-खूप लेणी महाराष्ट्रात आहेत. ही संख्या शंभरच्या पुढे आहे. लेणी हा आपला महान अलंकार आहे, वैभव आहे. समृद्ध सांस्कृतिक ठेवा आहे.अशा लेण्यांचा इतिहास सुमारे दोन-सव्वादोन सहस्र वर्षांचा आहे. डोंगरात खोदलेली ही लेणी हे अद्भुत शिल्प बघून मनुष्य थक्क होतो. लेणी पाहाणे, अभ्यासणे, हा मोठाच आनंद आहे. ही लेणी आपल्याला प्राचीन काळात घेऊन जातात. वैदिक-बौद्ध-जैन ह्यांच्या एकात्मतेचा हा वारसा आहे. पर्यटक, अभ्यासक, प्रवासी, सहलींचा आनंद लुटणारे ह्यांच्यासाठी हे पुस्तक आवर्जून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे लेणी समजून घेणे सोपे जाईल. तीस लेण्यांचा इथे परिचय करुन दिलेला आहे. आपण अवश्य पाहावे, वाचावे, संग्रहावे असे हे पुस्तक.
-
Ten Percent (टेन पर्सेंट)
गावाकडे शिक्षणाचे वारे वाहू लागले तसे तेथील शिक्षित शहरात कामासाठी येऊ लागले. मराठवाड्यातील शिवा रामा पाटील हाही बीएस्सीच्या जोरावर कामासाठी मुलाखती देऊ लागला; पण कधी मुलाखतकाराकडून नकार, कधी कमी पगार म्हणून शिवाचा नकार असे चालत असतानाच तो सेंट्रॉन कंपनीत पोचतो; पण तेथेही रिटेनर म्हणूनच कामे मिळतात. कायमस्वरूपी नोकरी मात्र मिळत नसल्याने आणि आज तेथे तर उद्या कुठे हा प्रश्न असल्याने तो नैराश्येने ग्रासतो. त्यातून बाहेर पडत सेंट्रॉनच्या साहेबांच्या सल्ल्याने स्वतःची कंपनी काढून प्रशिक्षण वर्ग सुरू करतो. त्याला प्रतिसादही चांगला मिळतो; पण हे काम सरळ, सोपे नसते. त्यात ‘टेन पर्सेंट’चा हात असतो. सरकारी असो व खासगी कंपनीचा अधिकारी, कर्मचारी हातावर काहीतरी टेकवले, तरच काम सोपे होते, हे आता शिवा शिकलेला असतो. राष्ट्रीय रोजगार योजना त्याच्या मदतीला येते आणि त्याची दशकभराची बेकारी दूर होते. शिवासारख्या हजारो सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आयुष्य विकास एखंडेपाटील यांनी ‘टेन पर्सेंट’मधून उलगडून दाखविले आहे.
-
Coffee Can Investing (कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग)
आपली बचत दृश्य मालमत्तेत घालण्याऐवजी आर्थिक मालमत्तेत घालणे, हा या दशकात घडून आलेला महत्त्वाचा बदल आहे. हे पुस्तक या बदलामागची कारणं काय हे आपल्याला दाखवून देते आणि त्यानंतर संपत्ती निर्माणाच्या रस्त्याचा नकाशाच काढून देते, जो जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला अनुसरता येईल. भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील भूलभुलैयात योग्य मार्गाने जायचे असेल आणि भारतीय शेअर बाजारात सातत्याने पैसा कमवायचा असेल, तर तुम्ही उच्च दर्जाचे प्रतिभावंत वगैरे असण्याची कशी गरज नाही हे दाखवण्याचं काम हे पुस्तक करते. ज्या कुणाला विवेकबुद्धी वापरून गुंतवणूक करायची आहे आणि सुखेनैव निवृत्त व्हायचे आहे, अशा सर्वांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
-
Maharashtratil Aitihasik Wade (महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे)
'वाडा' म्हटले की डोळ्यांपुढे चौसोपी घरातील नांदती कुटुंबे येतात. वादा म्हणजे गोकुळच असे. राजे, त्यांचे मंत्रीगण यांचे वडे तर जास्तच अलिशान असत, पण पुढे आर्थिक स्थितीमुळे वाड्यांची जागा अपार्टमेंटने घेतली. आता तर जुने वाडे म्हणजे इतिहासाच्या मागे राहिलेल्या खुणा आहेत. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे जुने वाडे आजही उभे आहेत. त्यांचे जतन डॉ. सदाशिव स. शिवदे यांनी पुस्तकातून केले आहे. 'महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे (भाग १) मध्ये एकूण ५० वाड्यांचे वर्णन त्यांनी केले आहे. वस्तूची विविधता, बांधकामातील वैशिष्ठ्ये, रेखीवपणा याची माहिती स्थापत्य विशारद व इतिहास संशोधक व सामान्य वाचकांसाठीही उत्कंठापूर्ण ठरेल.
