-
Good Muslim Bad Muslim (गुड मुस्लीम बॅड मुस्लीम)
'चांगला' मुसलमान कोण? 'वाईट' मुसलमान कोण? - हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात 'गुड मुस्लीम', 'बॅड मुस्लीम' या संकल्पनांचा व 'राजकीय ओळखीं'चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने 'शीत युध्दा'नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या 'गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम' या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद. महमूद ममदानी हे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि मानववंश शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते, पाश्चात्त्यांनी जाणीवपूर्वक अशा स्वरूपाच्या सुलभ व्याख्या केल्या की, पाश्चात्त्य संकल्पनांनी संस्कारित तो म्हणजे 'गुड मुस्लीम' आणि आधुनिक-पूर्व विचारांना धरून ठेवणारा वा कडव्या विचारांचा तो 'बॅड मुस्लीम'. एकंदरीतच, १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युध्द ते '९/११'च्या घटनेनंतरचा काळ या दरम्यान अमेरिका व त्यांच्या पाश्चात्त्य मित्रराष्ट्रांनी आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी मुस्लीम समाजसमूहांची 'धार्मिक ओळख' आणि 'राजकीय ओळख' यांची कशी हेतुपुरस्सर सरमिसळ केली आणि त्याचे किती विपरीत परिणाम संभवले, त्याचा उलगडा ममदानी या पुस्तकाद्वारे करू पाहतात. प्रदीर्घ संशोधन व विश्वासार्ह संदर्भांच्या आधारे त्यांनी हे पुस्तक सिध्द केलं आहे. जागतिक राजकारणातील अनेक अज्ञात गोष्टींवर, घटनांवर नव्याने प्रकाश टाकून अनेक गैरसमजुती दूर करू पाहणारं आणि जागतिक शांततेच्या दृष्टीने सर्वांनाच विचारप्रवृत्त करू पाहणारं असं हे पुस्तक... 'गुड मुस्लीम बॅड मुस्लीम!'
-
Tya Daha Varshantil Guru Dutta (त्या दहा वर्षांतील
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी) गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ''इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,'' असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले... ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते. गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश. अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या 'प्यासा', 'कागज के फूल' व 'साहिब बीबी और गुलाम'सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध
-
Indradhanushya Kshitijache (इंद्रधनुष्य क्षितिजाचे
सुमंतजींनी नवीन पार्टीच्या नेत्याचं अभिनंदन केलं आणि अध्यक्षांना आपल्या मंत्री मंडळाचा राजीनामा पाठवून दिला. इतकी वर्षे सत्ताधीश म्हणून मिळालेली प्रतिष्ठा इतक्या सहजासहजी धुळीला मिळेल? राजमहलातून रस्त्यावर आल्यावर लोक त्यांच्याशी कसा व्यवहार करतील? पार्टीतले त्याचे सहकारी मंत्री, राज्याचे पदाधिकारी, सरकारी मोठे अधिकारी, भावी सत्ताधीश त्याच्याशी कसे वागतील? खुर्ची गेल्यानंतर त्यांची दिनचर्या काय असेल? आज जी गर्दी त्यांच्या भोवती जमते यापुढे तशी जमेल का?......
-
Ajinkya Rani Tara (अजिंक्य राणी तारा)
बादशहाच्या मृत्यूची बातमी साताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन पोहोचली होती. मराठा सरदार महाराणी ताराबाईंसह जिथे जमले होते. औरंगजेबाच्या मृत्युबरोबरच मोगलांचे मराठ्यांबरोबरचे युद्ध संपले होते. महाराणी ताराबाई विजयी ठरल्या होत्या. मराठे विजयाचा जल्लोष करीत होते. औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ल्याचे नाव 'आझ्झमतारा' असे ठेवले होते. आता मराठे वीर "अजिंक्य तारा" असा जयजयकार करीत होते. आपल्या पराक्रमाने किल्ल्यांची मोगली नाव त्यांनी पुसून टाकले होते. हे सर्व पाहताना कृतकृत्यतेने महाराणी ताराबाईंचे ह्रदय भरून आले होते. आपल्या हातात भगवा ज़िन्दा घेऊन तो आनंदाने हेलावत महारानी म्हणाल्या, "विरांनो! महाराष्ट्राचा उत्कर्ष असाच वाढत राहो. पुढे तुम्ही नसाल, मी नसेन पण भावी मराठी पिढ्या असतील. या भावी काळातील मराठी पिढ्या आपल्या पराक्रमाचे गीत गातील अणि ऐकतील. आपला पराक्रम त्यांना स्फूर्ति, तेज आणि धैर्य डेट राहील."