-
Deception Point
आक्र्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. 300 वर्षापूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न दा विंची कोड व एंजल्स अॅण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका.
-
Dainandin Sanskar
सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत आपण परमेश्वाराचा विविध पद्धतीने, विविध प्रकारे आठव करीत होतो. 'आठव करीत होतो' असं सांगण्याच कारण हेच की नव्या युगात, नव्या जगात, नव्या पद्धतीत, नव्या चालीरीतीत घातले आहे. शुभं करोती, सायं संध्या पासून श्लोक, स्तोत्र, आरत्या या संस्काराचं विरस्मरण होऊ घातलेल्या येणारया प्रत्येक नव्या पिढीसाठी आवश्यक असलेले असे हे - दैनंदिन संस्कार
-
Ravindrayan
रवींद्र पिंगे यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला चाहता वर्गही मोठा आहे. त्यामुळेच पुस्तक, दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्र अशा विविध माध्यमांतून त्यांनी लेखन केले. आणि त्याला वाचकांनीही दाद दिली. त्यांचे अनेक लेख गाजले. त्यातील काही लेख रविंद्रायन या लेखसंग्रहात वाचायला मिळतात. व्यक्तिचित्र, निसर्ग, साहित्य अहसा विविध विषयांवरील त्यांचे लेख यात आहे. यातून पिंगे यांचे खास लेखनवैशिष्ट्य दिसून येते.
-
Jidnyasapurti
विज्ञानविषयी उत्कृष्ट व रंजक लेखक करणार्यात निरंजन घाटे हे नाव आज आघाडीवर आहे. विज्ञान विषयावर श्री घाटे यांनी अनेक पुस्तके लिहिली असून ती वाचकप्रिय ठरली आहेत. 'जिज्ञासापूर्ती’ हा विषयही सदैव कुतूहल निर्माण करणारा आहे हे ओळखूनच त्यांनी या पुस्तकांची निर्मिती केली असावी. कारण सध्याच्या स्पर्धात्मक जगात चौफेर ज्ञानास खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षा, दूरचित्रवाणी वाहिन्यावरील प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम या प्रकारामुळे तर हा विषय परवलीचा ठरला आहे. या पुस्तकात एकूण 69 छोटे छोटे लेख समाविष्ट असून अनेक, लेखांना चित्रांचीही जोड दिलेली आहे. पृथ्वीचे वातावरण खरेच तापते आहे का ? रात्रपाळी करण्यामुळे त्रास होतो का ? क्लिओपात्रा खरंच अस्तित्वात होती का ? जाड माणसे अधाशी असतात का ? मंगळावर सजीव आहेत की नाहीत? उडत्या तबकड्यांचे गूढ, पैशाचा जन्म कधी झाला ? स्त्री आणि विज्ञान यांचे का पटत नाही ? चंद्रावर पाणी आहे का ? अशी अनेक प्रश्नांचे कुतूहल आपल्या 69 लेखांतून शमविण्याचा श्री. घाटे यांनी प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील सर्व लेख वाचून, नीट समजावून घेतले तरी वाचकांच्या सामान्यज्ञानात भर पडल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना अनेक भौगोलिक प्रश्नोत्तराचे भांडार म्हणून वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करील. यात शंका नाही.