-
Honour Among Thieves (ऑनर अमंग थीव्हज)
१९९१ च्या आखाती युद्धात अमेरिकेने सद्दाम हुसेनचा पराभव केल्यावर, सद्दामने त्याचा बदला घेण्याचा बेत केला. सद्दामने वापरलेले सर्वांत महत्त्वाचे शस्त्र म्हणजे माणसाची हाव. अमेरिकेतल्या नामांकित गुन्हेगारांना हाताशी धरून, सद्दामने अमेरिकेचा मानबिंदू असणारा स्वातंत्र्याचा जाहीरनामा हस्तगत करण्याचा धाडसी बेत आखला आहे. त्यासाठी त्याने शंभर मिलियन डॉलर्सचे आमिष गळाला लावले आहे. जाहीरनाम्याची मूळ प्रत ताब्यात घेऊन, अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी जगभरातील वार्ताहर बोलावून त्यांच्यासमोर त्याचे जाहीर दहन करायची सद्दामची योजना आहे. सद्दामच्या या कारस्थानात अडथळा आहेत दोन व्यक्ती. स्कॉट ब्रॅडली, एकीकडे येल विश्वविद्यालयातील घटनात्मक कायद्याचा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि दुसऱ्या बाजूला सीआयएचा उगवता तारा, जो कधीचाच प्रत्यक्ष कामगिरीवर जाण्यासाठी उत्सुक आहे. दुसरी आहे हान्ना कोपेक, मोस्साद या इस्रायली गुप्तहेर संस्थेची देखणी हस्तक; १९९१ च्या युद्धात तिने तिचे अख्खे कुटुंब गमावलेले आहे. सद्दामचा सूड हे आता तिच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. शह-काटशह, कट-कारस्थाने आणि वळणावळणांनी भरलेली ही वेगवान कथा वाचकांना खिळवून ठेवते.
-
Dreams Of Joy (ड्रीम्स ऑफ जॉय)
जॉय ही एकोणीस वर्र्षांची मूळ चिनी वंशाची मुलगी अमेरिकेतून चीनमध्ये येते, झेड. जी. या तिच्या चित्रकार असलेल्या वडिलांना शोधण्यासाठी. झेड.जी. तिला भेटतात. ती त्यांच्याबरोबर एका खेड्यात जाते. तिथे ताओ नावाच्या शेतकरी मुलाशी लग्न करते. तिला मुलगी होते; पण खेड्यातील कष्टप्रद जीवन, तिच्या नवNयाचं आणि त्याच्या कुटुंबाचं स्त्रीद्वेष्टेपण तिला रुचत नाही. तिच्या खेड्यावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटात ती, तिचा नवरा आणि मुलगी मरणाच्या दारात जातात; पण तिला शोधत अमेरिकेहून चीनला आलेली तिची आई पर्ल आणि झेड.जी. त्यांना तिथून बाहेर काढतात आणि वाचवतात. आता या सगळ्यांना चीनमधून कायमचं निसटून हाँगकाँगला जायचं असतं; मात्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे ते महाकर्मकठीण असतं. कसं पार पाडतात ते हे दिव्य? शेवटी ते हाँगकाँगला पोचतात की नाही? कम्युनिस्ट राजवटीच्या पाश्र्वभूमीवरील, स्थलांतरितांच्या आणि स्थानिकांच्याही गळचेपीचं, शोषणाचं विदारक चित्रण करणारी कादंबरी.
