-
Mayajaal (मायाजाल)
डॉ. जयंत नारळीकर म्हणजे एक बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्व, त्यांचे एक रूप विश्वाचा वेध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाचे. तर दुसरे रूप किशोरवयीन मुला-मुलींना विज्ञानातील संकल्पना हसतखेळत शिकवणाऱ्या आणि विविध कथांमधून त्यांना रमवत रिझवत अनोख्या जगाची सफर घडवणाऱ्या विज्ञानलेखकाचे. डॉ. जयंत नारळीकरांच्या प्रतिभाविलासातून उमललेल्या सात बहुरंगी कथांचे इंद्रजाल
-
Gawaee (गावई)
गाव म्हणजे जमिनीवरचं एखादं ठिकाण नाही. गावाला गावपण येतं ते इथल्या नांदत्या माणसांमुळे. माणसं आहेत म्हणून गाव आहे. त्यांनी गाव सोडलं की, गाव ‘उठलं’. मग उरते ती फक्त जमीन. ‘गावई’ ही अशाच एका गावाची कथा. आभाळाच्या कोपाला सामोरं जात, आपली संस्कृती जपत तगण्याचा हे गाव प्रयत्न करतंय. मात्र शहर आणि खेडी यात सरकारनं राबवलेली धोरणं, खेड्यातल्यांचं अज्ञान, अज्ञानामुळं होणारं शोषण आदी गोष्टींमुळं ही ग्रामसंस्कृती शेवटची घटका मोजत आहे. गावं ‘उठत’ आहेत म्हणजेच होत आहे.
-
Dharankala (धरणकळा)
मूठभर धान्य पेरावं तर मालकीची जमीन नाही. तरीही आम्ही गाववाले. भुमिपुत्र। आमचा गाव. आमचा देव. आम्ही पाटील, आम्ही देशमुख. दारूच्या नादात बडेजाव. ‘जवळ नाही आटा अन् टेरीला उटणं वाटा’ अशी गत. भैताडांना हे कळंना की कुठं राहिलाय तुमचा गाव ? गैबान्यांनो, होतं ते विकून बसलात, आता पार्टीच्या जिवावर उड्या मारताय, त्यांच्या हातचं बाहुलं झालाय. उद्या खेळ संपेल. बाहुलं फेकलं जाईल. पार सांदी कोपऱ्यात! तुम्हाला या मातीत पाय ठेवता येणार नाही. आज पार्टीवाला देवाचा भंडारा करतोय. पैसा देतोय. उद्या तो तुमच्या देवालाही जुमानणार नाही.
-
Raimuniya (रायमुनिया)
लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी – ही रानमेव्याची फळं म्हणजेच – रायमुनिया
-
Thembe Thembe (थेंबे थेंबे)
महिला बचत गट. अधून-मधून कानावर येणारे शब्द. पण त्यांची सुरुवात, प्रसार, उपयुक्तता अशा तपशिलाच्या खोलात बाहेरचं फारसं कुणी जात नाही. फार फार तर ‘चटण्या-मसाले बनवणाऱ्या बायका’ एवढ्यावर बोळवण होते, किंवा ‘बायका बायका जमून काही करताहेत, तर करू द्या,’ इतपत उदारपणा दाखवला जातो! ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण तशी खूप जुनी. पण तिला नवा अर्थ दिला, तो बचत गटातल्या गरीब पण होतकरू व धडपडणाऱ्या महिलांनीच. ग्रामीण स्त्रियांनी रुपया रुपया जिवापाड वाचवून बचत गटात घातला; तर तो वाढतो, वेळेला उपयोगी पडतो आणि बाईचा आत्मसन्मानही वाढवतो… महिला बचत गटातून विधायक आर्थिक बदल घडवणाऱ्या सभासद बायका, त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या व्यक्ती-संस्था आणि शासनाच्या सकारात्मक योजना या सगळ्यांची वाटचाल जिव्हाळ्यानं पाहायचा हा प्रयत्न. महिला बचत गटांच्या प्रवासाचा नि फलितांचा लेखाजोखाच जणू!
-
Rohini Niranjani (रोहिणी निरंजनी)
ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. ‘जाणिजे यज्ञकर्म’ या भावनेनं हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला. भावसमृद्ध, ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार, श्रेष्ठ गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत, संगीतरचनाकार, वाग्गेयकार, लेखिका, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा समावेश करणाऱ्या अॅकॅडेमेशियन – अशा परिपूर्ण कलाकार – ‘टोटल आर्टिस्ट’- रोहिणी भाटे यांचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच बहुआयामी, विविधरंगी ! त्यांच्या प्रातिभ कलाजीवनाचा वेधक पट म्हणजे
-
Ashwini-Tu Nahis Tarihi Ahes (अश्विनी:तु नाहीस तरी
आयुष्य जगण्यालायक बनतं ते कशामुळे? आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे, मोलाचे घटक कोणते? प्रत्येक श्वासाची किंमत काय असते? संपूर्ण शांतता हीसुद्धा हजारो शब्दांइतकी बोलकी कशी असू शकते? खऱ्या प्रेमापोटी कोणताही उद्देश नसतो. एकत्र, एकजीव असणं हे मूल्य, देवाणघेवाणीच्या पुष्कळच वर असतं. हे तुझं – हे माझं याच्यापलीकडे आपण आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या नावे लिहिण्याची हद्द सुरू होते. आपल्या माणसाची काळजी करणं, काळजी घेणं हे शब्दातीत असतं. स्वार्थ सोडण्याची सीमा एवढी विस्तारता येते की, एका क्षणी तुमचं असं वेगळं अस्तित्वच शिल्लक उरत नाही… अशा एक ना अनेक सत्यांची जितीजागती अनुभूती येण्याचा तो कालखंड होता!