-
Urmi (उर्मी)
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या कथासंग्रहात गेल्या 50 वर्षांत प्रसिद्ध झालेल्या कथांमधून 25 कथा निवडण्यात आल्या आहेत. या मंडळाने यापूर्वी "स्त्री साहित्याचा मागोवा' घेणारा खंड प्रसिद्ध केलेला आहे. त्यानंतर "भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा' हा खंड प्रसिद्ध केला. मंडळाचा "ऊर्मी' हा प्रातिनिधिक असा कथासंग्रह लक्षणीय असा आहेच, पण अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. मुक्ता दीक्षित, शांताबाई किर्लोस्कर यांच्यापासून आताच्या लेखिका लीना दामले यांच्यापर्यंतच्या अनेक सिद्धहस्त लेखिकांच्या कथा निवडणे अवघड काम होते. पण प्रत्येक कथा योग्यपणे निवडून हा संग्रह सिद्ध झाला आहे. या कथांमधून गेल्या 50 वर्षांतील महाराष्ट्राचे बदलते समाजजीवनच समोर येते.
-
Udgaar (उद् गार)
उदगार या कवित संग्रहातील कविता कविच्या काळातील उदगार आहेत. कवी ज्या समाजात राहतो त्या समाजाचे त्याच्यावर संस्कार पण होतातच पण त्याबरोबर समाजातील विषमता, अन्याय, जातीभेद स्त्री आणि दलितावरील अत्याचार, अंधश्रद्धा व ढोंग यांच्या त्याच्या संवेदनशील मनावर परिणाम होतो. तो समाजातील ही विषमता सहन करीत नाही. पण त्याला हि करताहि येत नाही अशा अगतिक अवस्थेत त्याला जे शब्द सुचतात ते उदगाराच्या रूपाने बाहेर पडतात. तो आपला संताप,चीड, कणव, दु:ख जळजळीत शब्दातून व्यक्त करतो. उदगार कविता संग्रहातील कविता म्हणजे कवीता जगताना आलेल्या अनुभवांचे शब्दरूप होय. उदगारमधील कविता वाचकांच्या हृदयाला भिडणारी आहे. युवकांच्यासाठी तीमध्ये आशेचा किरणही आहे-
-
Rang Maza Vegla (रंग माझा वेगळा)
डॉ. जगदीश करमळकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात चाळीस डॉक्टरांची वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्तच्या क्षेत्रातील मुशाफिरी आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना कला, साहित्य, संगीत, अभिनय, क्रीडा अशा दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणाऱ्या चाळीस नामवंत व्यक्तींचा परिचय करमळकर यांनी करून दिला आहे. यातील प्रत्येकाला भेटून त्यांच्याशी चर्चा करून हे लेख लिहिलेले असल्याने यात तपशिलातील अचूकता तर आहेच, पण या मंडळींनी दुसऱ्या क्षेत्रातही यशस्वी वाटचाल कशी केली तेही समजते. लेखक झालेले गोडबोले, छायाप्रकाशयात्री जोगळेकर, पक्षीमित्र पांडे, डॉ. सरदेसाई या नामवंत डॉक्टरांसह अन्य अपरिचित अशा डॉक्टरांचीही कामगिरी या पुस्तकामुळे कळते.
-
Mi Kasa Ghadalo (मी कसा घडलो)
ध्येय निश्चित होतं. उद्देश पक्का होतो त्यामुळे खेड्यातल्या खाच खळग्याच्या कट्याकुट्यानी भरलेल्या पायवाटेवरून अनवाणी चालत जाताना दु:ख जाणवत होतं पण साथीला होता… आई चा आशीर्वाद आणि पुस्तकांचा आधार
-
kalakabhinna (काळाकभिन्न)
काळाकभिन्न' काळोख आणि त्यातूनच होणारा मनुष्याचा जन्म ! मग 'टाहो' फोडत या 'आटपाट नगरी'त होणारा जीवनाचा प्रवास ! या प्रवासात मिळतात आई-वडिल, नातेवाईक, सखे-सोबती. जीवन फुलत जातं. वळणावर भेटते 'सहेलियोंकी बाडी'. मन गुंग होतं. स्तिमित होतं. 'अल्याड-पल्याड'ची जाणीव राहत नाही. मग कधीतरी मनुष्याचा उबग येतो आणि यंत्रं मित्र होतात. 'मी आणि चॅमी' मौत्री जुळते. 'हरवले आहेत' या मथळ्याखाली जेव्हा नावांची यादी फोटोंसकट वर्तमानपत्रांतून वाचनात येते तेव्हा 'वस्तुस्थिती'ची जाणीव होते. मनुष्य आणि मनुष्य जातींची आपापसातली नाती म्हणजे केवळ 'हिशोब' होऊन राहतात. शरीर आणि मन म्हातारं होतं. रिकामंही होतं, कारण आता काय शोधायचं हा प्रश्न आऽ वासून उभा राहतो. रिकाम्या वेळेचा चाळा म्हणून अनेक वर्षं धूळ खात पडलेला 'अल्बम' बाहेर काढला जातो आणि त्या पिवळ्या पडत जाणा-या फोटोंमधून आठवणींचं इंद्रधनुष्य स्वत:च्या बालपणाच्या याऽऽ टोकापासून ते स्वत:च्या मुलांच्या तारुण्याच्या त्याऽऽ टोकापर्यंत अर्धगोल उमटतं. अंधुकसं, धूसरसं, चष्म्याच्या काचा थेंबाथेंबाने ओलावत !
-
Purvarang-Himrang (पूर्वरंग-हिमरंग)
व्यवसायाने डेंटल सर्जन- अंत:करण रसिक कवीचे-दृष्टी चित्रकाराची- मन साहसी भ्रमंतीतून हिमालयात मन:शांती आणि परतत्व स्पर्श शोधणारे - त्या मनाला सापडला कर्तव्याचा अर्थ पूर्वांचलच्या निसर्गसमृद्ध प्रदेशात आरोग्यविषयक सुविधेचा अभाव - तिथे जाऊन ११ वर्ष दंतशिबिरे घेणारी पहिली डेंटल सर्जन प्रतिभा-सेवा आणि भ्रमंती सारे शब्दरूप झाले त्यातून साकारले- अपूर्व अनुभवांनी भरलेले आणि भारलेले.... पूर्वरंग-हिमरंग