-
Asura(असुर)
भारतीय लेखक आनंद नीलकंठन 2012 च्या यशस्वी लेखकांपैकी एक म्हणून निवडले गेले. ती तिच्या पहिल्या पुस्तक 'असुरा' साठी ओळखली गेली आहेत, ती त्यांची पहिली पुस्तक आहे जी बेस्टसेलर बनली आणि लॉन्चच्या एक आठवड्याच्या आतच त्याने विक्रमी चार्टमध्ये प्रवेश केला. ते दक्कन क्रॉनिकल, द न्यू इंडियन एक्सप्रेस आणि द वॉल स्ट्रीट जर्नल मधील स्तंभलेखक आहेत.
-
Surakshit Guntavnuk Ghasghashit Paratava (सुरक्षित
विनोद पोट्टाईल हे प्रकाशन आणि सॉफ्टवेअर उद्योगातील 20हून अधिक वर्षांचा अनुभव असलेले लेखक आहेत| या काळात ग्राहक वर्तन, ग्राहकांचे प्राध्यान्याचे अध्ययन विषय आणि डिझाईन पद्धती या संदर्भातील आकलन आवश्यक असलेल्या विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आहे| सौभाग्य अॅसडव्हर्टायजिंग, इंडियन एक्स्प्रेस, अॅ पटेक, आयएल अँड एफएस, नेटकोअर सोल्युशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स यांसारख्या कंपन्यांबरोबर त्यांनी काम केले असून, त्यांना सल्ला पुरवला आहे|
-
The Spy Chronicles (द स्पाय क्रॉनिकल्स)
द स्पाय क्रॉनिकल्स. रॉ आयएसआय आणि शांततेचा आभास. अमरजितसिंह दुलत हे ‘रॉ’चे माजी प्रमुख आहेत, तर असद दुर्रानी ‘आयएसआय’चे माजी प्रमुख आहेत. 2016मध्ये दुलत आणि दुर्रानी यांच्यादरम्यान अनेकदा संवाद झाला. त्या दोघांमध्ये पत्रकार आदित्य सिन्हा यांच्या मध्यस्थीनं इस्तंबूल, बँकॉक आणि काठमांडू यांसारख्या शहरांमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांचा ऊहापोह करणाऱ्या अनौपचारिक चर्चा झाल्या. या संवादामध्ये काश्मीर आणि शांततेची गमावलेली संधी; हाफीज सईद आणि 26/11, कुलभूषण जाधव; सर्जिकल स्ट्राइक; ओसामा बिन लादेनचा सौदा अशा अनेक संवेदनशील मुद्द्यांवर गंभीर तरीही मनमोकळी चर्चा करण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये हेरगिरीच्या क्षेत्रातील या दोन्हीही दिग्गजांनी भारतीय उपखंडातल्या राजकारणाचा खोलवर वेध घेतलेला आहे.
-
Pu.L.Chandane Smaranache (पु.ल.चांदणे स्मरणाचे)
तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला... अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला... मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा... हा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! पुलंचं असणं... पुलंचं नसणं... ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत घेतलेला वेध पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा ! पु.ल. चांदणे स्मरणाचे
-
Calling Sehmat (कॉलिंग सेहमत)
सेहमत एक महाविद्यालयीन काश्मिरी युवती. तिच्या मरणासन्न वडिलांची अंतिम इच्छा समजली, त्या वेळी त्यांच्या उत्कट इच्छेला आणि देशभक्तीला शरण जाण्याखेरीज ती फारसं काहीच करू शकत नव्हती| त्यांच्या चांगल्या परिचयातील पाकिस्तानी जनरलच्या मुलाबरोबर तिनं लग्न केलं| भारतीय गुप्तचर यंत्रणेला नियमितपणे माहिती कळवत राहणं, ही तिची मोहीम होती| तिच्या प्रिय देशाचं नौदल नष्ट करू शकणारी गोपनीय माहिती तिच्या हाती लागेपर्यंत तिनं हे काम कमालीच्या धैर्यानं आणि धाडसानं पार पाडलं| खऱ्याखुऱ्या घटनांनी प्रेरित असलेली कॉलिंग सेहमत ही हेरगिरीवर आधारित रोमांचक रहस्यकथा आहे. जी प्रसिद्धीच्या झोतात कधीच आली नाही, अशा एका अनामिक नायिकेची ही अजरामर कहाणी आहे|