-
Mi Dharmikta Shikwato,Dharma Nahi! ( मी धार्मिकता
गेली सुमारे तीन-चार दशके, आपल्या अमोघ वाणीने आणि वेगळ्या विचाराने बुद्धिमंतांना मंत्रमुग्ध करणार्या ओशोंच्या निवडक बावीस व्याख्यानांचे संकलन म्हणजेच 'मी धार्मिकता शिकवतो, धर्म नाही’ हे पुस्तक. ह्या पुस्तकातील लेखांना व्याख्याने तरी कसे म्हणायचे? व्याख्यान आणि आख्यान ह्या दोहोंचा समन्वय साधणारा हा आगळावेगळा प्रकार आहे. मात्र एकदा पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर आपण त्या वाचनात गुंगून जातो. ओशो प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. हे त्यांचे वैशिष्ठ्य ह्या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते. त्यांनी इथे 'धर्म’ ह्या संकल्पनेलाच छेद दिला आहे. मात्र 'धार्मिकता’ ही संकल्पना ते मान्य करतात. अर्थात, 'धार्मिकते’चा त्यांनी लावलेला अर्थ 'योग्य, चांगलं आचरण’ असा आहे. हा अर्थही आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा वेगळाच आहे. धर्माने लोकमानसावर देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मनोनिग्रह, त्याग अशा गोष्टींचा इतका जबरदस्त पगडा बसवला आहे, की ओशोंचे विचार अशा मनाला अतिशय क्रांतिकारक वाटल्यास नवल नाही. सखोल चिंतनशीलता, प्रगाढ बुद्धिमत्ता आणि व्यापक अभ्यास असल्याशिवाय असे विचार मांडणे अशक्य आहे. अति गोड, रसाळ, प्रवाही भाषा, नर्म विनोद, चुटके सांगण्याची मोहक लकब ही ह्या लेखांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. म्हणूनच पुस्तक वाचू लागताच ओशो आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहेत, असे वाटत राहते आणि असा संवाद साधला गेल्यामुळे पुस्तक वाचून संपले, तरी आपण त्याच वातावरणात आणि आनंदात तरगंत राहतो.
-
Makadmeva (माकडमेवा)
महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे खास पीक असते तसा गावरान विनोदही असतो. गाव-ओढ्यासारखाच तो सतत खळाळत असतो आणि हरेक पाण्याची चव, तशी या विनोदाची चवही वेगळी असते, खास असते. भंपक माणसांनी मारलेल्या बढाव्यांतून, अडाण्यांच्या आणि अश्रापांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणीतून, तरण्यांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. रोज हसावे असे काही घडत असते. हरबर्याची आंब, रात्री कोवळ्या पिकावर फडके पसरून सकाळी धरता येते, पण पाणी दिलेल्या, कणसं, लोंब्या धरलेल्या उभ्या पिकांचा वास धरणे कठीण. मिरासदारांची शहाम्मत अशी की त्यांनी हा विनोद धरला आणि तोसुद्धा त्याच्या खास चवीसकट.
-
Yashacha Kanmantra (यशाचा कानमंत्र)
अमर चित्रकथा’सारखा स्तुत्य उपक्रम करणार्या अनंत पै ह्यांचे हे लेखन आहे. त्या कामात व्यग्र असतानाच त्यांच्या लक्षात आले की मुलांच्या मनात यशइच्छा असतेच पण काही वेळ त्यांची ह्यासाठीची मार्गक्रमणा चुकीची होत असते, काही वेळा त्यांना समजून घेण्यातच चूक झालेली असते न् त्यामुळे ते भरकटूही लागतात आणि बर्याचदा कमी पडतो तो त्यांचा आत्मविश्वास - तर ह्या सार्यावर मात करून यश कसे मिळवावे ह्याचेच हे मार्गदर्शन - "ध्येयानं आमूलाग्र परिवर्तन घडतं", "आत्मसंयमाने इच्छाशक्तीचा विकास", "निरीक्षणाने,श्रवणाने सुप्त सामर्थ्य जागृत करा", "ताणमुक्त व्हा आणि स्वत:ला नव्यानं घडवा" अशी पैलिखीत प्रकरणांची नुसती शीर्षके जरी वाचलीत तरी हा कानमंत्र थेट कसा पोचणारा आहे हे लक्षात येईल. 'काल-बँक-लिमिटेड’मध्ये पै ह्यांनी सांगितलेली वेळेची बचत तर सर्वांनाच उपयुक्त. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा. असेच आहे हे सारे !
