-
Cakes
सुरेख केक्स घडविणारे, साकारणारे त्या प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारचे केक्स तयार करायला शिकविणारे एकमेव पुस्तक
-
Muktanganchi Goshta
मुक्तांगणची गोष्ट:’ ‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु.ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’ पु.ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणारया एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल, तर सार्थक झाले समजेन.व्यसनी नवऱ्याच्या एका जरी पत्नीला पूर्वीच्या जखमा विसरून चांगले आणि आत्मविश्वासाने जगावेसे वाटले, की त्याहून काय हवे? एका जरी व्यसनी बापाच्या लहानग्या पोराच्या मनावरचे काळेकुट्ट मळभ दूर होऊन छानसे कोवळे उन्ह पसरेल, आणि त्यात ते पोर मस्त, अनिर्बंध नाचेल...त्यापेक्षा अधिक काय मिळवायचे असते?
-
Ardhi Mumbai
मुंबईतल्या गरीब, कष्टकरी आणि जगण्याशी रोज झगडा करणा-या वस्त्यांचे नि तिथल्या माणसांच्या जगण्याचे कंगोरे शोधणारं 'युनिक फिचर्स'चं 'हटके' पुस्तक.
-
The Boy In The Striped Pyjama's
ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला न कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्यानं ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेनं वाटलं. ही गोष्ट दुसर्या महायुद्धाच्या सुमाराची-जर्मनीत घडणारी. या युद्धाचे जगावर झालेले भीषण परिणाम आपल्याला माहीतच आहेत; परंतु या युद्धाशी निगडित छोट््या छोट््या गोष्टींनी एका लहान मुलाच्या भावविश्वात किती मोठी उलथा-पालथ झाली त्याची ही गोष्ट. ही संपूर्ण कहाणी ब्रूनो या नऊ वषा|च्या मुलाच्या नजरेतून आपल्यापुढे उलगडत जाते.
-
Israel Chalakadun Balakade
ज्या दिवशी आपल्या प्रियतम हिंदुस्थानची दुर्दैवी फाळणी झाली, अगदी त्याच दिवशी योगी श्री अरबिंदबाबू यांनी लिहून ठेविले की,``आज भारताची झालेली फाळणी भविष्यकाळीं नष्ट होऊन पुन्हां एक एकसंघ भारत दृष्टीस पडेल... प्रत्येक राज्यामध्ये भिन्न भिन्न प्रादेशिक वैशिष्ट्ये बहरतील व विविधतेत एकत्व प्रकट करणारा राष्ट्रपुरुषाचा स्वभाव व स्वधर्म त्यांतून व्यक्त होईल. सर्वांगांनीं समर्थ झालेले असे एकजीव भारतीय राष्ट्रजीवन निरोगी समृद्धत्व पावले...’’... हे योगी अरविंदांचें भाकित निश्र्चित खरे ठरेल अशी माझी श्रद्धा आहे. पण तें उद्यांचें भव्य-दिव्य स्वप्न साकार होणार आहे तुमच्या नि माझ्या, नव्हे आपल्या समाजांतील असंख्य जणांच्या, कर्मयोगी जीवनांतून. सारें जग आपणापासून `ज्ञान नि दिव्य जीवन’ नतमस्तक होऊन उद्यां स्वीकारणार असेल, तर त्यासाठी योगी अरविंदांनी म्हटल्याप्रमाणे प्रथम `एकसंध भारत’ उभा करावा लागेल. पण ही गोष्टी उत्कट राष्ट्रभक्तीवांचून कशी साध्य होणार? यासाठी आपल्यातील प्रत्येकाच्या अंतःकरणांतून स्वर्गीय स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणें असा सूर उमटला पाहिजे की, ``सारे जग जरी आमचा द्वेष करू लागलें, किंवा सार्या जगाचा जरी आम्हांस द्वेष करावा लागला तरी सिंधूचा संबंध आम्ही सोडणार नाही, तोडणार नाही. सिंधूस आम्ही विसरूं? छे! सिंधूवांचून हिंदु म्हणजे अर्थावांचून शब्द! प्राणावांचून कुडी!’’अशा उत्कट देशभक्तीनें प्रेरित होऊन उठणें नि आपल्या समाजांतील सर्व कर्त्या लोकांना उठविणें हेंच यापुढें आपलें जीवितकार्य झालें पाहिजे. त्यासाठी निद्रिस्त समाजाच्या घराचीं नि मनाचीं बंद दारें ठोठावण्यासाठीं अनेकांनीं बद्धपरिकर होण्याची आवश्यकता आहे. जेव्हां आपल्या सर्वांच्या प्रयत्नांतून जागृत होऊन हा विशाल भारत पराक्रमासाठीं उभा राहील, तेव्हां जगांतील इस्त्रएलसारख्या राष्ट्रांच्या करुणकथा भविष्यकाळांत ऐकाव्याच लागणार नाहींत. जगांतील सार्या पददलितांना नि दुःखितांना आधार देण्यासाठी भारताने प्रबल होऊन उठावे, हीच तर आजच्या काळाची एकमेव अपेक्षा आहे!