-
Mahimchi Khadi
तत्कालीन मध्यमवर्गीय वाचकाला अपरिचित जगाचं दर्शन घडविणारी ‘माहीमची खाडी’ प्रसिद्ध झाली आणि साहित्यजगतात या कादंबरीच्या रूपाने एक वादळ घोंगावत आलं. झोपडपट्टीतील जीवनाचे आणि त्यातील समस्यांचे वास्तववादी चित्रण ‘माहीमची खाडी’ मधून घडते. झोपडपट्टीतलं सर्व थरावरचं दारिद्र्य, हातावर पोट घेऊन आला दिवस ढकलणारे लोक, काळे धंदे, बेकारी, दारू, मटका यांची व्यसनं, भविष्याचा विचार न करता काहीही करून जगण्याची धडपड, जुन्या पिढीतील नष्ट होत जाणारी ऊब, कौटुंबिक जीवनातील जीवघेणी विदारकता, जन्म घेणाऱ्या बालकांच्या आणि त्यांच्या आयांच्या असह्य यातना, मृत्यू, तरुणांच्या गॅंगचं असंस्कृत वागणं आणि जगणं. स्त्री-पुरुषांचे शारीर पातळीवरचे संबंध या सर्वांचे समूहचित्रण प्रत्ययकारीपणे या कादंबरीत घडते.
-
Ghar Kaularu
आपल्या आयुष्यात बालपण येतं आणि जातं ते पुन्हा परत न येण्यासाठी! पण बालपणाच्या आठवणींनी तो काळ मनात ताजा, लख्ख होऊन कायम राहिलेला असतो; नव्हे काळाबरोबर अधिक मुरून चविष्ट बनतो. लेखिकेचं बालपणातलं कोकणातलं घर आणि घराशी निगडित अनेक गोष्टी तिच्या मनात सतत पिंगा घालत असतात. त्यातलीच ही काही शब्दरूपं!