-
Mark Twainchya Nivadak Katha (मार्क ट्वेनच्या कथा)
‘लाखाची गोष्ट’ या कथेतील कंगाल नायकासमोर आव्हान आहे लंडनसारख्या शहरात दहा लाख पौंडाच्या नोटेच्या आधारे एक महिना तग धरून राहण्याचं. तो यशस्वी होतो का? ‘ऑनलाइन शुभमंगल’ कथेत अमेरिकेतील दूरदूरच्या दोन टोकांच्या शहरातील युवक-युवती एकमेकांना न पाहता टेलिफोनवरून माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्यांच्या प्रेमात कोणीतरी बिब्बा घालतं. काय होतं पुढे? ‘परतीची वाट’ या कथेतील हेन्री आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपल्या माहेरी गेलेल्या बायकोविषयी सांगत असतो. तिच्या येण्याची अतिथीही औत्सुक्याने वाट पाहत असतो. येते का ती?... ‘एक डाव भुताचा’ ही कथा पुतळ्याच्या भुताभोवती फिरते... ‘मृत्यूची गोल चकती’ ही कथा, आपल्या पित्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणाऱ्या निरागस मुलीची आहे...मार्क ट्वेनच्या रंगतदार शैलीतून साकारलेल्या आणि अंतर्मुख करणाऱ्या कथांचा संग्रह.
-
Runanubandh (ऋणानुबंध)
दुसऱ्यांच्या घरात केअरटेकर म्हणून राहताना नावाच्या आणि मुलाच्या प्रेमाला पारख्या झालेल्या नीलाताई...आईच्या अंत्ययात्रेत परक्यासारखं सामील व्हावं लागलेले गणेश जोशी...आयुष्यभर अहंकाराने पछाडलेले आणि जीवनाच्या संध्याकाळी नात्यांचं महत्त्व पटलेले डॅडा...स्वार्थी मुलाला धडा शिकवणारी लक्ष्मी... ‘डिव्होर्स’ घेता न आल्याचं शल्य आयुष्यभर मनात बाळगणारी निमाकाकी...जीवनभर दु:ख सोसल्यानंतर वृद्धपणी समाजाची वेगळ्या प्रकारे सेवा करणारे दादा...गर्भश्रीमंत तरुणाला नाकारणारी अनाथाश्रमातील बाणेदार सरिता...विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मानवी मनाचा वेध घेणाऱ्या , मानवी जीवनाचं यथार्थ चित्रण करणाऱ्या कथा
-
Marathi Daulatanche Nari Shilpa (मराठी दौलतीचे नार
जिजाबाईंच्या शिवरायांनी स्थापन केलेली मराठी दौलत ते ‘मेरी झांसी नहीं दुंगी’ म्हणणारी मराठमोळी राणी. या संपूर्ण मराठी दौलतीच्या कारकीर्दीमध्ये अनेक स्त्रियांचा अनन्य साधारण हातभार आहे. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग १ चे निवृत्त अधिकारी, कथालेखक, इतिहास अभ्यासक-लेखक गोपाळ देशमुख यांनी अशी मराठी दौलतीची नारी शिल्पं या पुस्तकात रेखाटली आहेत. भोसले राजघराण्यातील जिजाऊ, येसूबाई, ताराबाई, सरदारांतील उमाबाई दाभाडे, दर्याबाई निंबाळकर, पेशव्यांमधील गोपिकाबाई, पार्वतीबाई , रमाबाई ते अहिल्याबाई होळकर. पुस्तकातील पंधरा प्रकरणांतून मराठी सत्तेतील धडाडीच्या स्त्रियांची कर्तबगारी अभ्यासपूर्वक, ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषेत सांगितली आहे.
