-
The Bridge On The River Kwai (द ब्रिज ऑन द रिव्हर
’द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ ही दुसर्या महायुद्धाच्या वेळची एक कहाणी आहे. 1942मध्ये जपान्यांनी ब्रिटिशांवर विजय मिळविला होता. विजयी जपानी सेनेने ’युद्धबंदी’ म्हणून अशा कित्येक तुकड्यांना कैद करून त्यांना बँकॉक, सिंगापूर व रंगून यांना जोडणार्या एका रेल्वेमार्ग उभारणीच्या कामास लावले होते. यांतील एक तुकडी क्वाय नदीवर जो पूल उभारला जात होता, तेथे काम करत होती. कर्नल निकलसन हा त्या ब्रिटिश तुकडीचा प्रमुख होता, तर कर्नल साइतो हा विजयी जपानी तुकडीचा प्रमुख होता. अधिकार्यांनाही सैनिकांप्रमाणे या शारीरिक कष्टांच्या कामावर लावण्याच्या प्रश्नावरून या दोघा कर्नल्समध्ये वाद होतो व निकलसन साइतोशी संपूर्ण असहकार्य जाहीर करतो. मग अधिकार्यांच्या छळाला सुरुवात होते. तिकडे साइतोला तो पूल सहा महिन्यांच्या आत उभारण्याच्या आज्ञा मिळालेल्या असतात; पण या संघर्षामुळे कामाला धड प्रारंभच होत नाही. तिकडे साइतोला तो पूल सहा महिन्यांच्या आत उभारण्याच्या आज्ञा मिळालेल्या असतात; तर एकीकडे ब्रिटिशांची एक घातपात करणारी संघटना हा पूल उडवायच्या उद्योगाला लागलेली असते. तो पूल बनतो का आणि तो उडविलाही जातो का?
-
Gruhabhang (गृहभंग)
गृहभंग ही स्वातंत्र्यपूर्व भारतात 1920 ते 1940 सालादरम्यान घडणारी कादंबरी. याचं कथासूत्र एका चारी बाजूंनी समस्यांनी ग्रासलेल्या महिलेच्या, नंजम्माच्या संघर्षाभोवती फिरतं. मूर्ख नवरा, खाष्ट सासू, अंधश्रद्धाळू शेजार आणि भीषण गरिबी अशी ओढाताण सहन करत नंजम्माचा जीवनसंघर्ष सुरू आहे. नंजम्माची सासू प्रत्येक दुर्दैवाला नंजम्माला जबाबदार धरते. नवरा घरची जबाबदारी नाकारतो. अशात आपल्या निर्भेळ स्वभावानं आणि धैर्यानं नंजम्मा परिस्थितीवर मात करू पाहते. घरसंसार उभा करू पाहते. आत्मनिर्भरपणे उभं राहत असतानाच आपल्या मुलांना चांगलं आयुष्य आणि चांगले संस्कार देण्यास धडपडते. मानवी मनाच्या अतर्क्य व्यापारांमुळे आणि नियतीच्या घावांमुळे घायाळ झालेल्या नंजम्माची हदयाला पीळ पाडणारी कथा.
-
Amnesty (अमेन्स्टी)
श्रीलंकेचा मूळ रहिवासी असलेला धनंजय ऊर्फ डॅनी सिडनीत बेकायदेशीर स्थलांतर करतो. साफसफाईची कामं करून किराणा मालाच्या स्टोअर रूममध्ये लपून राहतो. एके दिवशी डॅनीला आपल्या एका मालकिणीचा - राधा थॉमसचा सुरा भोसकून खून झाल्याचं कळतं. त्याला हेही कळतं की, खून झाला, तेव्हा तिच्या अंगावर एक जॅकेट होतं. डॅनीच्या कल्पनेनुसार ते जॅकेट त्याच्या आणखी एका मालकाचं होतं. डॅनीला माहीत होतं की, त्या बाईचं त्या माणसाबरोबर प्रेमप्रकरण चाललेलं आहे. आता त्याच्यासमोर आकस्मिकपणे एक यक्षप्रश्न उभा आहे. खुनामागील ही हकिगत माहीत असणारा साक्षीदार म्हणून पुढे येऊन मायदेशी रवाना होण्याचा धोका पत्करावा की गप्प राहून अन्याय घडू द्यावा? डॅनीचा स्वतःच्याच सदसद्विवेकबुद्धीबरोबर झगडा सुरू होतो. एका देशांतरित माणसाच्या मनोवस्थेचा, आजच्या जगातील त्याच्या एका विशिष्ट अवघड आणि म्हणूनच निकडीच्या झालेल्या अवस्थेचा रहस्यपूर्णतेने तरी व्यामिश्रतेने घेतलेला वेध
-
Udayast (उद्यास्त)
एकीकडे कामाठीपुऱ्यातलं बदनाम वास्तव, तर दुसरीकडं विठोबाची भक्ती. या दोन्हीचा अनोखा संगम साधत रचलेलं दमदार कथानक म्हणजे, उद्यास्त (अवसान) ही कादंबरी. कामाठीपुऱ्यातल्या वेश्येच्या पोटी जन्मलेल्या सत्याची ही कहाणी. सत्याचं भविष्य उज्वल असावं म्हणून त्याची कामाठीपुऱ्यातून एका आश्रमात रवानगी होते. तिथं त्याच्यात विठुभक्तीचे नवे संस्कार रुजतात. सत्याचं आयुष्य नवी उभारी घेतं. पण त्याचं भागदेय तरीही त्याला सुखासीन आयुष्य बहाल करत नाही. तो नोकरी करत असलेल्या कारखान्याच्या मालकाचा मृत्यू होतो आणि त्याच्या आयुष्यात नवं वादळ येतं. मानवी नात्यातली गुंतागुंत आणि नैतिक-अनैतिकाच्या संकल्पनांमध्ये भरडल्या जाणाऱ्या आयुष्यांची ही आगळीवेगळी कहाणी.
