-
Satiche Vaan (सतीचे वाण)
सतीचे वाण' म्हणजे गोवामुक्तिसंग्रामाच्या गौरवशाली स्मृति आहेत. त्या अनुभवल्या आहेत संग्रामात सक्रीय भाग घेतल्याच्या 'गुन्ह्या' दाखल २६ वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या मोहन रानडे यांनी. मुक्तिसंग्राम, गोवा व पोर्तुगाल येथे भोगावा लागलेला १९५५ ते १९६९ पर्यंतचा तुरुंगवास, आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतीतील स्वातंत्र्यलढा, पोर्तुगालमधील हुकुमशाहीविरुद्धचा दीर्घ संघर्ष याच्याशी संबंधित या स्मृति आहेत. गोवा मुक्तिसंग्राम गोव्यापुरता कधीच सीमित नव्हता. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील ती अखेरची लढाई होती, तर पोर्तुगीज साम्राज्यवादविरोधी युध्दातील ती पहिली रणभेरी होती. गोवामुक्ति भारतीय स्वातंत्र्याची पूर्णता होती, तर आफ्रिकेतील पोर्तुगीज साम्राज्याची तसेच पोर्तुगालमधील हुकुमशाहीची ती मृत्युघंटा होती. अन्यायाविरुद्ध संतापाने उठलेली सामान्य जनता कशी असामान्यपणे लढते, इतिहासाचा ओघ कसा बदलू शकते याचे साक्षात दर्शन पुन: एकदा 'सतीचे वाण' घडविते.
-
Sattaritla Bharat (सत्तरीतला भारत)
स्वतंत्र भारताचा सखोल समीक्षात्मक आढावा.. देशाचा सत्तर वर्षांतला झंझावाती प्रवास... फाळणीपासून ते १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामांची छाप, लोकपाल विधेयक ते नोटाबंदीचे धोरण; या साऱ्या आठवणींचा लेखाजोखा यात समाविष्ट आहे. त्यातून भारत देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होते.
-
Roop Kara Surup ( रूप करा सुरूप)
त्वचेविषयी सर्वांगीण मार्गदर्शन करणारं उपयुक्त पुस्तक आहे ‘फीड युवर फेस’ (रूप करा सुरूप). परदेशात ज्याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या, अशा या पुस्तकात डॉ. जेसिका वू यांनी त्वचेची रचना, तिचे कार्य, अन्नाचा आणि त्वचेचा संबंध, मुरुमे, त्वचा रापवावी की रापवू नये, सुरकुत्या पडण्याआधी त्यांना प्रतिबंध कसा करावा, बळकट, आरोग्यपूर्ण केस आणि नखांसाठी घ्यायचा आहार, चेहऱ्याला पोषक आहार, चेहऱ्याचे अतिरिक्त पोषण, चेहऱ्याला लावण्याचे अन्नपदार्थ आणि वृद्धत्वातही डौलदार कसे दिसावे, इ. विषयी मार्गदर्शन केले आहे. उपयुक्त क्लृप्त्या, रुग्णांच्या सत्यकथा आणि त्यांचे आधीचे व नंतरचे फोटो यांचाही या पुस्तकात समावेश आहे.
-
Sagari Parikramecha Parakram (सागरी परिक्रमेचा परा
आयएनएसव्ही ‘म्हादेई’ या शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे कमांडर दिलिप दोंदे हे अशा प्रकारची पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय ठरले. ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’ या पुस्तकात त्यांचा पाच वर्षांतील प्रवास व प्रगती त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आली आहे. अनेक अडथळे आणि संकटांना तोंड देत त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा कशी पूर्ण केली, याचे अत्यंत रोचक वर्णन त्यांनी केले आहे. विपरीत परिस्थितीचा सामना करताना एका माणसाने आपली स्वप्ने कशी साध्य केली, याची गुंगवून टाकणारी ही कहाणी एक साहसयात्रा तर आहेच, पण त्याबरोबर स्वतःवरच्या अटळ विश्वासाची विजयगाथाही आहे.
-
The Kill List ( द किल लिस्ट)
दहशतवादाची समस्या जगातल्या महत्त्वाच्या देशांना भेडसावताना दिसते. अमेरिकेत दहशतवादानं थैमान घातलेलं असतानाच इंग्लंडमध्येही ते थैमान सुरू होतं आणि मग इंटरनेटवरून एक बुरखाधारी इस्लामी पाश्चात्त्य जगाविरोधात अतिविखारी भाषणं देताना, प्रचार करताना आणि पाश्चात्त्यांच्या हत्येचं आवाहन करताना आढळतो. त्याला टोपण नाव दिलं जातं. द प्रीचर. त्याच्या शोधाची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली जाते. त्या प्रीचरपर्यंत हा अधिकारी कसा पोहोचतो आणि त्या शोधादरम्यान या दहशतवादाशी संबंधित घटनांची आणि व्यक्तींची संगती कशी लागत जाते, याचं थरारक चित्रण म्हणजे ‘द किल लिस्ट’ ही कादंबरी. दहशतवादाच्या रंदावलेल्या कक्षा, त्याची पाळंमुळं खणून काढण्याचं आव्हानात्मक आणि धाडसी काम, आधुनिक तंत्रज्ञानाचा दहशतवाद्यांकडून होत असलेला गैरवापर आणि या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींवर ‘द किल लिस्ट’ ही कादंबरी प्रकाश टाकते. त्यातील थरार अनुभवण्यासाठी ती वाचलीच पाहिजे.