-
Khujaba (खुजाबा)
या विज्ञान कथासंग्रहा बारा कथा आहेत आणि प्रत्येक कथा ही स्वतंत्रपणे विज्ञान संकल्पना घेऊन पुढे आलेली आहे. या कथांमध्ये विज्ञान हाच खरा नायक असल्याने, विज्ञानाचा परिसस्पर्श जागोजागी जाणवेल यात शंका नाही. शिवाय, मूळ विज्ञानाच्या वाईटसाईट गोष्टींची उकल झाल्याचे निश्चितच दिसेल. ‘अपहरण’ ही कथा संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाणारी व त्याचा व्याप मांडणारी आहे. तर ‘आगंतुक’ ही कथा अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवाला संजीवनी देणारी व मानवी स्वभावाचे विघातक दर्शन घडवणारी आहे. तसेच, ‘साक्षीदार’ ही कथा मृत व्यक्तीच्या मेंदूतील स्मृती संचयाचे चित्रण करणारी आहे. ‘अज्ञात जीवाणू’ ही कथा जीवाणूंच्या डीएनए व जनुकांचा अभ्यास करताना, परग्रहावरील जीवाणूच्या शोधाचा परिपाक आहे. विविध विज्ञान संकल्पनांतून साकारलेल्या रंजक कथांचा वाचनीय संग्रह.
-
Shall We Tell The President? (शाल वी टेल द प्रेसिड
फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टीगेशनला अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खुनाच्या कटाची माहिती मिळते. ज्या पाच लोकांना या कटाची तपशीलवार माहिती असते, त्यातील चारजणांचा गूढ रीतीने मृत्यू होतो. ही सर्व माहिती एफ.बी.आय.चा एजंट मार्क अॅण्ड्र्यूज याला असते. या कटात एका सिनेटरचा हात आहे, हेही त्याला समजते. फक्त सहा दिवसांत त्याला या कारस्थानाची पाळेमुळे शोधायची असतात; पण मार्क हे कसे करणार? त्याच्या जीवालाही धोका असतोच! अध्यक्षांचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न करताना, मार्क स्वत:चे प्राण तर धोक्यात घालणार नाही ना? जगप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली उत्कंठावर्धक कहाणी. ‘शल् वी टेल द प्रेसिडेन्ट.’
-
Felanee (फेलानी)
सत्यघटनांवर आधारित हे पुस्तक म्हणजे धाडसाची, वांशिक लढ्याची - हिंसेची आणि तग धरून जिवंत राहिल्याची कथा आहे. आतापर्यंतच्या आसाम मधील दोन मोठ्या आंदोलनांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. यांचे राजकीय चित्रण या पुस्तकात आहे. आसामच्या लोकप्रिय कादंबरी लेखिकेने या पुस्तकात सत्ता स्पर्धेमध्ये दिसणारा मानवी जीवनाविषयीचा अनादर आणि अनास्था, सत्तेसाठी चाललेला किळसवाणा खेळ, त्यात सामील झालेल्यांचा ढोंगीपणा आणि वांशिक हिंसेची भयानकता यांचे कठोर आणि निर्भीड शब्दात चित्रण केलेले आहे. पुस्तकाची भाषा आणि एकामागोमाग येणाऱ्या घटना यामुळे श्वास रोखून वाचत जावे असे हे पुस्तक आहे.. फेलानी नावाच्या आसामी स्त्रीच्या अनुभवांभोवती हे कथानक गुंफलेले आहे. `फेलानी` या शब्दाचा अर्थ `फेकून दिलेली` असा आहे. कारण दंगलीमध्ये पेटलेल्या गावात तसेच टाकून फेलानेची आई निघून जाते. फ़ेलानेला दलदलीमध्ये फेकून दिले जाते. पण फेलाने आणि तिच्या सारखे हजारो अशाही परिस्थितीतून वाचतात. स्वतःचे मूळ हरवून बसलेली ही निरनिराळी माणसे रेफ्युजी कॅम्पस मध्ये एकत्र जगतात, आसामी नद्यांच्या खोऱ्यात एकत्र रुजतात, वाढतात. त्यांच्या या प्रवासाच्या कथा फेलानेच्या नजरेतून पुस्तकात सांगितल्या आहेत. राजकीय पार्श्वभूमीवर निर्माण झालेले हे सत्तेचे, संघर्षाचे, जिवंत राहून जगत राहिलेल्यांचे कथानक आहे.
