-
Train To Pakistan (ट्रेन टू पाकिस्तान)
खुशवंतसिंग यांची ही गाजलेली कादंबरी १९५६ मध्ये प्रकाशित झाली होती. मात्र आजही या कादंबरीची लोकप्रियता कमी झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाच्या झालेल्या फाळणीची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे. राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत असतात त्याचे पडसाद भारत - पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या लहानशा गावांमध्ये कसे उमटतात, त्याचे चित्रण त्यातून केले आहे. तेथीलच एका गावात शीख आणि मुस्लिम बंधुभावाने राहात असतात. फाळणीशी त्यांचा संबधीही नसतो. शिखांच्या मृतदेहांनी भरलेली ट्रेन अशा घटना - प्रसंगांनी व्यापलेल्या या कादंबरीचा थरार रोमांच उभे करतो. खुशवंतसिंग यांची खास शैली अनिल किणीकर यांच्या रसाळ अनुवादात उतरली आहे.
-
Pimpalpan Part 12 (पिंपळपान भाग -१२)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Pimpalpan Part 11 (पिंपळपान भाग -११)
आशयसमृद्घ, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श ‘मेनका’चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणार्या विलक्षण प्रवाही कथा हे ‘मेनका’चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणार्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान
-
Madhumehapasun Mukti (मधुमेहापासून मुक्ती)
मधुमेह हा आता श्रीमंतांचा आजार राहिलेला नाही. साखरेचं खाणार त्याला मधुमेह होणार, हेही पूर्ण सत्य नाही. मधुमेह हा जीवनशैलीशी आणि आपल्या शरीरातील चयापचय क्रियेशी निगडित असतो. मधुमेहापासून कधीच सुटका नाही, हे खरे असले तरी, एका सहज, सोप्या, योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढवणारी कार्यप्रणालीद्वारे मधुमेहापासून काही प्रमाणात तरी नक्कीच सुटका करून घेता येते. मधुमेहापासून कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत. या कथनात सत्य असले तरी मनुष्याच्या या बिकट आजारापासून मुक्तीचा शोध सुरूच आहे. या आशेमध्येच बरेच काही दडले आहे.
-
Fractured Freedom (फ्रॅक्चर्ड फ्रीडम)
फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक या प्रामाणिक माणसाने आणि त्याच्या जोडीदाराने, अनुराधाने, एक कठीण ध्येय समोर ठेवून केलेल्या वाटचालीबद्दल आहे. उपेक्षितांसाठी काम करण्याकरिता आयुष्य वेचलेल्या, आणि एका अधिक मानवी, अधिक न्याय्य समाजासाठी थेट कृती आवश्यक आहे असे मानणाऱ्या या दोन लोकांची ही कहाणी आहे. गत आयुष्यातील काही आठवणी, काही तुरुंगातील अनुभव सांगताना गांधी यांनी त्यांचे आयुष्य, प्रेम, गमावलेल्या गोष्टी, राजकारण अशा एकात एक गुंतलेल्या सगळ्या गोष्टींकडे मागे वळून पाहिले आहे. दहा वर्षे भारतातल्या विविध तुरुंगांमध्ये शारीरिक त्रास सोसावे लागलेल्या कोबाड यांनी त्यांच्या या दीर्घ तुरुंगवासाबद्दल, त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल, काफ्काच्या काल्पनिक जगातले वाटावेत अशा भारतीय कायदा व्यवस्थेच्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. एक अन्याय्य व्यवस्था एका शूर, धैर्यवान माणसालाही कशी दुबळी बनवते त्याचे हे प्रामाणिक आणि आडपडदा न ठेवता लिहिलेले वर्णन यात आहे. ही कहाणी आहे दोन टोकांवरच्या अनुभवांची – उच्चभ्रू जगातल्या संपन्नतेची, आणि आत्यंतिक निराशेची. आपल्या काळातल्या विविध घडामोडींची, आणि बहुसंख्य लोक ज्याच्यापासून दूरच राहतील अशा एका जीवनमार्गाची!