-
Pimpalpan Part-10 ( पिंपळपान भाग-१०)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Pimpalpan Part-9 ( पिंपळपान भाग-९)
आशयसमृद्ध,भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका 'चं रंगरूप खुलवत राहिला आहे . मनाचा ठाव घेनार्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका' चं बलस्थान . मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकाहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिगग्ज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणार हे पिंपळपान ....
-
Artificial Intelligence (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’
-
Sajeev (सजीव)
सजीवांच्या उत्पत्तीपासून, उत्क्रांतीपासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत आणि जेनेटिक्स पासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणारं आणि जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांची रंजक गुंफण आणि जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे सजीव हे पुस्तक
-
Pravas (प्रवास)
प्रवास कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता १३ ते १७ व्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रं, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितीकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘प्रवास’
-
Savarkar: Vismrutiche Padsadh (सावरकर: विस्मृतीचे
पुस्तकाविषयी हिंदुत्व विचारसरणीचे वैचारिक स्रोत असलेले सावरकर हे निःसंशयरीत्या विसाव्या शतकातील सर्वांत वादग्रस्त ठरलेले विचारवंत आणि नेते होते. एकीकडे उदात्तीकरण करणारी स्तुती तर दुसरीकडे त्यांना आसुरी ठरवणारी निंदा या दोन टोकांत त्यांच्या दीर्घ आणि वादळी जीवनाची कथा दोलायमान झाली आहे. या दोन टोकांमध्ये असलेले सत्य दुर्दैवाने कधीच सामोरे आणले गेले नाही. ते आणि त्यांची विचारसरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विशेषतः महात्मा गांधींची, त्यांच्या अहिंसेची प्रबळ आणि प्रखर विरोधक म्हणून समोर येते. 1857चा इतिहास लिहिताना ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे’ समर्थक असलेले सावरकर अंदमानात गेल्यानंतर मुस्लिमांकडे संशयाने पाहणार्या ‘हिंदुत्वा’च्या संकल्पनेचे पुरस्कर्ते का झाले असावेत? जगभरातील आणि भारताच्या अभिलेखागारांतील मूळ कागदपत्रांचे विस्तृत संशोधन करून दोन खंडात्मक चरित्र साकार झाले आहे. त्यापैकी या पहिल्या खंडात सावरकरांचा त्यांना जन्मठेपेकडे घेऊन जाणारा प्रवास ते अखेर काळ्यापाण्यातून मुक्तता होईपर्यंतचा जीवनपट मांडण्यात आला आहे. यातून सावरकर, त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी यांबद्दलचा नवीन दृष्टिकोन समोर येतो आणि त्यांच्या यशापयशावर एक नवा प्रकाश पडतो.