-
The Lost City of Z (द लॉस्ट सिटी ऑफ Z)
अॅमेझॉन! जगातली सर्वांत मोठी नदी आणि तिच्या खोऱ्यात पसरलेले जगातले सगळ्यात मोठे जंगल. त्याला ते हरवलेले शहर – झेड शहर आणि ती नाहीशी झालेली संपन्न संस्कृती शोधायची असते; पण जंगलात गेल्यावर काही महिन्यांत तो नाहीसा होतो. त्याच्या शोधात गेलेले निम्मे लोक परत येत नाहीत. त्यानंतर डेव्हिड ग्रॅन नावाचा अमेरिकन पत्रकार फॉसेटच्या शोधात अॅमेझॉनच्या जंगलात जातो, जिथे सर्वाधिक आक्रमक जंगली जमाती राहत असतात.ऐंशी वर्षांपूर्वी जंगलात नाहीशा झालेल्या फॉसेटचा माग काढण्यासाठी, आपले गोजिरवाणे कुटुंब आणि रांगता मुलगा घरी सोडून जाणाऱ्या लेखकाला तिथे काय सापडते? हे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा – द लॉस्ट सिटी ऑफ झेड.
-
Nate Bramhandache (नाते ब्रह्मांडाचे)
मानवजातीच्या इतिहासामध्ये माणसाचे आणि ताऱ्यांचे कायमच एक घट्ट नाते राहिले आहे. कधीकाळी आपल्या धार्मिक श्रद्धांवर, सत्तेच्या संरचनांवर, वैज्ञानिक प्रगतीवर आणि अगदी आपल्या जीवशास्त्रावर सुद्धा ताऱ्यांचा कितीतरी प्रभाव होता. पण मागील काही शतकांपासून आपल्या भोवतालच्या अवकाशापासून आपण स्वतःला दूर ठेवले आहे. आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे, लागणार आहे. हे पुस्तक म्हणजे एक इतिहासाची सफर आहे. इतिहास कशाचा? तर लासकॉक्स गुहेतील आदिमानवाने काढलेल्या बैलांच्या चित्रांपासून ते ताहितियन नावाडी ताऱ्यांचा दिशादर्शकासारखा उपयोग करून प्रवास करू लागले तिथे पर्यंत. मध्ययुगीन साधू `काळाच्या` प्रकृतीला आव्हान देऊ लागले तिथपासून ते अवकाश आणि वेळ एकच असल्याचा आईनंस्टाईनला शोध लागला तिथेपर्यंत सगळ्याचा सोप्या आणि रंजक भाषेत सांगितलेला हा इतिहास आहे. लेखक असे सुचवतो आहे की आपण ज्या अवकाशाचा भाग आहोत ते अवकाश, त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम, त्यातील संभाव्य प्रेरणा आणि अविष्कार यांचा आपण नव्याने शोध घेतला पाहिजे.
-
Rahasya Prachin Natarajache (रहस्य प्राचीन नटराजा
अपंग असलेला टॉम पुरातत्त्व खात्याच्या एका लायब्ररीत मोठ्या पदावर काम करत असतो. नटराजाची एक चौलकालीन मूर्ती लिलावात विकत घेण्याची संधी टॉमला प्राप्त होणार असते; पण त्या मूर्तीच्या खरेपणाविषयी टॉमला शंका असते. म्हणून त्या मूर्तीचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तो त्याच्या भावाला, जोशला भरीला घालतो आणि इथूनच एका नाट्याला सुरुवात होते. त्या शोधासाठी इंटरनेट हॅकर असलेला जोश भारतात “NOT TOO LONG BEFORE WE CAN GET AS MANY OF THEM 3-D PRINTED.” THAT PRETTY MUCH SUMS UP JOSH WINSLOW’S FEELINGS ABOUT CLASSIC ARTIFACTS. AS A MAN OF SCIENCE AND TECHNOLOGY, HE COULDN’T CARE LESS ABOUT OLD BRONZE IDOLS. UNFORTUNATELY, HIS BROTHER TOM HAS JUST MADE ONE SUCH IDOL HIS PROBLEM. VIDYA THYAGARAJAN, A YOUNG BANKER येतो. इथे चेन्नईत त्याची भेट विद्याशी होते. विद्या आणि तो त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य शोधायला लागतात. पुरातन वस्तू विकणाNया एका छोट्या स्टोअरपासून सुरू झालेली ही शोधयात्रा एका मोठ्या स्टोअरपाशी येते, या स्टोअरच्या मालकाचं शंकास्पद वागणं गूढता निर्माण करतं. त्यातच विद्यावर पाळत ठेवली जात असते. लंडनमधून टॉम त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतो. विद्याचे वडीलही त्यांना मदत करत असतात. ही शोधयात्रा एका छोट्या गावातील मूर्तिकारापाशी येऊन थांबते. या मूर्तिकाराद्वारे उलगडतं का त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य?
