-
Gunhyachya Paulkhuna (गुन्ह्याच्या पाऊलखुणा)
प्रत्येक गुन्हेगार काही पुरावे मागे सोडून जातो. कधी ते चटकन सापडतात तर कधी पुरावे सापडायला काही वर्ष ही लागतात. सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी आणि गुन्हेगाराची ओळख निःसंशय पटवून देण्यासाठी न्यायव्यवस्था ज्या विज्ञानाचं सहाय्य घेते त्याला न्यायसाहाय्यक विज्ञान असं म्हणतात. चित्रपट आणि टी वी सीरियल्स मधून न्यायसाहाय्यक विज्ञानाची तोंड ओळख झाली असेलच. या पुस्तकात न्यायसाहाय्यक विज्ञानाची सखोल माहिती आणि फॉरेंसिक सायन्सच्या उपयोगाने सोडवलेल्या काही थरारक क्रिमिनल केसेस आहेत. विविध शास्त्र जसे की रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र यांचा उपयोग न्याय दानासाठी केला जातो. क्राईम सीन पासून न्यायालयापर्यंतचा पुराव्यांचा प्रवास सोप्या भाषेत वर्णन करण्याचा हा प्रयत्न आहे. विविध टेक्नॉलॉजी आणि उपकरणांची उपयोग गुन्हे तपासासाठी केला जातो. या सगळ्याची नेमकी माहिती या पुस्तकात मिळेल. हस्ताक्षर, स्वाक्षरी, बोटांचे ठसे यांचा अभ्यास कसा केला जातो. लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट डीएनए प्रोफाइलिंग अश्या ऐकीवातल्या तंत्रज्ञानाची माहिती या पुस्तकात आहे. न्यायवैद्यक शास्त्र आणि त्याच्या विविध शाखांची ओळखही तुम्हाला या पुस्तकातून होईल. सायबर गुन्हे आणि त्यांचा तपास करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर/ हार्डवेअर यांची ही थोडक्यात माहिती मिळेल. सत्य हे कल्पनेपेक्षा आश्चर्यकारक असतं या वाक्प्रचाराची अनुभूती देणारे गुन्हे आणि त्यांचा फॉरेंसिक सायन्स च्या मदतीने केलेला उलगडा या पुस्तकात आहे. फॉरेंसिक सायन्स चे विद्यार्थी, तपास कार्य करणारे अधिकारी व एक्सपर्ट्स, न्यायाधीश व वकील, थ्रिलर कथा लिहिणारे लेखक आणि फॉरेंसिक सायन्स व गुन्हे तपास या विषयाचे कुतूहल असलेल्या सर्व वाचकांना हे पुस्तक वाचायला आवडेल.
-
Big Bang Vishwaprarambhache Thararnatya (बिग बँग विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)
या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ? विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ? विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ? या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा.. थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा ! सुर्यासारख्या अब्जावधी ताऱ्यांनी बनणाऱ्या गॅलेक्सीज आणि अशा अब्जावधी गॅलेक्सीजनं बनलेलं विश्व पाहिलं की अक्षरशः थक्क व्हायला होतं. या अथांग विश्वाच्या प्रारंभाचा माणसानं घेतलेला शोध हा एखाद्या उलगडत जाणाऱ्या रहस्यकथेसारखा आहे. 'बिग बँग' ही विश्वाच्या प्रारंभाची शोधकथा आहे. रात्रीच्या आकाशातल्या चांदण्यांचं निरीक्षण करायचं आणि गणित, विज्ञानातले नियम वापरत निव्वळ तर्काच्या आधारावर विश्व कधी आणि कसं निर्माण झालं याचा शोध घ्यायचा म्हणजे माणसाची एक उत्तुंग झेप आहे ! या शोधकथेत एकामागोमाग एक झपाटलेले शास्त्रज्ञ येतात आणि विश्वाच्या निर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करताना दिसतात.
-
Aadim Dukhhache Vartul (आदिम दुःखाचे वर्तुळ)
लोकगीतांची शब्दकळा स्वतःमध्ये मुरवून घेऊन आधुनिक युगातील जगण्याचा वेध घेणारी सशक्त कविता भारती पाटील यांच्या 'आदिम दुःखाचे वर्तुळ' या संग्रहातून भेटते. ग्रामजीवनातील चैतन्याने रसरसलेल्या जगण्याबरोबरच तिथले दुःख-दैन्य कवेत घेणारी ही कविता मनाचा ठाव घेते. कोणतीही चांगली कविता वाचकांना आपल्या गद्य जगण्यापलीकडच्या भावविश्वात सहजपणे घेऊन जात असते. भारती पाटील यांची कविता त्या निकषावर अस्सल ठरते. घासातला घास खाऊ म्हणताना कुणीही परका नसल्याचे सांगताना ही कविता माणसांमाणसांमध्ये उभ्या केल्या गेलेल्या सगळ्या भिंतींना पार करून जाते.
