-
Sinar
मृणालिनी चितळे यांच्या कथांत आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील स्पंदनं उमटलेली आहेत. शाळेत शिकणाऱ्या मुलीपासून ते वृध्दाश्रमात राहणाऱ्या वृध्देपर्यंतच्या सर्व वयांतील व्यक्ती या कथासृष्टीत वावरतात. तीत माणसामाणसातला संघर्ष आहे.जिव्हाळाही आहे. अबोल ताण आहे. मन:पूर्वक प्रेमही आहे. मित्रमैत्रिणींच्या संवादात स्वत:च्या प्रश्नांना उत्तरं शोधणारी माणसं आहेत. हिमालयाच्या सहवासात स्वत:चं दु:ख विसरू शकणारी माणसंही आहेत. त्यांच्या सुखदु:खांचं मूळ बदलत्या आधुनिक जीवनाच्या आशाआकांक्षांमध्ये आहे. म्हणून या आजच्या काळाचा स्वर खेचून घेणाऱ्या कथा आहेत.
-
Ek Dhaga Sutacha
ते दिवस... संघर्षाचे होते अन् मंतरलेलेही ! स्वातंत्र्यानंतर देश, राजकारण सगळेच बदलेले. आम्हांला घडवणारी पिढी काळाच्या पोटात गडप झाली. उरता उरल्या माझ्यासारख्या काही.... या भरलेल्या दिवसांना उजाळा देणा-या... पराकोटीचा संघर्ष, ध्येयवादाची पदोपदी घेतली गेलेली परीक्षा आणि देशसेवेची आंतरिक उर्मी यांनी भरलेली ही जीविका. स्वातंत्र्याचा सुर्य आणि सहस्त्रचंद्र पाहणा-या या वाटचालीतील एक 'आई' देखील भेटते आणि मन स्तिमित होते... ही आई आहे, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर या सुपुत्राची!
-
Ashru
या विसाव्या शतकानं जगाला बर्यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे.
-
Don Mane
माणसाला दोन मनं असतात बाळासाहेब ! एक पशूचं आणि एक देवाचं. पहिलं मन उपभोगात रमून जातं, दुसरं त्यागात आनंद मानतं ! पहिल्याला शरीराच्या सुखापलीकडे काहीच दिसत नाही. दुसऱ्याला त्याच्यापलीकडे असणा-या उदात्ततेचा साक्षात्कार होतो. या दोन मनांतल्या पहिल्याला निसर्गानं आपलं सारं सामर्थ्य दिलं आहे. दुसरं त्या मानानं फार दुबळं असतं. या दुस-या मनाचं बळ वाढवण, दोन्ही मनांचं बळ सारखं करून जीवन सुखानं जगणं आणि जगता जगता त्याचा विकास करणं, हे यशस्वी आयुष्याचं खरं लक्षण आहे. पण मनुष्याच्या आयुष्यात या दोन्ही मनांचा झगडा नेहमीच सुरु असतो. या झगड्यात ज्यांचं दुसरं मन विजयी होतं, ते कुठल्याही संकटाला हसत तोंड देतात. पण पहिल्या मनाच्या आहारी गेलेला माणूस दुबळा होत जातो, मोहांना बळी पडतो, जिवलग माणसांशीही प्रतारणा कृ लागतो, आणि मग...
-
Hirva Chafa
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन-तीन दशकांमध्ये समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद यांसारख्या तत्त्वज्ञानांमुळे तसेच स्त्री-शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती अशा घटनांमुळे भारतीय जीवनात मोठे स्थित्यंतर घडून आले. व्यक्तिजीवनावरील बंधने सैल झाली. रूढसमजुतींना व नातिकल्पनांना तडे गेले; समाजातील सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा वावर होऊ लागला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली. समाजातील काहींनी या नव्या जीवनपद्धतीचा सहज स्वीकार केला, काहींनी आपल्याला सोयीच्या गोष्टी स्वीकारल्या, तर उरलेले जुन्यालाच धरून राहिले. 'हिरवा चाफा' ही कादंबरी प्रथम १९३८ साली प्रकाशित झाली. यामध्ये या नव्या काळातील आरंभीच्या बदलांचे चित्रण आहे. यातील क्रांतिकारी विचारांनी भारलेला मुकुंद किंवा ध्येयाने प्रेरित झालेली सुलभा हे नव्या पिढीचे, तात्यासाहेब जुने ते सोने मानणार्या पिढीचे, तर विजय पूर्णपणे नवे न स्वीकारलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहेत.
-
Women And The Weight Loss Tamasha
'फिट, परफेक्ट... कम्प्लीट वुमन बनण्याचा मूलमंत्र देणारं.. 'लाइफस्टाइल गाईड' अस या पुस्तकाचं वर्णन करण्यात आले आहे. अभिनेत्री करीना कपूर ला 'साइझ झिरो' करण्याचा श्रेय या पुस्तकाच्या लेखिका "ऋतुजा दिव[...]