-
Madhu Mangesh Karnik: Vyaktimattva Aani Vangmain K
मधु मंगेश कर्णिक हे मराठीतील एक सव्यसाची साहित्यिक आहेत. गेल्या पन्नास वर्षांत सहाशेहून अधिक कथा, ‘देवकी’, ‘माहीमची खाडी’, ‘भाकरी आणि ङ्गूल’, ‘सनद’, ‘जुईली’, ‘वारूळ’, ‘संधिकाल’ इत्यादी दहा कादंबर्या, आठ ललित लेखसंग्रह, तीन व्यक्तिचित्रसंग्रह इत्यादी विविधांगी साहित्यनिर्मिती त्यांनी केली आहे. तीन नाटक, बालसाहित्य, कविता, संपादने अशाही स्वरूपाच्या निर्मितीचा समावेश होतो. ‘जैतापूरची बत्ती’ हे त्यांचे अगदी अलीकडचे पुस्तक त्यांच्या कोकणप्रेमातून निर्माण झाले आहे. त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व हे कोकण या जन्मभूमीशी तसेच मुंबई या महानगरीशी अंतर्बाह्य स्वरूपात संबंधित आहे. नवनव्या विषयांचा कुतूहलपूर्ण वेध घेणारे, बहुविध जीवनानुभवांचे सहानुभूतिपूर्ण चित्रण करणारे, मानवतावादी भूमिकेतून दु:खाशी सहकंप पावणारी साहित्यनिर्मिती करणारे, भावनांना आवाहन करणारे तरीही विचारांना प्रेरणा देणारे, माणसाच्या अध:पतनाचा आणि सामाजिक-सांस्कृतिक मूल्यर्हासाचा आलेख रेखाटणारे, सुगम, आवाहक साहित्यनिर्मिती करणारे लेखक म्हणून मधु मंगेश कर्णिकांचे मराठी साहित्यातील स्थान अढळ आहे. मधु मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्त्व आणि वाङ्मयीन कर्तृत्व या ग्रंथात डॉ. महेश खरात यांनी कर्णिक यांच्या समग्र वाङ्मयाचा सूक्ष्म वेध घेतला आहे. कर्णिकांच्या लेखनाचे बहुविध विशेष या ग्रंथामधून त्यांनी सप्रमाण विशद केले आहेत. त्यामुळे मधु मंगेशांच्या व्यक्तिमत्त्वावर व कार्यकर्तृत्वावर चांगला प्रकाश पडला आहे. गेवराई येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहात असलेल्या डॉ. महेश खरात यांच्या प्रस्तुत ग्रंथामुळे कर्णिकांविषयीच्या साहित्यसमीक्षेत मोलाची भर पडली आहे. -विलास खोले
-
A-Joon Tendulkar (अ जून तेंडुलकर)
समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.
-
Nude Painting Part 3 (न्यूड पेंटिंग भाग ३)
या कथेत मुबंईत निकिता शर्मा नामक मुलीच्या खुनापासून सुरु झालेली एक घटना अगस्तीला हिमाचल प्रदेशात नेते. काही धागेदोरे असे सापडतात की, तिथून तो जातो गडचिरोलीतल्या सिरोंचा गावात. शेवटी लक्षात येतं की, या सगळ्यामागे असतं ते एका सुप्रसिद्ध चित्रकाराने कधी काळी चितारलेलं एक न्यूड पेंटिंग...! रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं... कुठेतरी काहीतरी घडलंय...अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, 'हॅट्स ऑफ यार अगस्ती!'
-
Angathi 1820 Part 2 (अंगठी १८२० भाग २)
'अंगठी १८२०' या कथेत सौंदर्यवती शगुफ्ता अगस्तीकडे तिच्या पूर्वजांची अंगठी शोधून काढण्याची केस घेऊन येते. त्या अंगठीचा सबंध बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध 'खान'शी असल्याचं अगस्तीला समजतं. म्हणून तो खानच्या कुटुंबांची पाळंमुळं खणतो. तेव्हा समोर येतं वेगळंच रहस्य - वेगवेगळ्या कारणांसाठी ती अँटिक व्हॅल्यू असलेली अंगठी वेगवेगळ्या लोकांना हवी असते... रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं... कुठेतरी काहीतरी घडलंय...अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, 'हॅट्स ऑफ यार अगस्ती!'