-
Don Shinge Aslela Rushi (दोन शिंगे असलेला ऋषी)
देवादिकांचे आपापसातले भांडणतंटे असोत, नाहीतर महान ऋषी महर्षींच्या हातून घडलेले प्रमाद असोत, लोककल्याणकारी राजे असोत, नाहीतर सामान्यातील सामान्य माणसांच्या अंगातील सद्गुण असोत, भारतीय लोकप्रिय लेखिका सुधा मूर्तींनी भारतीय पुराणातल्या या तुम्हाला-आम्हाला फारशा परिचित नसलेल्या कथा शब्दबद्ध करून आपल्यासमोर ठेवल्या आहेत. ‘दोन शिंगे असलेला ऋषी’ हा सुंदर चित्रांनी नटलेला, साध्या-सोप्या, अतिशय प्रवाही आणि प्रत्ययकारी भाषेतल्या कथांचा संग्रह आहे. या संग्रहातल्या सर्वच कथा आबालवृद्धांच्या लाडक्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून उतरलेल्या असून, या कथा वाचकांची मनं जिंकून घेतील यात शंकाच नाही.
-
Humber Boy B (हम्बर बॉय बी)
बेन एक बाल गुन्हेगार आहे जो आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून नुकताच बाहेर पडलेला आहे. तो दहा वर्षांचा असताना त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलाचा नोहाचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊन तो तुरुंगात गेलेला होता. नोहाची आई फेसबुकवर बेनला शोधण्याची एक मोहीम सुरू करते. त्या मोहिमेत नोहाच्या आईला मदत करण्याच्या नावाखाली जेसिका या पात्राचा स्वत:चा असा एक सुडाचा प्रवास सुरू आहे. वर्तमानात हे घडत असताना मागे काय घडलं याचा एक धागा या कादंबरीत सतत विणलेला आहे. बेनची परिविक्षा अधिकारी असलेली केट आहे जी तिच्या भूतकाळाचं ओझं घेऊन जगते आहे आणि बेनला सुरक्षित ठेवण्याकरता धडपडते आहे. लिऑन आणि इस्सी हे बेनच्या नव्या आयुष्यातील पहिलं महत्त्वपूर्ण जोडपं आहे. नोहासारख्या निष्पाप, सरळमार्गी मुलाचा खून का केला गेलाय, याची जिज्ञासा जशी नोहाच्या आईला असते तशीच ती वाचकालाही लागून राहते. वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.
-
Bhagvatgita (भगवद्गीता)
ऐन रणांगणात समोर आप्तस्वकीयांना पाहिल्यावर युद्धापासून परावृत्त होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला कृष्णाने केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता...आज हजारो वर्षांनंतरही ही गीता जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन करते आहे...हे मार्गदर्शन सगळ्यांपर्यंत पोचवणे हा उद्देश आहे...गीता सांगते...आपल्या सद्सद्विवेकबुद्धीशी बोला...जे काही आहे, ते आपल्यामध्ये आहे आणि ते कधीही नष्ट पावत नाही(आत्मा)...कोणतंही काम मनापासून करा...काम-क्रोधावर नियंत्रण ठेवा...सन्मार्गाची कास धरा...श्रद्धा ठेवा...जबाबदारी घ्या...समानतेने वागा...स्वत:ला शिस्त लावा...ध्येयाचा पाठपुरावा करा...चांगला माणूस म्हणून जगा...स्वभावधर्माशी मैत्री करा... इ. मुद्दे या पुस्तकात उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत...आवश्यक तिथे चित्रांचीहीR जोड दिली आहे...त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असं आहे.
