-
Share Bazar Jugar Che Buddhibalacha Dav (शेअर बाजा
शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
-
Chandralok (चंद्रलोक)
लक्षावधी वर्षांपूर्वी चंद्रजन्म कसा झाला? समुद्राला चंद्रामुळे भरती-ओहोटी का येते? चंद्राच्या लहरीप्रमाणे मानवी मनावर तरंग उमटतात का? सूर्यचंद्रांना लागणारी ग्रहणे, त्यांचा घास गिळायला टपून बसलेले राहू-केतू... यासारख्या गोष्टींचे खरे वैज्ञानिक स्पष्टीकरण काय? या व अशाच इतरही असंख्य प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे देतानाच गेल्या पन्नास-साठ वर्षांमध्ये रंगत गेलेल्या अवकाशस्पर्धेचा आढावा घेणारा हा देखणा ग्रंथ. रशिया-अमेरिकेतल्या स्पर्धेचे विविध टप्पे, अपोलो-11 मोहिमेसारख्या आजवर योजल्या गेलेल्या सर्व चांद्रमोहिमा आणि त्यांचे यशापयश...या आणि अशाच इतरही असंख्य घटनांचा सुबोध परामर्श घेणारा हा बहुरंगी ग्रंथ.
-
Pu.L.Chandane Smaranache (पु.ल.चांदणे स्मरणाचे)
तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला... अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला... मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा... हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! पुलंचं असणं... पुलंचं नसणं... ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत घेतलेला वेध पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा ! पु.ल. चांदणे स्मरणाचे
-
Abhyas Kasa Karava (अभ्यास कसा करावा)
दहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरुकिल्ली. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास - तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र |
-
Veerappan Viruddha Vijay Kumar (वीरप्पन विरुद्ध वि
चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार