-
Pati Aale Hati(पती आले हाती)
दैनंदिन जीवनातील विसंगती, गंमतीदार प्रसंग आपल्या वेगळ्या शैलीतून व विनोदी लेखनातून, कथांद्वारे मांडण्याचा हा आगळा प्रयत्न. वैदर्भीय भाषेतील खुसखुशीतपणा व निरीक्षणांमुळे या कथांची गोडी वाढली आहे. अभियंता असूनही कथा लेखनात रुची ठेवणाऱ्या अशोक शेगोकर ह्यांच्या कथांना हास्यचित्रकार विवेक मेहेत्रे ह्यांच्या मिश्किल चित्रांची जोड लाभली आहे. This is an attempt to present the inconsistencies and funny events of daily life through our different style and humorous writings and stories. The flavor of these short stories has been enhanced by the crispness and observations of the Vaiderbhaya language. The stories of Ashok Shegokar, who is interested in writing stories despite being an engineer, have been paired with funny illustrations by Cartoonist Vivek Mehetre.
-
Aadaranjali (आदरांजली)
विविध क्षेत्रांमध्ये अनेक कर्तबगार होऊन गेले. अलीकडे अनेक चांगल्या व्यक्ती हे जग सोडून गेल्या. खूप लोकप्रिय अशा. सर्वच नसतील, पण गुणी नक्कीच होत्या. काही तर थोड्याशा ‘‘खल’’ म्हणता येतील अशा होत्या. पण त्यांच्यात सुद्धा काही चांगले गुण होते. ज्या व्यक्तींची नक्कीच समाज दखल घेऊन होता. अशा व्यक्तींचे निधन झाल्यावर त्यांच्यावर लिहिण्याची संधी लेखकाला मिळाली. ते मृत्यू लेख प्रसिद्ध झाले. त्या लेखांचा संग्रह म्हणजे ‘‘आदरांजली’’ हे पुस्तक होय. थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारचे लेख म्हणजे त्या व्यक्तीला वाहिलेली श्रद्धांजली... आदरांजली असते. त्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याचा तो एक मार्ग असतो. तो मार्ग चोखाळत हे लेख लिहिले गेलेत आणि त्याचे पुस्तक तयार करून आदरांजली वाहिली आहे. ही गेल्या काही वर्षात गेलेल्या गुणी माणसांची दखल आहे आणि त्यांच्या स्मृतींची उजळणी आहे. खूप काळ गेलेला नसूनही ह्यातील काही व्यक्ती लगेच विस्मृतीत गेल्याचे लेखकाला हे पुस्तक तयार करताना जाणवले.
-
Narayaniya-Nivadak Na.Ga.Gore(नारायणीय-निवडक ना. ग
आतापर्यंत मी कोणालाही गुरु केलेले नाही, गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे त्यावरून स्पष्ट होईल. कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षू असले तरी तो रेखांकित करू शकेल, असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषी- मुनींनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी आणि विद्वानांनी टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाची, तत्क्षणीच्या परीस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन हे, आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये. याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते, असाही नाही. नीर-क्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. - ना. ग. गोरे