-
George and the unbreakable code (जॉर्ज एण्ड अनब्रे
जॉर्ज आणि अॅनी काही दिवस अंतराळ साहसांपासून दूर असतात. त्यांना आपल्या साहसी प्रवासातला थरार आठवत राहतो. पण अवघ्या काही दिवसातच त्यांच्यापुढं नवं आव्हान उभं राहतं. बॅंका फुकट पैसे वाटू लागतात. सुपरमार्केटमधलं सामान फुकट वाटलं जाऊ लागतं. विमानं उडायला नकार देतात. जगातले सर्वात मोठे आणि चांगले संगणक अचानक बंद पडतात आणि जणू जगाच्या व्यवहारालाच खीळ बसते. आणि जॉर्ज व अॅनीला याची कारणं शोधायला पुन्हा अंतराळात झेप घ्यावी लागते.
-
Dosti Duniyadari Aur Dil (दोस्ती दुनियादारी और दि
कबीर खान हा अनाथ मुसलमान मुलगा. काका-काकू कसंबसं सांभाळतात; पण देवधर सर आणि त्यांची बायको कालांतराने कबीरची जिम्मेदारी घेतात. तो खूप हुशार असतो. बोर्डात येतो, उत्तम शिक्षण घेतो. पुढे नोकरीतही झळकतो. प्रेमात पडतो, हिंदू मुलीशी लग्न करतो. त्यांना एक मुलगी होते. ‘तू मुस्लीम आहेस’ ही जाणीव समाज करून देत राहतो. कबीर तसं काही मानत नसला तरी मनात खोलवर अढी बसू लागते. मग तो मशिदीत जाऊ लागतो, कुराण वाचू लागतो, धर्मचर्चा करू लागतो. त्याच्या चार वर्षांच्या मुलीची, मीराची तिच्याहून तीन-चार वर्षांनी मोठ्या असलेल्या बांधकाम मजुराच्या मुलाशी, धनाशी असलेली मैत्री त्याला रुचत नाही. तो त्यांची मैत्री तोडायचा प्रयत्न करतो; पण त्याला यश येत नाही. मीरा वारंवार आजारी पडू लागते. तपासणीअंती तिच्या हृदयाला भोक असल्याचं निदान होतं. तिला हृदयरोपण करणं गरजेचं असतं. कोणाचं हृदय मिळतं तिला? सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी भावपूर्ण कादंबरी.
-
Destination (डेस्टिनेशन)
सचिवालयात काम करणारी दीपा सापडली आहे हाजी बिलाल नावाच्या एका क्रूर दहशतवाद्याच्या जाळ्यात...दीपाचा खोटा पासपोर्ट तयार करून तिच्यामार्फत इराकला कोकेन पाठवण्याची योजना आहे बिलालची...ते कोकेन माणसाला उत्तेजित करणारं आहे...महावीर नावाचा गुप्तहेर पोलिसांना मदत करतो दीपापर्यंत पोचण्यात...काय असते त्याची योजना?...वाचा ‘षड्यंत्र’ या कथेत... एका हवेलीत एक गुप्त खजिना आहे...त्याच्या किल्ल्या आहेत एका संग्रहालयात... तबरेज आणि खतिब या हवेलीचा मालक अल अमिन याच्या सांगण्यावरून त्या किल्ल्या चोरतात आणि अमिनच्या सुपूर्द करतात...दरम्यान, डीके नावाचा एक नामवंत उद्योजक मॉलमधील दोन मौल्यवान घड्याळं चोरतो आणि चोरी उघडकीला आल्यावर आत्महत्या करतो...अल अमिन आणि एका न्यूरो सर्जनचा डीकेंबाबत घडलेल्या घटनेशी संबंध आहे...काय आहे तो संबंध? किल्ल्यांची चोरी आणि डीकेंची आत्महत्या यातील धागेदोरे शोधत इन्स्पेक्टर धनंजय अल अमिनपर्यंत कसा पोचतो?... वाचा ‘मृगजळ’ ही कथा...दहशतवाद, गुन्हेगारांचं अंगावर शहारे आणणारं क्रौर्य आणि पोलीस, गुप्तहेरांचं असीम शौर्य अशा संघर्ष नाट्यातून रंगलेल्या थरारक कथांचा संग्रह
-
Ajun Nahi Jagi Radha (अजून नाही जागी राधा )
‘अजून नाही जागी राधा’ ही कथा अष्टवक्रा कुब्जा, राधा आणि अर्थातच श्रीकृष्ण यांचे अनोखे स्नेहबंध उलगडते. स्वच्छंदी जीवन जगणारी; पण प्रामाणिक स्त्री आदर्श पत्नी बनून नवऱ्याने न मागितलेले वचनही कसे निभावते त्याची कथा आहे ‘सावी’. साध्यासुध्या तरुणावर मनापासून एकतर्फी प्रेम करणारी सरपंचाची मुलगी मत्सरापोटी कोणत्या थराला जाते याचे चित्रण आहे ‘हवा’च तू’ या कथेत. विवाहाच्या गाठी नियोजित असतात, याचा प्रत्यय देणारी कथा आहे ‘तरीही...’ पतिनिधनानंतर महिलांची स्वार्थी मुला-मुलींकडून होणारी परवड/हेळसांड आठवणींच्या स्वरूपात शब्दबद्ध केली आहे ‘जेचं तेच्यापाशी’ कथेत. सुधारित परग्रहाने मैत्रीसाठी पृथ्वीवासीयांना दिलेल्या संदेशाची कथा आहे ‘चॉइस’. आशयपूर्णतेचा साज ल्यायलेल्या विविधरंगी कथांचा नजराणा.