-
Honour Among Thieves (ऑनर अमंग थीव्हज)
१९९१ च्या आखाती युद्धात अमेरिकेने सद्दाम हुसेनचा पराभव केल्यावर, सद्दामने त्याचा बदला घेण्याचा बेत केला. सद्दामने वापरलेले सर्वांत महत्त्वाचे शस्त्र म्हणजे माणसाची हाव. अमेरिकेतल्या नामांकित गुन्हेगारांना हाताशी धरून, सद्दामने अमेरिकेचा मानबिंदू असणारा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हस्तगत करण्याचा धाडसी बेत आखला आहे. त्यासाठी त्याने शंभर मिलियन डॉलर्सचे आमिष गळाला लावले आहे. जाहीरनाम्याची मूळ प्रत ताब्यात घेऊन, अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी जगभरातील वार्ताहर बोलावून त्यांच्यासमोर त्याचे जाहीर दहन करायची सद्दामची योजना आहे. सद्दामच्या या कारस्थानात अडथळा आहेत दोन व्यक्ती. स्कॉट ब्रॅडली, एकीकडे येल विश्वविद्यालयातील घटनात्मक कायद्याचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि दुसऱ्या बाजूला सीआयएचा उगवता तारा, जो कधीचाच प्रत्यक्ष कामगिरीवर जाण्यासाठी उत्सुक आहे. दुसरी आहे हान्ना कोपेक, मोस्साद या इस्रायली गुप्तहेर संस्थेची देखणी हस्तक; १९९१ च्या युद्धात तिने तिचे अख्खे कुटुंब गमावलेले आहे. सद्दामचा सूड हे आता तिच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. शह-काटशह, कट-कारस्थाने आणि वळणावळणांनी भरलेली ही वेगवान कथा वाचकांना खिळवून ठेवते.
-
Dreams Of Joy (ड्रीम्स ऑफ जॉय)
जॉय ही एकोणीस वर्र्षांची मूळ चिनी वंशाची मुलगी अमेरिकेतून चीनमध्ये येते, झेड. जी. या तिच्या चित्रकार असलेल्या वडिलांना शोधण्यासाठी. झेड.जी. तिला भेटतात. ती त्यांच्याबरोबर एका खेड्यात जाते. तिथे ताओ नावाच्या शेतकरी मुलाशी लग्न करते. तिला मुलगी होते; पण खेड्यातील कष्टप्रद जीवन, तिच्या नवNयाचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्त्रीद्वेष्टेपण तिला रुचत नाही. तिच्या खेड्यावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटात ती, तिचा नवरा आणि मुलगी मरणाच्या दारात जातात; पण तिला शोधत अमेरिकेहून चीनला आलेली तिची आई पर्ल आणि झेड.जी. त्यांना तिथून बाहेर काढतात आणि वाचवतात. आता या सगळ्यांना चीनमधून कायमचं निसटून हाँगकाँगला जायचं असतं; मात्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे ते महाकर्मकठीण असतं. कसं पार पाडतात ते हे दिव्य? शेवटी ते हाँगकाँगला पोचतात की नाही? कम्युनिस्ट राजवटीच्या पाश्र्वभूमीवरील, स्थलांतरितांच्या आणि स्थानिकांच्याही गळचेपीचं, शोषणाचं विदारक चित्रण करणारी कादंबरी.
