-
Manasi
काय दिलं माझ्या प्रेमानं ? फक्त दु:ख... ? ऑसमंडच्या गाण्याचा मुखडा आहे बघ, 'लव्ह इज ओन्ली फॉर टुडे'. प्रेम फक्त आजच्यापुरतंच, या क्षणापुरतंच असतं. ते आज जगून घे. हे खरं असावं, पण कळलं कधी नाही. माणसाच्या मनाचीच नाती खरी, हे गृहीतक होतं माझं. प्रेमाबरोबर मीही एक नातं विणायला घेतलं. सामाजिक नात्याला झुगारून... तरीही सामाजिक होतंच ते... मग लक्षात आलं, की माणसाच्या मनाच्या नात्याला तर स्थानच नाहीये आणि किंमतही. सत्य हे की, सामाजिक नात्यांचा शिक्का खोलवर रुतून बसलाय आपल्या मानसिकतेत. एखाद्या गुणसूत्रासारखा रुजलाय आपल्यात.
-
Jeevanmritruchaya Seemareshevarun
अतिदक्षता विभागाची पूर्ण वेळ जवाबदारी संभाळताना 'जीवन मृत्यूच्या सीमेवरचं सततचं युद्ध! मानवी प्रयत्नांची पराकष्टा, अतिदक्षता विभागानं पुष्कळ काही शिकवलं, मानवी जीवन बांधल्याचा आनंद तर असतोय. पण वॆैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादाही जाणवतात. निसर्ग स्वतः च काम करत असताना; डॉक्टर त्यातल्या आणीबाणीच्या परिस्थितीतून तरुण जाण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. आणि वॆैद्यकीय उपचारांच्या अतिरेकानं तेच उपचार दुधारी शस्त्र ठरू शकतात. ही लक्ष्मणरेषा ओळखणं हे प्रगल्भ डॉक्टरांच काम...