-
Baichi Gosht (बाईची गोष्ट)
क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी षडरिपुंमधे दशांगुळं मातब्बर ठरते कामवासना! अन्य वासनांचा अंत शक्य आहे पण कामवासना मात्र अंतहीन! कामोपभोग घेणं हीच पुरुषप्राण्याची आदिम, उन्मत्त लालसा. कामवासना ही जशी सर्जनशील तशी विनाशकारीसुद्धा! कधी प्रेमरज्जू बांधते तर कधी सूडभावना चेतवते. तिची अनंत रुपं थक्क करणारी! ती स्वत:च्या अनावर प्रपातात पुरुषाला आणि क्वचित स्त्रीलासुद्धा अध:पतित करीत पशुत्वाच्या क्रूर पातळीला नेऊन ठेवते. कामवासनेच्या नानाविध रुपांना बळी पडलेल्या, कामशरणागत झालेल्या पात्रांच्या या श्रुंगारकथा समाजाला ‘सेक्स`च्या प्रदूषणाचा गंभीर विचार करायला भाग पाडतील अशाच आहेत.
-
Dharmavedha (धर्मवेध)
ल. सि. जाधव यांचे सर्व धर्मांविषयी चिंतन म्हणजे ‘धर्मवेध’ ही कादंबरी. इतिहासाचे सेवानिवृत्त प्राध्यापक चैतन्य आनंद हे कथानायक. त्यांच्या माध्यमातून हे चिंतन होताना दिसतं. वस्तुत: धर्म हा प्रेमाचा आविष्कार आहे. प्रेम हे मूलत: सर्वव्यापी असल्याने सर्व धर्मांतील प्रेमभाव लेखकास अभिप्रेत आहे. धर्माकडे, वैश्विक सत्याचे अधिष्ठान म्हणून ते पाहतात. वैचारिक मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे. तथापि, सकल मानवाचे कल्याण, बंधुत्व, सामंजस्य धर्मास अपेक्षित असूनही धर्माच्या नावे छळ, कलह, लढाई कशासाठी, अशा आशयाचे आणि त्या अनुषंगाने येणारे धर्मविषयक विचार कादंबरीतून व्यक्त होत राहतात. कथानायकाचं पत्नीच्या मृत्यूनंतरचं विरक्त जीवन, त्याचं धार्मिक पर्यटन, वेगवेगळ्या मठांमध्ये केलेलं वास्तव्य, संन्यास दीक्षा घेणं, धर्माचा अभ्यास करणाऱ्या आश्रमाची स्थापना करणं आणि आश्रमप्रमुख म्हणून काम करताना तेथील कामातील चढ-उतार अनुभवणं अशा कथानकातून, घटना-प्रसंगांतून कलात्मकतेने ही धर्मचर्चा घडवून आणली आहे.
-
Aaisi Akshare (ऐसी अक्षरे)
मुलीच्या अस्तित्वासाठी सासूला ठार मारणारी महुआ आणि महुआच्या मुलीचं पालकत्व स्वीकारणारी गौरी भेटते ’प्रतिबिंब’मध्ये...तरुण मुलाच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगणार्या अनिताच्या जीवनाला फुटलेल्या पालवीचं दर्शन घडतं ’फ्रायडे इव्हिनिंग’मध्ये...अल्झायमर या रोगाने ठाासलेल्या मीराताई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना उलगडतात ’यात्रा’मधून...तर ’गार्बेज’ कथा प्रकाश टाकते आजच्या तरुणाईच्या संस्कारांवर...’ओळखपरेड’मध्ये मृत्युशय्येवर असलेल्या आईला परदेशातून बघायला आलेली आणि त्याही परिस्थितीत नातेवाइकांचे टोमणे सहन करावे लागणारी गीता भेटते...यांसारख्या अन्य कथांतून नियती...मानवी मन...नातेसंबंध...सामाजिक परिस्थिती यांची गुंफण करणार्या आणि स्त्रीमनाचा वेध घेणार्या वाचनीय कथांचा संठाह ’ऐसी अक्षरे.