-
Garambicha Bapu (गारंबीचा बापू)
प्रसिद्ध लेखक श्री.ना. पेंडसे यांची गारंबीचा बापू ही एक लोकप्रिय कादंबरी. हर्णे बंदराच्या परिसरातच वाढलेली ही कादंबरी. हर्णे, मुरुड, आंजर्ले, मुर्डी ही बंदरपट्ट्याची गावं. दापोली इथला रमणीय परिसर या निसर्ग आणि भावणारी माणसं. या कादंबरीतल्या सर्व व्यक्ती आणि प्रसंग काल्पनिक असले तरी जिवंतपणे प्रत्ययाला येतात.
-
Antaryami Sur Gavasala
दत्ता मारुलकर यांनी श्रीनिवास खळे यांच्या अनेक मुलाखती घेऊन त्यांची चरित्रविषयक माहिती संकलित केली आहे. ही माहिती आपल्या चरित्रलेखनासाठी संकलित करताना सतत नवी नवी स्वरनिर्मिती करणार्या संगीतकाराचे चरित्र आपण लिहितो आहोत, हे भान त्यांनी जागे ठेवले आहे. त्यामुळे आपण संकलित करीत असलेली चरित्रविषयक माहिती सामान्य माणसाच्या प्रसिद्ध माणसाविषयीच्या कुतूहलाला चवदार खाद्य पुरवणारी, या मर्यादेत अडकून पडता कामा नये, याची जाणीव चरित्रकार दत्ता मारुलकर यांना आहे. पण असे असले तरी एक व्यक्ती म्हणून मोठ्या कलावंताच्या राहण्याचे, वागण्याविषयीचे कुतूहल सर्वसामान्य रसिकाला असते, हेही दत्ता मारुलकर यांना ठाऊक आहे आणि म्हणूनच, खळे यांची पत्नी, तीन कन्या आणि जावई यांच्या मनोगतांचा समावेश त्यांनी हे चरित्र सिद्ध करताना केला आहे.
-
Order Order
चित्रपटसृष्टी म्हणजे मायावी नगरी … वैयक्तिक सुख दु:ख बाजूला ठेवून इथं वावरायला लागतं. चेह-या वर रंग थापून जागावं लागतं. त्याच्या आड काही वेळा एखादा हिंस्त्र पशू दडून बसलेला असतो. तो उठून याच मंडळींच्या मागे लागला तर.... या खेळात अडकलेल्या एका उदोयन्मुख अभिनेत्रीची ही कथा.