-
Never Marry A Woman With Big Feet (नेव्हर मॅरी अ व
स्त्रीचा देह असो वा आत्मा..जगभरच्या म्हणींनी या स्त्रीरूपाचे नानाविध अविष्कार सादर केले आहेत. या म्हणींमधून स्त्रियांचं सामाजिक स्थान अधोरेखित होतं. याचं सखोल चिंतन आणि २४५ भाषांमधील स्त्रीविषयक म्हणी आणि त्यांची विश्लेषणे या पुस्तकात समाविष्ट आहेत. लेखिका मिनेक शिप्पर यांच्या अतिशय रंजक व टीकात्मक संकलन शैलीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यांतील शाश्वत तरीही सतत विकसनशील असलेल्या म्हणींमधून स्त्री व पुरुष दोघेही किती विकसित झाले आहेत, याची एक ढोबळ आकृती वाचकांसमोर स्पष्ट होते.
-
Dharmayuddha (धर्मयुद्ध)
महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने नानाविध पैलूंमुळे अनेक कलावंतांना भुरळ घातली आहे. कोणालाही लाजवेल अशी क्षमता, योग्यता आणि सामथ्र्य असूनही पदोपदी डावलला गेलेला कर्ण हे तेजोभंगाचे जिवंत प्रतीक आहे. अखंड संघर्षाने जीवनभर होरपळून निघालेल्या या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी आपल्या पद्धतीने केला आहे. कवचवुंÂडले, संजयाची दिव्यदृष्टी, श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र, त्याचा गोवर्धन पर्वत बोटावर उचलण्याचा पराक्रम, द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी कृष्णाकडून तिला पुरविण्यात आलेली वस्त्रे अशा अनेक चमत्कृतिपूर्ण घटनांची साखळी महाभारतात आढळते. तरीही तत्कालीन वर्णव्यवस्थेविरुद्ध वेळोवेळी बंड पुकारणारा कर्ण इतर अनेक सामथ्र्यशाली व्यक्तिरेखांच्या भाऊगर्दीत प्रकर्षाने नजरेत भरतो. या कथेतील सर्वच व्यक्तिरेखा मानवी संसारातील सुखदुःखे अनुभवत असल्याची जाणीव होते. ही माणसेही आपल्यासारखीच संसारातील समस्यांना सामोरी जाताना दिसतात. नेमका हाच दृष्टिकोन स्वीकारून आणि पारंपरिक दृष्टी निग्रहाने अव्हेरून कर्णकथेचा वेध घेणारी रवींद्र ठाकूर यांची ‘धर्मयुद्ध’ ही कादंबरी. इतर मराठी कादंबNयांमध्ये चित्रित झालेल्या कर्णापेक्षा ‘धर्मयुद्ध’मधील कर्ण मातीचे पाय असलेल्या व्यक्तिरेखांच्या अधिक जवळचा आहे.
-
Hell Mates (हेल मेट्स)
सत्य आठवणी व काल्पनिक प्रसंग यांना विनोदाचा मसाला लावून द्वैअर्थी शब्दांची फोडणी देऊन डॉ. नंदकमुार उकडगावकर यांनी लिहिलेल्या अठरा लेखांचं पुस्तक आहे ‘हेल मेट्स.’ शाब्दिक कोट्या हा या पुस्तकाचा गाभा! रोजच्या वापरातील शब्दांना वेगळे संदर्भ लावून हास्य फुलवता येते हे दाखवण्यासाठी केलेला हा खटाटोप. या लेखसंग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे -अर्धा शब्द मराठीतला व अर्धा इंग्रजीतला घेऊन काही नवीन शब्द तयार केले आहेत. त्यामुळे उच्चार जरी सारखा असला तरी त्यातून दोन वेगवेगळे अर्थ निघतात. उदा. बायो व MATRIC • बायोमॅट्रिक. या शिवाय प्रचलित शब्दांना नवे अर्थ लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक • पाठीवरचा मजकूर. ‘सवंगडी,’ ‘माझे हेल मेट्स,’ ‘माझं पाषाणयुग,’ ‘माझं पाठ्यपुस्तक,’ ‘आमची स भु’ या लेखांमध्ये शाळेतील आठवणी आहेत. सोबत आत्मचरित्राच्या जवळपास जाणारे ‘माझं ‘कृष्णा’यण,’ ‘आमचं ‘वैद्य’कीय महा ‘विद्या’लय,’ ‘किस्सा एमडीचा’ व ‘मा मा (माझी मास्तरकी)’ लेखही आहेत.
-
Sanvad Parmeshwarashi (संवाद परमेश्वराशी)
मानव परिवाराचं पुनरुज्जीवन करणं, हा संवाद परमेश्वराशी – भाग ३’ या पुस्तकामागचा उद्देश आहे. स्वत:ला जाणून घेऊन नव्या दिशेने कसं जायचं याचं मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. केवळ माणसाच्या जन्माला येणं, जगणं आणि मरणं, एवढीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता नाही, तर अखंडपणे स्वत:ची उन्नती करत राहणं, हे त्याच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, असा विचार या पुस्तकात मांडला आहे. आपण कोण आहोत आणि काय होऊ शकतो याबद्दल हे पुस्तक बोलतं. ते जुन्या आणि नव्या मार्गांबद्दल संगतं, तसंच ते नव्या-जुन्या समजुती, कालबाह्य संकल्पना आणि सदैव उपयोगी संकल्पना यावरही भाष्य करतं. भूत आणि भविष्याच्या मध्यावर उभा राहून माणूस सतत प्रगती कशी करत राहील, नवनिर्मितीच्या दिशेने त्याची पावलं कशी पडतील, याचं विस्तृत विवेचन या पुस्तकातून केलं आहे.