-
Krosha Vinkam (क्रोशा विणकाम)
बाहेर कुठेही विणलेले टेबलमॅटस्, पडदे, रूमाल पाहिले, की त्यांचे मनमोहक डिझाईन आपले लक्ष वेधून घेतात. आणि हे डिझाईन कसे केले असेल असा प्रश्न मनात येतो. एका सुईवर दोर्याने केलेले क्रोशाकाम पाहताक्षणी सर्वांनाच आवडते. या पुस्तकात अशीच अनेक डिझाईन्स पहायला मिळतील. सुई हातात कशी धरायची, टाक्यांची माहिती इथपासून विविध लेस, फुले, टेबलमॅटस्, टोप्या, कॉलर्स इ. साठी सुंदर डिझाईन कसे विणावे याची सचित्र माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. पुस्तकाच्या मदतीने स्वत: कलाकुसर करा आणि आपले घर सजवा.
-
Adam (अॅडम)
'अॅडम'चा नायक वरदाचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बर्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही "श्यामले'ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संबंध ठेवून वरदाचे जिणे उद्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या "प्रेमा'ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या "निर्मले'कडून किचिंत्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
-
The Last Juror (द लास्ट ज्यूरर)
मिसिसिपीमधल्या मनोरंजक, ढंगदार अशा साप्तहीकांपैकीच एक ' द फोर्ड कौंटी टाईम्स' हे १९७० मध्ये दिवाळखोरीत निघतं. पुष्कळांना वाईट वाटत असलं तरीही सगळ्यांना या गोष्टीचंआश्चर्य वाटतं की,कॉलेज सोडलेला एक २३ वर्षीय तरुण विली ट्रेनॉर त्याचा मालक बनतो. साप्ताहिकाचं भविष्य धड दिसत नसतं. याच सुमारास कुख्यात पॅडगिट फॅमिलीमधला डॅनी पॅडगिट एका तरुण विधवा स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिचीनिर्घृण हत्या करतो. विली ट्रेनॉर या घटनेची भीषण कथा त्याच्या पेपरमधून प्रसिद्ध करतो. साप्ताहिकाचा खप वाढतो.
-
Sanvad Parmeshwarashi
जीवनाला कलाटणी देणारा अनुभव. एक असामान्या संवाद. संवाद परमेश्वराशी. कल्पना करा तुम्ही देवाला अस्तित्व, प्रेम आणि श्रध्दा, विश्वास, जन्म आणि मृत्यू, चांगलं आणि वाईट या बद्दल गोंधळात टाकणारे प्रश्न विचारलेत. कल्पना करा देवानं त्यांची अगदी निःसंदिग्ध, स्पष्ट आणि सहज समजतील अशी उत्तरं दिली. नील डॉनाल्ड वॊल्श यांच्या बाबतीत हे घडलं- तुमच्याही बाबतीत हे घडू शकतं... तुम्हीसुध्दा असा संवाद करु शकता.. वॊल्शनं जेव्हा देवाला पत्र लिहायचं ठरवलं तेव्हा आयुष्यात ते निराशेच्या गर्तेत सापडलेले होते. त्यांना अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यांचं पत्र लिहून पूर्ण झालं--आणि मग त्यांना लिहितचं रहावसं वाटलं..त्यातूनच त्यांच्या प्रश्नांना ही अलौकिक, असामन्य उत्तरं मिळाली. ही अर्थपूर्ण, तत्वनिष्ठ आणि सत्याधिष्टित उतरं तुम्हाला चकित करतील. आपल्या सर्व श्रध्दा आणि परंपरांचा सखोल अर्थ त्यातून उलगडत जाईल. ही उत्तरं तुमच्या बरोबरच तुमचं आयुष्य, अन्य गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टकोन बदलून टाकतील. खुलं मन, असीम उत्सुकता आणि सत्यान्वेषणाची प्रामाणिक इच्छा असणा-यांसाठी हे पुस्तक दिव्य अनुभव ठरावं.