-
The Women In The window (द वूमन इन द विंडो)
२४ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होणाऱ्या या कहाणीची नायिका आहे, मॅनहॅटनमध्ये एका भव्य घरात एकटीच राहणारी, बाल मानसशास्त्रज्ञ असलेली, ३८ वर्षांची अॅना फॉक्स! सुरुवातच अॅनाच्या हेरगिरीपासून होते. ती स्वतःच्या घरातून आजूबाजूच्या घरांवर आणि त्यातल्या लोकांवर आपल्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून असते. गेले दहा महिने तिने स्वतःच्या घराचा उंबरादेखील ओलांडलेला नसतो. अॅगोराफोबिया असल्याने घरातून बाहेर पडण्याची तिला नेहमी भीती वाटत असते. तशीच ती सातत्याने अगदी सराईतपणे मद्यपान करते. तिला जुन्या जमान्यातले उत्तमोत्तम कृष्ण-धवल चित्रपट पाहण्याचा छंद आहे. तिने आपल्या तळघरामध्ये डेव्हिड नावाच्या एका पेइंग गेस्टला राहायला जागा दिलेली आहे. तिच्या बोलण्यामधून समजते की, तिचा नवरा एड आणि ८ वर्षांची तिची मुलगी ऑलिव्हिया हे दोघेही तिच्यापासून दूर कुठेतरी राहत आहेत आणि ती त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे. अॅनाचे डॉक्टर आणि बिना ही तिचा व्यायाम घेणारी स्त्री हे दोघे अॅनाच्या घरात अधूनमधून ठरावीक काळाने येत असतात. त्यांना अॅनाबद्दल काळजी वाटते.
-
BYP, VIP Ani Mee! (बीवापी,व्हीआपी आणि मी !)
बी.वाय.पाध्ये पब्लिसिटी ह्या मुंबईतील नामवंत जाहिरात संस्थेची यशस्वी वाटचाल शब्दबद्ध करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. बीवायपी ह्या तीन अक्षरांनी महाराष्ट्रातील जाहिरातदारांच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केलेले आहे. विजय पाध्ये हे बी.वाय.पाध्येंचे चिरंजीव. त्यांच्या गेल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवांची ही शिदोरी म्हणजे जणू जाहिरातविश्वाच्या अभ्यासकांसाठी सोप्या शब्दांतील मार्गदर्शनच! व्यक्तिगत व व्यावसायिक जीवन सहजपणेे एकमेकात एकजीव झाल्याने ते संपन्न, समृद्ध व प्रेरणादायी कसे झाले हे वाचकांपुढे उलगडणारी स्मरणयात्रा.B. Y. Padhye publicity is most reputed, reliable and leading advertising agency in Mumbai since 1959. The author Vijay Padhye is son of its founder Late B. Y. Padhye with extensive experience of 50 years. This is his honest attempt to present BYP’s story and success journey. The book is filled with touching, inspiring and humorous anecdotes unfolding his memorable days in B. Y. P. Vijay Padhye's practical advice have helped hundreds of his clients and advertisers. This is a book exclusively for all commercial artists, who wants to know the secrets of running an advertising agency in today's world. Various topics explained well in this book will be a source of great knowledge to every reader. Vijay Padhye's unique approach to interpersonal relationships and professional empowerment gives you the tools to balance your personal and professional life. This book" BYP, VIP Ani Mee" is printed on glossy paper with lots of colourful pictures. Grab the book now!
-
Japan Athavanincha Collage (जपान आठवणींचा कोलाज)
राजश्री चतुर्वेदी लिखित जपान आठवणींचा कोलाज' हे पुस्तक जपान देशातील लेखिकेच्या अनुभवांचा एक साठा आहे. ह्या पुस्तकात जपानच्या भौगोलिक माहिती बरोबरच, तेथील राहणीमान, जनजीवन, खाद्यजीवन, सांस्कृतिक जीवन, शिस्त, सण, इकिगाई, काईझेन इत्यादीबद्दल विस्तृत व आवश्यक माहिती देण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. लेखिकेने जपान मध्ये जे अनुभवले ते जसेच्या तसे शब्दबद्ध करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ह्या पुस्तकात वाचकांना जपान आणि जपानशी संबंधित असलेल्या गोष्टी एकत्रित वाचावयास मिळतील. हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे.