-
Yugdrashta Maharaja (युगद्रष्टा महाराजा)
देशात स्वातंत्र्यपूर्व काळात पाचशे ते सहाशे संस्थाने होती. या संस्थानांपैकी पुरोगामी राजा म्हणजे सयाजीराव गायकवाड. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना मदत करणारे सयाजीराव ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणार्या क्रांतिकारकांनीही मदत करत होते. साहित्य, कला, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा सर्व बाबींना उत्तेजन देणारा हा राजा सर्वार्थाने वेगळा होता. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांनी अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे. 528 पानांच्या या कादंबरीत सयाजीरावांचे अनेक पैलू लेखकाने मांडले आहेत. सयाजीराव किती मोठे होते, हे या कादंबरीने सहजपणे लक्षात येते. लेखकाने खूप मोठा काळ अत्यंत ताकदीने उभा केला आहे. Authors: बाबा भांड
-
Bel Bhandara (बेल भंडारा )
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं हे पुस्तक बघताक्षणीच वाचकाला आवडेल इतकी देखणी निर्मिती झाली आहे. डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून हे चरित्र लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी ते उत्तम केलं आहे. मासिकाच्या आकारातील या पुस्तकाची निर्मितीही त्यातील मजकुराइतकीच दर्जेदार आहे.
-
Vishkha ( विशाखा )
उत्कट जीवनानुभव, स्वानुभवापासून ते राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे वैविध्य, लालित्यपूर्ण आणि ओघवती भाषाशैली या विविध गुणांनी युक्त असणारा विशाखा हा काव्यसंग्रह जगन्मान्य कवी कुसुमाग्रजांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलाय. सुरेख काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह प्रत्येकाने आपल्या घरात, हृदयात व मनातही जपून ठेवावा असाच आहे.
-
Vatevarchya Savalya ( वाटेवरच्या सावल्या )
त्रास्थपणे मागे वळून पाहता येईल आणि ज्यासंबंधी काही बोलता येईल अशा काही वक्ती आठवणीमधे घर करतात ज्या ठिकाणी आपण थांबलो, थबकलो अशी आपल्या आयुष्यातील ती विरामचिन्हेच होत. शिरवाडकरांचे आत्मपर कथन पूर्वी विरामचिन्हे नावाने प्रकाशित झाले होते. त्यात काही लेखांची भर घालून वेगळा नावाने त्याची ही नवी आवृत्ती.