-
Ranbhul ( रानभूल )
जंगल कसे वाचावे हे सांगता सांगता भ्रणाची गोडी लावणारा, पशुपक्षी-वृक्षवेली आणि निसर्गाच्या विविध रूपांची भावपूर्ण ओळख करून देणारा आणि वाचकाला नकळत निसर्गाशी जोडणारा एक ताजा टवटवीत अनुभव.
-
Anganatale Abhal ( अंगणातले आभाळ )
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या कष्टमय पर्वात मध्यमवर्ग दुष्टचक्रात सापडला व त्याने आपली परंपरा, वृत्ती यांचा त्याग केला. परंतु नंतरच्या आर्थिक प्रगतीबरोबर आलेल्या सुस्थैर्याध्ये आठवले ते परंपरेचेच संचित..... सामाजिक स्थित्यंतरात सापडलेल्या ब्राह्मण तरुणाची सरस आत्मकहाणी.
-
Abharan ( आभरान )
गावकुसाबाहेरच्या अनेकांची आत्मकथनं आली. परंतु ज्यांना गावकूसही नाही असा पोतराज समाज. रंगीबेरंगी चिंध्या पांघरून, ज्याला आभरान म्हणतात, अंगावर आसूड ओढत दारोदार फिरणारा हा अस्थिर मानव. या जगण्यातला दाह पचवून, आभरानाची होळी करून, शिक्षणाच्या वाटेनं जात व्यवस्थेविरुद्ध लढणार्या अशाच पोतराजपुत्राची ही जीवनकथा.
-
Bhidu ( भिडू )
आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील भयाण वास्तवामुळे अस्वस्थ झालो. काही वेळा प्रभावित झालो. अशा भिडूंची ही जीवनकहाणी ! असेच काही भिडू प्रतिकूल परिस्थितीशी निकरानं झुंजून मार्ग काढत असले, तरी त्यांच्या अंतर्मनातदेखील खोल व्यथा-वेदना आहेत. ही इरसाल मंडळी पूर्वी कशी होती ? आज कुठे आहेत ? त्यांच्या भल्या-बुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा शोध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न.
-
Kanosa ( कानोसा )
भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ. राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन खेड्यां-मधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने बोलल्या आहेत. त्यांचे हे समज-गैरसमज प्रातिनिधीक वाटतील...
-
Gangal 70 Granthali 35 ( गांगल ७० ग्रंथाली ३५ )
वाचकदिनी प्रसिद्ध झालेला महत्त्वपूर्ण दस्तावेज... दिनकर गांगल यांच्या सत्तरीनिमित्त त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी केलेले लेखन आणि दिनकर गांगल यांची प्रदीर्घ मुलाखत. सोबत, कुमार केतकर यांची प्रस्तावना व अरुण साधू यांची सांगता...
-
Niyatishi Karaar ( नियतीशी करार )
आजपर्यंत जे केलेत, त्यापेक्षा वेगळे काही करू लागलात, तर, आजपर्यंत जे मिळाले, त्यापेक्षा वेगळे काही मिळणार. मानवी धारणांत अंतर्बाह्य परिवर्तन घडून यावे आणि त्यातून समाजाचे सांस्कृतिक उत्थान व्हावे यासाठी ओघवत्या शैलीत केलेले हे परखड प्रतिपादन.