-
Diary Of A Home Minister (डायरी ऑफ ए होम मिनिस्टर)
"समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेलं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री. अनिल देशमुख. छोट्या छोट्या पदांपासून सुरू असलेला हा प्रवास थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवलं, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली. आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. ... पण तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केलं. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास... स्फोटक, परखड, तरीही तितकंच काळजाला हात घालणारं विलक्षण आत्मकथन...
-
Da Vinchich Kod (दा विन्चीचं कोडं)
डॉ. कौशिक – सायन्टिस्ट आणि अमृतराव मोहिते – कमिशनर या दोन मित्रांच्या कर्तृत्वाची ही गोष्ट. कायद्यातील अडचणी या विज्ञानाच्या माध्यमातून कशा सोडवता येतात ते हे दोन मित्र दाखवून देतात. जगात लागणारे नवनवीन शोध आपल्या भारतातही कुठे-कुठे उपलब्ध आहेत, हे माहिती असणारे डॉ. कौशिक त्यांच्याकडच्या माहितीचा योग्य जागी कसा उपयोग करतात ते वाचण्यासारखे आहे. अगदी कम्प्यूटरबरोबर एका काही अंशी कोमात गेलेल्या मुलीने केलेला संवाद असू देत अथवा एका बलात्कारी मुलीला न्याय देण्यासाठी तयार केलेला रेकॉर्डर ड्रेस, ए.आय.च्या मदतीने शोध घेतलेलं मृत्युपत्र असू देत अथवा वैज्ञानिक तपासण्यांतून पकडलेली एका चित्राची चोरी असू देत... सगळंच अद्भुत. मुलांबरोबर मोठेही रमतील; कारण वैज्ञानिक कथा असूनही ते तंत्र आपल्या भारतात कुठे वापरले जाते हे समजल्यावर अंगावर अभिमानाचे रोमांच उभे राहतात. हा अनुभव जगण्यासाठी वाचा ‘दा विन्चीचं कोडं!’
-
Chirantan Yashache 10 Niyam (चिरंतन यशाचे १० नियम)
आयुष्यात यशाचा एक अर्थपूर्ण मार्ग शोधताना - यशाच्या मार्गावर जाण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक पात्रता— तारुण्य, उत्साह, बुद्धिमता, आशावाद आणि याचबरोबर असंख्य परिस्थितींतून गेलेल्या अनुभवी लोकांच्या अनुभवातून मिळणार्या आधाराची भासणारी आवश्यकता - अनेक महान स्त्री–पुरुषांंचं आयुष्य आणि त्यांचे योग्य – अयोग्य निर्णय व त्यांचे जीवनावर उमटलेले पडसाद - महान व्यक्तींच्या आयुष्यातलं यश आणि आनंद - काळानुसार बदलत जाणारं यशाचं चित्र - जगात होणार्या कोणत्याही उलथापालथेत कायम टिकणारी मूलभूत वैशिष्ट्यं – ती आचरणात कशी आणायची? - यशाच्या जवळ असावं असं वाटणं; पण यश म्हणजे काय, ते कसं मिळतं आणि ते कसं टिकवून ठेवता येतं, याची उत्तरं स्व-ज्ञान, दृष्टी, पुढाकार, धाडस, प्रामाणिकपणा, संयोगक्षमता, विनयशीलता, सहनशक्ती, हेतू, लवचीकपणा अशा दहा महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमधून मिळतात - यशाचा अर्थ नव्याने तपासून सांगतायत `मारिया बार्टिरोमो!’
-
Ullu Ani Itar Katha (उल्लू आणि इतर कथा)
‘उल्लू आणि इतर कथा’ हा १६ हलक्या फुलक्या विनोदी ललित कथांचा संग्रह आहे. आर. बी. मातकारांची लेखनाची एक स्वतंत्र शैली आहे जी वाचकांना नेहमीच भावते. त्याच शैलीत त्यांनी लिहिलेल्या या खुमासदार कथा मनोरंजक आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात हवे हवेसे वाटणारे हास्याचे क्षण हा कथासंग्रह वाचतांना तुम्हाला नक्की मिळतील.