-
Chaldhakal Karnyapasun Mukti (चालढकल करण्यापासून मुक्ती)
सगळेच जण कधी ना कधी कामाची टाळाटाळ करतात. आपण गोष्टी पुढे ढकलतो; कारण त्या कराव्याशा वाटत नाहीत, किंवा आपण इतर कामांना प्राधान्य देत असतो. कधी कधी काम सुरू करणंच खूप कठीण होऊन बसतं ! काही वेळा आपण स्वतःला समजावतो की अजून थोडा वेळ मिळाला तर वेगळा दृष्टिकोन बाळगून किंवा नव्या ऊर्जेने काम सुरू करू. लहान-मोठ्या कामांची टाळाटाळ करणं हा मनुष्य स्वभावच आहे. पण जेव्हा या कामाच्या दिरंगाईमुळे आपल्याला हताश वाटू लागतं आणि ते काम डोईजड होऊ लागतं. तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या कामावर, घरात किंवा नात्यांवर दिसू लागतो. अशा वेळी त्या दिशेने हातपाय हलवणं अनिवार्य ठरते. तुम्हाला प्रत्येक कामाची टाळाटाळ करण्याची सवय आहे का ? त्यावर उपाय आहे. पण एका रात्रीत तुमची सवय बदलेल अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एके दिवशी अचानक कामाची दिरंगाई करणं सोडून देणार नाही. पण हळू-हळू, एखाद-दोन सोपी कामं पार पाडू शकता, जेणेकरून तुमचे काम लवकर आणि अधिक त्रासाशिवाय पूर्ण होईल. दिरंगाईचा भार दूर केल्यावर, तुम्हाला जो मोकळेपणा जाणवेल त्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. याचे फायदे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतीलच.
-
Aatmasamman (आत्मसन्मान)
जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल, तर लोकांनी तुमच्यावर विधार ठेवावा अशी अपेक्षा तुम्ही कशी ठेवू शकता? लोकांच्या मनातील तुमची प्रतिमा म्हणजे आत्म-सन्मान नव्हे- स्वतःकडे तुम्ही कसे पाहता याला आत्मसन्मान म्हणतात. आत्मसन्मान हा जन्मापासून जोपासला जातो. आणि जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. जर तुमचा आत्मसन्मान उच्च असेल, तर तुम्हाला मिळणारे यशही तेवढेच मोठे असते. सकारात्मक आत्मसन्मानामुळे आत्मविश्वासाने कृती केल्या जातात आणि योग्य निर्णय घेतले जातात. नकारात्मक आत्म-सन्मान असल्यास आत्मविश्वासाचा अभाव, भित्रेपणा आणि निर्णय घेण्यात चालढकल करणे असे वर्तन दिसून येते. जसजसा तुमचा आत्मसन्मान वाढीस लागतो, तसतसे तुमचे खरे स्वरूप प्रकट होऊ लागते. तुम्ही जोखीम उचलू लागता आणि अपयशाचे भय कमी होते; तुम्हाला इतरांचा पाठिंबा आहे की नाही याची फारशी फिकीर वाटेनाशी होते; तुमचे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण होऊ लागतात; तुम्हाला ज्यातून आनंद आणि समाधान मिळते अशा कृती तुम्ही करू लागता: आणि तुम्ही समाजात एक सकारात्मक योगदान देऊ लागता. सर्वात महत्त्वाचे, उच्च आत्मसन्मान असल्यास तुम्हाला मनःशांती मिळते... प्रश्न असा आहे की, आपला आत्मसन्मान वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची तुमची तयारी आहे का ?
-
Manvi Mendu (मानवी मेंदू)
अनेक वर्षांपासून असा समज होता की मेंदूच्या पेशींची वाढ बालपणानंतर थांबते आणि वृद्धत्वात त्या आपोआप क्षीण होऊन नष्ट होतात. परंतु अलीकडील वैज्ञानिक संशोधनाने या गैरसमजुती आणि नियतीवादाला छेद दिला आहे. संशोधनाने दाखवून दिले आहे की मेंदूला प्रशिक्षण, संवर्धन आणि जीवनातील प्रत्येक दिवस चपळ व सतर्क ठेवण्याचे मार्ग आपण अवलंबू शकतो. मेंदूचे संवर्धन म्हणजे आपल्या नैसर्गिक क्षमता वृद्धिंगत करणे, ज्यामुळे स्मरणशक्ती टिकून राहते आणि बळकट होते. मेंदू हा असा यंत्रमाग आहे, जो विचारांचे आणि भावनांचे सुंदर रेशीम विणतो. तो मज्जासंस्था आणि पाठीच्या कण्याला नियंत्रित करतो. इतकेच नव्हे, तर हृदयाचे ठोके, शरीराचे तापमान आणि रक्तदाब यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रियांचा तो संचालक आहे. मेंदूच्या संवर्धनासाठी मज्जासंस्था, पाठीचा कणा आणि एकंदरीत आरोग्य यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक आहे. हे छोटेसे पुस्तक तुम्हाला मेंदूच्या कल्याणासाठी काय करता येईल याबाबत नवीन दृष्टिकोन आणि उपाय सुचवते, जेणेकरून तुमचा मेंदू तुम्हाला उत्तम आणि परिपूर्ण जीवनाचा मार्ग खुला करेल.