-
Vivekachya Vatevar (विवेकाच्या वाटेवर)
डॉक्टर, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकातून, लेखातून; तुम्ही दिलेल्या प्रत्येक व्याख्यानातून, मुलाखतीतून; तुमच्या प्रत्येक उक्तितून अन् कृतीतून विवेकवादाचे पाऊल पुढे पडत राहिले. ही विवेकाची वाटचाल भविष्यातही अशीच चालू राहावी, यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.
-
Bhootan (भूतान)
देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान… पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान… वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान… सगळा देशच जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान… हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान ! अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.
-
Nyootanate Vaat Pusatu (न्यूटनांते वाट पुसतू)
गीता-ज्ञानेश्वरीतील काही विधाने आजच्या आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशी आश्चर्यकारक साम्य दाखवतात. या विधानांना वैज्ञानिक आधार नाही, पण म्हणूनच ती अधिक कुतुहलजनक ठरतात. ‘अध्यात्म विरुद्ध विज्ञान’ असे कृत्रिम द्वंद्व उभारून वितंडवाद घालत बसण्याऐवजी या विधानांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल का? विज्ञानाने दाखवलेल्या मार्गाने भौतिकशास्त्रातील एका वैज्ञानिकाने घेतलेला गीता-ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाच्या काही अंगांचा वेध म्हणजे न्यूटनांते वाट पुसतु
-
Kon Hote Sindhu Lok (कोण होते सिंधू लोक)
पद्मश्री डॉ. म. के. ढवळीकर. पुरातत्त्वातील अनेक कूटस्थळांचा वेध घेणारे जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वज्ञ. सहजसोपी लेखनशैली अन् नेटकी मांडणी यामुळे पुरातत्त्वासारखा व्यापक विषय त्यांनी रंजक आणि रुचिपूर्ण बनवला. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे विविध विषय त्यांनी अनेक पुस्तकांमधून वाचकांसाठी सुबोध बनवले. इसवीसनपूर्व तिसरे सहस्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृतिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात मागोवा घेत आहेत एका आजवर न उलगडलेल्या प्रश्नाचा – कोण होते सिंधू लोक ?
-
BhagatSinghcha Khatla (भगतसिंगचा खटला)
भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण ‘लाहोर कटा’च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी – हाच या वटहुकमाचा हेतू होता.
-
Swarthatoon Sarwarthakade (स्वार्थातून सर्वार्थाकड
हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही. जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून, तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे. सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच. पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची; आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो, याचे भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा ! अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे चार्ल्स व्हीलन यांचे ‘नेकेड इकॉनॉमिक्स’ हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत.
-
Nahi Mi Ekala (नाही मी एकला)
आमच्या वाडवडलांच्या हाती पाटी-पुस्तक आले नाही, परंतु त्यांच्याकडे जन्मजात शहाणीव होती. गरिबी होती, लाचारी नव्हती. दैन्य होते, दारिद्र्य नव्हते. संघर्ष होते, वैर नव्हते. अंधश्रद्धा होती, अमानुषता नव्हती. जीवनाने कधी क्रूर थट्टा केली, तरी त्यांनी प्राणपणाने श्रद्धेच्या वातीचे रक्षण केले आणि श्रद्धेने त्यांना तारले. श्रद्धेसाठी ते ‘भावरत’ असा शब्दप्रयोग करीत. पिढ्यान् पिढ्यांचा ‘भावरता’चा वारसा जपणारे स्फटिकासारखे स्वच्छ, पाण्यासारखे प्रवाही, निसर्गासारखे निर्मळ आत्मकथन.
-
Share Bazar Jugar Che Buddhibalacha Dav (शेअर बाजा
शेअर म्हणजे कंपनीच्या मालमत्तेवर आपला हक्क आणि नफ्यात पूर्ण हिस्सेदारी; पण कंपनीला तोटा झाला, तर मात्र आपल्यावर काहीच जबाबदारी नाही. चांगल्या शेअर्समुळे म्हणून तर समृद्धीची गंगाच दारी अवतरू शकते. पण मुळात शेअर्स म्हणजे काय? ते मिळतात कुठे? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती? इन्ट्रा-डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची? ताळेबंद व नफा- तोटा पत्रक कसे वाचायचे? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही, हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे? नेमके हेच तर सारे सांगितले आहे या पुस्तकात! तुमच्या सा-या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक शेअर बाजार जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
-
Anantachi Fule (अनंता'ची फुले)
एके काळी दर्जेदार मासिकं म्हणून गाजलेल्या 'सत्यकथा' आणि 'हंस' या मासिकांचे अनुक्रमे कार्यकारी व संस्थापक-संपादक म्हणून काम केलेल्या अनंत अंतरकर यांची ही जीवनकहाणी. त्यांच्या मुलीनेच लिहिलेली. लेखिका अनुराधा औरंगाबादकर यांनी शीर्षक पानावर 'जीवनकहाणी' असे तर प्रास्ताविकात 'चरित्र' असे दोन्ही शब्द वापरले आहेत. मात्र या पुस्तकाला अंतरकरांची जीवनकहाणीही म्हणता येणार नाही आणि चरित्र तर नाहीच नाही. वडिलांविषयीच्या आठवणी जमवताना केलेले प्रयत्न, लेखिकेचं स्वत:चं आत्मचरित्र आणि अंतरकरांविषयीच्या लेखिकेच्या आठवणी असं या पुस्तकाचं एकंदर स्वरूप आहे.