-
Atmavishwasache Kanmantra (आत्मविश्वासाचा कानमंत्
आत्मविश्वास अभाव हे यश आपल्यापासून चार हात दूर राहण्याचे एक महत्त्वाचे कारण असते पण ते आपल्या लक्षात देतच नाही ह्याची कानउघडणी न करता जाणीव करून देत असतानाच हे यश संपादन करण्यासाठी हा अभाव कसा दूर करावा ह्याचा कानमंत्र देणारे हे पुस्तक. सर्वसाधारणपणे असा एक समज असतो की, फक्त बुद्धिमान आणि अभ्यासात उत्तम गुण मिळविणारांनाच भवितव्य असते. परंतु "तुला हे जमणारच नाही" किंवा "ही तुझी योग्यता नव्हे" असले अडसर जर आपर दूर करू शकला आणि तेच ते उगाळत बसण्यात वेळ दवडला नाही तर ही मूठभरांची मक्तेदारी राहणारच नाही तर ही मूठभरांची मक्तेदारी राहणारच नाही असा लेखकाचा दृढ विश्वास आहे न् ता त्यांनीही सहन शैलीतच व्यस्त केला आहे.
-
Arogayasathi Yog : Yogshastrachge Shastrasudha Niy
भारतीय संस्कृतीचा एक अभिमानास्पद घटक म्हणून योगशास्त्राला महत्त्व आहे. 'आरोग्यासाठी योग' या ग्रंथात महत्त्वाची योगासने आणि योगक्रिया यांची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. योगासने नियमित व शास्त्र्शुद्ध रीतीने केल्यास आपले आरोग्य निरामय राहते, शरीर कार्यक्षम राहते; आणि व्याधींपासून मुक्तता होते. आपला देह आणि आपले मन यांच्यामध्ये उत्तम संतुलन राहते. योगासनांद्वारे शरीरातील ग्रंथी आणि स्राव यांच्यावर योग्य ते नियंत्रण राहून दीर्घायुष्य लाभते. एका परीने यौगिक क्रिया आणि निसर्गोपचार यांचा उचित मेळ घेतला तर शारीरिक तक्रारी वा व्याधी यांचा अवसरच मिळणार नाही. शास्त्र्शुद्ध योगसाधनेचे रहस्य सुलभपणे उलगडून दाखवणारा हा ग्रंथ तुमच्या जीवनात क्रांती घडवून आणेल.
-
Ya Sukhano( या सुखांनो)
मानवी जीवनातील राग, लोभ, सुख-दु:ख, द्वेष-मत्सर, निंदा-स्तुती, विकृती-सुकृती. बुद्धीचे स्थान, सौंदर्याचे मर्म, यशस्वी जीवनाची दिशा इत्यादी मूलभूत वृत्ती- प्रवृत्तींवर प्रकाश टाकणारे शैलीदार असे हे ललित लेख आहेत. ते अतिशय शहाण्या शैलीत, दृष्टांत-उपमादी अलंकारांच्या, घटना-प्रसंगांच्या माध्यमातून आविष्कृत केलेले आहेत. लेखकाचे एक प्रौढ, संतुलित, संवेदनशील, सर्वांगांनी जीवनाचे मर्म शोधणारे चिरतरुण मन आणि आकर्षक, मोहक व्यक्तिमत्त्व या लेखांतून व्यक्त होते. अतिशय छोटेखानी स्वरूपाचे हे लेख मनाचा ठाव घेणारे, त्याला गुंगवून टाकणारे, पदोपदी वाचकाला विचारप्रवृत्त करणारे आहेत. पहिल्याच पुस्तकाचे त्यांचे हे यश विलक्षण वेधक ठरावे.