-
Paanpoi
वपुंचेच पुस्तक परंतु हे तसे वपुंचे पुस्तक नाही. काही सुचलेले विचार, काही घडलेल्या घटना, काही ऐकीव, वाचीव गोष्टी, इतरांना खुलवून सांगावे असे काव्य - विनोद मात्र हे सारे व. पु. काळे ह्यांच्या शैलीत व ढबीत असे ह्या छोट्याशा पुस्तकाचे वेगळेपण. ही एक प्रकारची पाणपोई आहे. थकल्यावर तहान लागल्यावर तीवर तहान भागवायची असते, एवढेच वपुंचा उद्देशही तेवढाच आह. मात्र वपुंना हे एक सामाजिक कर्तव्यच वाटलेले आहे म्हणून ज्यांना ज्यांना आपले अनुभव धन इतरांना सांगावे असे वाटते त्यांनी त्यांनी कुचराई न करता ते सांगितलेच पाहिजे असेही त्यांना वाटते. याबद्दल त्यांची धारणा अशी आहे की, "अनुभव व्यक्त करण्याकरता लेखक व्हावंच लागतं असं नाही तो अनुभवच लेखणीच्या टोकाशी उपस्थित असतो."
-
Vaat Tibetchi
चीनने गिळंकृत केलेल्या तिबेटचे अनेक वैशिष्ट्यांसह वर्णन या पुस्तकात केले आहे. तसेच ड्रॅगनचे खरे रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.