-
Chanderi Srushti Soneri Goshti (चंदेरी सृष्टी सोने
हा चित्रपटसृष्टीचा इतिहास नव्हे. बोलपटांच्या सुवर्ण काळातल्या मनोरंजक गोष्टींची हि नोंद आहे. तो काळ अनुभवलेल्यांना स्मरणरंजन आणि न पाहिलेल्यांना त्यांचे कुतूहल जागृत होईल अशा गोष्टी यातल्या लेखांमध्ये मांडल्या आहेत. त्या वाचून चित्रपट सृष्टीचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी,हाही उद्देश या लेखनामागे आहे.
-
Hindata Firta. (हिंडता फिरता)
आयुष्य समृद्धीकडे नेणारा 'भ्रमंती' हा एक राजमार्ग आहे. पण हा रस्ता साधासुधा नाही. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करूनच ह्या रस्त्यावरून चालत जावे लागते. भ्रमंती हे माणसाच्या ठायी असलेल्या एकटेपणाला मिळालेले वरदान आहे. भ्रमंतीत माणूस कधी एकटा असत नाही. चाहोबाजूचा निसर्ग, अवतीभवतीची माणसे आपल्याशी संवाद करून असतात. या संवादातून बरेच काही शिकायला मिळते. भ्रमंतीतून निखळ आनंद मिळतो. गुलजार, गिरीश कुबेर, कुमार केतकर, रविमुकुल, राजीव खांडेकर, उदय निरगुडकर, विजय कुबलेकर, दीपक करंजीकर,राणी दुर्वे, सतीश भावसार, शशिकांत सावंत,द. वि अत्रे, सुनंदा भोसेकर, प्रदीप म्हापसेकर,सतीश काळसेकर,नवनीता सेन, दीपक घारे,उज्वला दळवी, रविप्रकाश कुलकर्णी . या लेखकांनी हिंडता-फिरता भ्रमंतीतून मिळालेला आनंद आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपण त्यांच्या ऋणात राहणेच चांगले.