-
The Women In The window (द वूमन इन द विंडो)
२४ ऑक्टोबर रविवारपासून सुरू होणाऱ्या या कहाणीची नायिका आहे, मॅनहॅटनमध्ये एका भव्य घरात एकटीच राहणारी, बाल मानसशास्त्रज्ञ असलेली, ३८ वर्षांची अॅना फॉक्स! सुरुवातच अॅनाच्या हेरगिरीपासून होते. ती स्वतःच्या घरातून आजूबाजूच्या घरांवर आणि त्यातल्या लोकांवर आपल्या कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून असते. गेले दहा महिने तिने स्वतःच्या घराचा उंबरादेखील ओलांडलेला नसतो. अॅगोराफोबिया असल्याने घरातून बाहेर पडण्याची तिला नेहमी भीती वाटत असते. तशीच ती सातत्याने अगदी सराईतपणे मद्यपान करते. तिला जुन्या जमान्यातले उत्तमोत्तम कृष्ण-धवल चित्रपट पाहण्याचा छंद आहे. तिने आपल्या तळघरामध्ये डेव्हिड नावाच्या एका पेइंग गेस्टला राहायला जागा दिलेली आहे. तिच्या बोलण्यामधून समजते की, तिचा नवरा एड आणि ८ वर्षांची तिची मुलगी ऑलिव्हिया हे दोघेही तिच्यापासून दूर कुठेतरी राहत आहेत आणि ती त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे. अॅनाचे डॉक्टर आणि बिना ही तिचा व्यायाम घेणारी स्त्री हे दोघे अॅनाच्या घरात अधूनमधून ठरावीक काळाने येत असतात. त्यांना अॅनाबद्दल काळजी वाटते.
-
BYP, VIP Ani Mee! (बीवापी,व्हीआपी आणि मी !)
बी.वाय.पाध्ये पब्लिसिटी ह्या मुंबईतील नामवंत जाहिरात संस्थेची यशस्वी वाटचाल शब्दबद्ध करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. बीवायपी ह्या तीन अक्षरांनी महाराष्ट्रातील जाहिरातदारांच्या मनात आदराचे स्थान प्राप्त केलेले आहे. विजय पाध्ये हे बी.वाय.पाध्येंचे चिरंजीव. त्यांच्या गेल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवांची ही शिदोरी म्हणजे जणू जाहिरातविश्वाच्या अभ्यासकांसाठी सोप्या शब्दांतील मार्गदर्शनच! व्यक्तिगत व व्यावसायिक जीवन सहजपणेे एकमेकात एकजीव झाल्याने ते संपन्न, समृद्ध व प्रेरणादायी कसे झाले हे वाचकांपुढे उलगडणारी स्मरणयात्रा.B. Y. Padhye publicity is most reputed, reliable and leading advertising agency in Mumbai since 1959. The author Vijay Padhye is son of its founder Late B. Y. Padhye with extensive experience of 50 years. This is his honest attempt to present BYP’s story and success journey. The book is filled with touching, inspiring and humorous anecdotes unfolding his memorable days in B. Y. P. Vijay Padhye's practical advice have helped hundreds of his clients and advertisers. This is a book exclusively for all commercial artists, who wants to know the secrets of running an advertising agency in today's world. Various topics explained well in this book will be a source of great knowledge to every reader. Vijay Padhye's unique approach to interpersonal relationships and professional empowerment gives you the tools to balance your personal and professional life. This book" BYP, VIP Ani Mee" is printed on glossy paper with lots of colourful pictures. Grab the book now!
-
Japan Athavanincha Collage (जपान आठवणींचा कोलाज)
राजश्री चतुर्वेदी लिखित जपान आठवणींचा कोलाज' हे पुस्तक जपान देशातील लेखिकेच्या अनुभवांचा एक साठा आहे. ह्या पुस्तकात जपानच्या भौगोलिक माहिती बरोबरच, तेथील राहणीमान, जनजीवन, खाद्यजीवन, सांस्कृतिक जीवन, शिस्त, सण, इकिगाई, काईझेन इत्यादीबद्दल विस्तृत व आवश्यक माहिती देण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. लेखिकेने जपान मध्ये जे अनुभवले ते जसेच्या तसे शब्दबद्ध करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ह्या पुस्तकात वाचकांना जपान आणि जपानशी संबंधित असलेल्या गोष्टी एकत्रित वाचावयास मिळतील. हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे.